आकर्षणाचा सिद्धांतातील affirmation खूप महत्वाचे आहेत पण अनेक व्हिडीओ आणि कोर्सेस मुळे त्यातील महत्व संपून गेले आहे.
आकर्षणाचा सिद्धांतातील affirmation खूप महत्वाचे आहेत पण अनेक व्हिडीओ आणि कोर्सेस मुळे त्यातील महत्व संपून गेले आहे.
तुम्हाला मंत्र सिद्धी माहिती आहे का?
मंत्र सिद्ध कसा करतात?
सतत १२ वर्षे म्हणजे एक तप सर्व नियम व अटी पाळून एखादी व्यक्ती मंत्र तंत्र साधना करते तेव्हा कुठे जावून मंत्र सिध्द होतो.
तुम्ही affirmation बाबतीत इतकीच मेहनत घेता का? कि नुसते शब्द बोलत बसता?
तुम्हाला माहिती आहे का सिध्द मंत्र किती प्रभावशाली आहेत ते?
एखाद्या व्यक्तीला दिले तर ते मंत्र लगेच काम करते. अगदी असेच affirmation काम करते.
तुमचे affirmation सिध्द आहेत का?
नाही ना?
affirmation सिध्द करण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे का?
नाही ना?
आता मार्च सुरु आहे, मी फक्त सर्वांची वर्षाची सुरुवात सकारात्मक व्हावी ह्यासाठी काही कोर्सेस सामुहिक उपलब्ध करून दिले होते आणि त्यापेक्षा जास्त वयक्तिक कोर्सेस ला लाईन होती. आणि आज आता पर्यंत वर्षाच्या सुरुवातीपासून योग्य मार्गावर राहिल्यामुळे आज त्या सर्वांचे ध्येय साध्य झाले आहे.
फक्त तुमचे ध्येय साध्य झाले नाही म्हणून कुणाचेच झाले नसेल का?
काहींचे ध्येय स्वतःचे घर असावे असे होते त्यांनी साध्य केले आहेत तर काही त्या मार्गावर आहेत, काहींना आरोग्य पाहिजे होते ते साध्य झाले, काहींना पैसा पाहिजे होता तो मिळाला, काहींनी आजार बरे केले, काहींना जोडीदार पाहिजे होता तो मिळाला, काहींना अध्यात्मिक, अलौकिक शक्ती मिळवायची होती ती मिळाली, काहींना बुद्धांचे दर्शन झाले, काहींना स्वामी समर्थांचे दर्शन झाले, म्हणजे ज्यांचा जो विश्वास होता त्या सर्वांचे दर्शन झाले. काहींनी अद्भुत शक्ती जागृत केली.
अजून वर्ष संपायचे आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे कि अजून बरेच माझे शिष्य त्यांची ध्येय ती साध्य करतील. विविध प्रकारचे ध्येय आहेत आणि जवळपास सर्वच त्या मार्गाने आहेत. जर योग्य मार्गदर्शन असेल तर काहीही कठीण वाटत नाही आणि ना हि मार्ग भटकतो.
त्या प्रत्येकाची मेहनत होती म्हणून त्या सर्व शिष्यांची ध्येय साध्य झालीत, त्यांची जी ५, १०, १५, २०, ३० वर्षे वाया गेली ती सर्व योग्य पद्धतीने विकसित करत मी वापरली.
त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा जागृत होता, उदाहरणार्थ "सर मी हे शेअर घेणार आहे." काही दिवसात " सर २०० % नफा झाला." ह्यामध्ये होते मानसिक प्रशिक्षण आणि affirmation. ते इतके जिवंत वाटत होते कि जसे काही आता ह्या क्षणात मिळाले आहे व आम्ही जगत आहोत.
आणि जेव्हा २०० % नफा शेअर बाजारातून ब्रम्हांडाने आकर्षित करून दिला तेव्हा असे वाटत होते कि आम्ही ते अगोदरच जगलो आहे, म्हणजे हा भूतकाळ आहे इतका सक्षम सराव होता.
affirmation बोलणे व affirmation सिद्ध करणे ह्यामध्ये फरक आहे. लोकांना सोपे वाटते affirmation बोलणे पण कठीण वाटते ती सतत कृती करत जे पाहिजे ते आकर्षित करण्यासाठी कृती करणे. १२ वर्षांच्या affirmation सरावाला १ वर्षाचा affirmation सराव करणारा हरवू शकतो का?
आकर्षणाचा सिद्धांत हि एक जीवनशैली आहे, affirmation हि एक जीवनशैली आहे. ९९, १९९, २९९ कोर्स ने काही नाही होनार जोपर्यंत तुम्ही सातत्य नाही ठेवत तो पर्यंत.
ज्वलंत धगधगती इच्छाशक्ती असते ती तुम्हाला तुमच्यात जाणवते का?
नाही ना?
जेव्हा जाणवेल तेव्हा तुम्ही चमत्कार कराल.
ह्या ज्वलंत इच्छाशक्तीचा आणि पैश्यांचा काहीही संबंध नाही. हा गैर समज काढून टाका. ज्याला ज्याचे महत्व वाटते ती व्यक्ती तो गोष्ट करतेच मग पैश्यांकडे बघत नाही. पण एक आहे ज्वलंत इच्छाशक्ती असलेली माझी सर्व शिष्य मग ती गरीब असो किंवा श्रीमंत ते सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहेत. जेव्हा गरज असते तेव्हा कसलीच कमी नसते.
स्वतःचे घर असणे हे affirmation बोलणे वेगळे आणि स्वतःचे घर विकत घेतांना, बांधतांना बघणे वेगळे. ब्रम्हांडापर्यंत तुमची कंपने पोहचायला तुमची कंपने तितकी सक्षम लागतात, आहेत का तितकी सक्षम कंपने?
इतकेच सांगेन affirmation सिध्द करायला शिका. मार्ग अनेक उपलब्ध आहेत, तुम्ही तुमचा मार्ग निवडा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment