पुण्यातील सत्य घटनेवर आधारित, एकदा एक व्यक्ती कन्सल्ट साठी माझ्याकडे आली होती, तिने तिच्या आयुष्यातील एक आश्चर्यचकित करणारा अनुभव सांगितला. ती व्यक्ती म्हणजे सुयश असे समजू. सुयश आणि त्याचा मित्र सोबत बसले असतात व अश्याच चर्चा करत असतात, तो मित्र बाहेर कामासाठी जाणार होता त्या अगोदर ते भेटले होते.
त्या मित्राने सहज मोबाईल उघडला, शेअर मार्केट चे एप उघडले, शेअर्स विकत घेतले व बोलता बोलता वेळ निघून गेला व त्या मित्राला शेअर मार्केट मधून प्रचंड नफा मिळाला. हे फक्त सुयश ने बघितले होते आणि जेव्हा सुयश घरी गेला तेव्हा शेअर मार्केट शिकायला प्रचंड मेहनत करायला लागला, हजारो अपयश आली, कर्जांचा डोंगर झाला आणि शेवटी मेहनतीला, चिकाटी ला फळ आले.
हो सुयश ने प्रचंड नफा कमावला.
अजून मेंदूला झिणझिण्या यायच्या बाकी आहे, मेंदू बधीर व्हायचा बाकी आहे.
सुयश च्या आयुष्यात अजून एक मित्र आलेला असतो, तो मित्र सहज जेव्हा आदिवासी तेलाचे फेड चालू होते ते विकतो व दुप्पट नफा कमावतो, ह्या सर्व वेळी सुयश त्याच्या सोबत असतो, तो सर्व बघतो.
आता सुयश घरी जातो व आदिवासी तेलाचा व्यवसाय सुरु करतो व प्रचंड नफा कमावतो, कारण सुरुवातीला शेअर मार्केट च्या वेळी सुयश ने बराच अनुभव घेतला अपयशी होवून. असेच एक दोन व्यवसाय केले आणि प्रचंड नफा कमावला.
फक्त एक विश्वास जो सुयश च्या अंतर्मनात रुजला तो खरा ठरला, त्यासाठी सुयश ने कठीण परिश्रम देखील घेतले.
आता तुम्हाला समजले कि एकदा का तुम्ही विश्वास ठेवला कि ते सत्यात उतरतेच. फक्त तुम्हाला तो विचार अंतर्मनात रुजवायचा आहे, स्वतः रुजला तर ठीक नाहीतर मेहनत करायची आहे, त्यानंतर तो विश्वास खरा ठरण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
जे अनेक वर्षांपासून शेअर मार्केट मधील काही गुंतवणूकदारांना जमले नाही ते ह्या व्यक्तीने करून दाखवले.
जे अनेक वर्षांपासून काही व्यवसायिकांना जमले नाही ते ह्या व्यक्तीने करून दाखवले.
अजून काय चमत्कार तुम्ही करू शकता?
- तुम्ही निरोगी आयुष्य तुमच्या अंतर्मनात रुजवून आजारपण बरे करू शकता.
- तुम्ही अभ्यासात यश तुमच्या अंतर्मनात रुजवून अनेक पदव्या प्राप्त करू शकता.
- तुम्ही नोकरीसाठी तुमच्या अंतर्मनात विचार रुजवून नोकरी प्राप्त करू शकता.
- तुम्ही कौटुंबिक सुख, समृद्धी तुमच्या अंतर्मनात रुजवून कौटुंबिक सुख, समृद्धी प्राप्त करू शकता.
- तुम्ही लग्नासाठी, प्रेमासाठी, लिव्ह इन साठी आणि सर्वांगीण फायद्यासाठी जोडीदार मिळवण्यासाठी तुमच्या अंतर्मनात विचार रुजवून जोडीदार प्राप्त करू शकता.
तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हा तुमच्या अंतर्मनात रुजवायचे आणि आणि प्राप्त करायचे आहे.
अंतर्मन तुमचे, हि अद्भुत शक्ती तुमच्या आत दडलेली आहे. तुम्हाला तुमच्या आत दडलेली अद्भुत शकत जागृत करायची आहे आणि चमत्कारिक आयुष्य जगायचे आहे. बाहेर नाही तर तुमच्या आत शोधा.
असे चमत्कारिक अनुभव आम्ही दररोज ऐकत असतो, चमत्कारिक आयुष्य जगण्याची इतके मार्ग मी बघितले आहे कि तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकता.
तुमच्यात किती क्षमता आहे हे तुम्हाला माहिती नाही, एकच आयुष्य भेटले आहे तुमची पूर्ण क्षमता वापरून आयुष्य जगा.
अश्विनीकुमार
रेकी ग्रांड मास्टर, संमोहन तज्ञ आणि आकर्षणाचा सिद्धांत
सल्ला, मार्गदर्शन, उपचार व कोर्स

Comments
Post a Comment