चमत्कारिक भाग्यशाली आयुष्य जगण्याचा मार्ग


 तुम्ही एखादे काम करता व त्यामध्ये यशस्वी होता तेव्हा तुम्ही त्या कामाचा एक आयाम ओपन करता. तुम्ही जेव्हा तेच काम परत परत करता आणि अजून त्या कामामध्ये उत्तम होत जाता तेव्हा त्या कामाचे विविध आयाम ओपन करत जातात. आणि तेच काम अजून जास्त कालावधीसाठी तन मन धन झोकून करता तेव्हा तुम्ही ते काम जागृत करता व ते काम कसे होईल हे तुम्हाला समजते. 


जेव्हा अजून खोलवर जावून करता तेव्हा त्या कामाद्वारे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिस्थिती आणि लोकांवर देखील परिणाम करता. ह्या पुढे जावून जेव्हा तुमच्यापेक्षा जास्त चांगले काम करणाऱ्यांशी तुमचा सामना होतो तेव्हा समजते कि तुमच्या क्षमता आणि मर्यादा काय आहे आणि तुम्ही हार न मानता स्वतःला विकसित करत समोरच्याला हरवत तुम्ही यशस्वी होता तेव्हा ह्या नंतर तुम्ही इतरांना वाचू शकता समजू शकता. 


ह्या पुढे जावून अजून सराव करतात तेव्हा जग काय करते हे तुम्हाला समजते, अगदी व्यक्ती पासुन ते परिस्थिती पर्यंत. म्हणजे तुम्ही आयुष्य जगता जगता भविष्य बघु शकता इतके शक्तीशाली तुम्ही होतात. हे जेव्हा तुम्ही योग्य मार्गाने करता तेव्हाच तुमच्यात अद्भुत शक्ती जागृत होतात नाहीतर नाही, नाहीतर तुमच्या प्रयत्नाने तुमचा प्रतिस्पर्धी शक्तिशाली होत जातो.


एकदा का इथपर्यंत पोचलात तर तुम्ही भाग्यशाली आयुष्य जगता. तुम्ही तुमचे भाग्य निर्माण करता, तुम्ही योग्य वेळी योग्य जागी असता आणि कितीही कठीण परिस्थितीत तुम्ही चमत्कार घडवता.


अनेक वर्षांचा सराव लागतो, जीवनशैली लागते, पैसा लागतो, गरज भासल्यास गुरूंची मदत घ्यावी लागते, आजूबाजूचे वातावरण तसे पाहिजे असते, सतत विकसित व्हावे लागते. हे काही कठीण नाही, फक्त हि जीवनशैली आहे. जर आवड असेल आणि मानसिकता असेल तरच हा मार्ग निवडा, नाहीतर विनाकारण खूप कठीण वाटेल आणि असे वाटेल कि तुम्ही अथक परिश्रम करता म्हणून. जन्मजात क्षमता असेल्यांसाठी हा विषय नाही, ते असेच चमत्कारीक आयुष्य काही न करता जगू शकतात.


अश्विनीकुमार


ग्रांड मास्टर रेकी हीलर, संमोहन तज्ञ, आकर्षणाचा सिद्धांत आणि ध्यान साधना

Comments