माझे आयुष्य अश्विनीकुमार सरांच्या आकर्षणाच्या सिद्धांत कोर्स ने कसे बदलले

शिष्याचे स्वानुभव


 माझे नाव मेघना. मी नेहमीप्रमाणे माझ्या लहानश्या घरात थकलेली, तणाव आणि नैराश्याने ग्रस्त बसलेली होती. मला काय करावे हे सुचतच नव्हते, मी हरवली होती. मी कठीण परिश्रम करून देखील माझे करिअर आणि खाजगी आयुष्य अतिशय थंड पणे सुरु होते, सततच्या अपयशांची एक शृंखलाच सुरु होती. मी एकदा फेसबुक स्क्रोल करत होती तेव्हा मला अश्विनीकुमार सरांची आकर्षणाचा सिद्धांत कोर्स ची जाहिरात दिसली. मला विश्वास नव्हता पण शेवटी एक विचार केला कि करूनच बघूया, जे होईल ते बघता येईल.


मला वाटले कि सर्वजण फी भरली कि कोर्स सुरु करता पण अश्विनीकुमार सर फी भरण्याअगोदर माझा इंटरव्ह्यू घेत होते तेव्हा समजले कि अश्विनीकुमार सरांना फी पेक्षा समोरील व्यक्ती खरच सिरीयस होवून कोर्स करणार कि नाही. इथे माझा पूर्णपणे विश्वास बसला कारण दोन दिवस झाले मला कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी सतत फोन येत नव्हते आणि शेवटी मी एडमिशन घेतले.


मी अगोदर जे कोर्स केले होते त्यासारखा अनुभव मला इथे नाही आला. अश्विनीकुमार सर अतिशय सोप्या भाषेत शिकवत होते आणि स्पष्ट सांगत होते. कुठेही विनाकारण भ्रमात ठेवले नाही. सर विकारांच्या शक्तीना खूप महत्व देत होते, सुस्पष्टतेला महत्व देत होते आणि विश्वासाची मर्यादा ओलांडायला सांगत होते, चौकट मोडायला सांगत होते. मी माझी ध्येये व्हीझ्युअलाइझ म्हणजे जिंवत कल्पना करायला शिकले, मी ते माझे ध्येय साध्य केले आहे हि भावना निर्माण करायला शिकले आणि मर्यादित विश्वास कायमस्वरूपी सोडून द्यायला शिकले.


मला सुरुवातीला अफरमेशन म्हणजे प्रार्थना विचित्र वाटायची. मनात विचार यायचे असे काही होते काय? सरांनी माझ्याकडून योग्य वास्तववादी सर्व करून घेतला आणि "मी यशस्वी आहे, मी परिपूर्ण आहे." हे अफरमेशन मला फील व्हायला लागले. मी हार न मानता सातत्य ठेवले म्हणून मी अचिव्ह करू शकले. मी दररोज कृतज्ञतेचा सराव करू लागले, आभार व्यक्त करू लागली, ध्येय स्वप्ने लिहून ठेवायला लागली, आणि माझे स्वप्नांचे आयुष्य व्हिज्युअलाईझ, जिंवत कल्पना करू लागली. हळू हळू माझी मानसिकता बदलू लागली, माझा दृष्टीकोन बदलू लागला. बदल भले छोटे वाटत होते पण आत्मविश्वास प्रचंड वाढला होता, नातेसंबंध सुधारायला लागले, आणि संधी सर्व मार्गाने माझ्याकडे येवू लागली.


एके दिवशी ऑफिस  मध्ये चमत्कार घडला. मला एक पद पाहिजे होते ज्यासाठी मला प्रमोशन ची गरज होती आणि नंतर हा विचार सोडून दिला आणि चमत्कार कोर्स नंतर काही दिवसांनी मला प्रमोशन मिळाले. एक चमत्कार झाला नाही त्यामध्ये दुसरा चमत्कार मला माझा एक जुना मित्र भेटला व तिथून आमची नवीन नात्याला सुरुवात झाली. मला प्रचंड हलके वाटत होते, अतिशय उल्हासदायक, आनंदी आणि प्रसन्न वाटत होते, सर्व काही शक्य आहे हि भावना माझ्यातून ओसंडून वाहत होती.


मी जेव्हा मागे वळून अश्विनीकुमार सरांच्या कोर्स कडे बघते ना तेव्हा असे जाणवते कि अश्विनीकुमार सरांनी फक्त आकर्षणाचा सिद्धांतच नाही शिकवला तर सरांनी अशी अद्भुत शक्ती दिली ज्यामुळे मी माझ्या आयुष्याची कथा परत लिहून निर्माण करू शकली. मी माझ्या विचारांना, भावनांना आणि कृतीला माझ्या ध्येय आणि स्वप्नांशी एकरूप आणि एकसुर करून जे आयुष्य जगणे माझ्यासाठी अशक्य होते ते आयुष्य मी आज जगत आहे.


आकर्षणाचा सिद्धांत जादू नाही आहे, सर्वकाही स्वतःवर विश्वास ठेवण्याबद्दल आहे, सातत्य ठेवण्याबद्दल आणि आकर्षणाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवण्याबद्दल आहे. अश्विनीकुमार सरांचे मार्गदर्शन, सरांकडे घेतलेली दीक्षा हा असा टर्निंग पोइंट होता जिथे माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.


माझे अनुभव हे नेहमी तुम्हाला आठवण करून देत जाईल कि योग्य मानसिकता, दृष्टीकोन, मार्गदर्शन आणि कोर्स ने कोणीही त्यांचे आयुष्य बदलू शकते. अश्विनीकुमार सर नेहमी म्हणायचे कि आकर्षणाचा सिद्धांत फक्त थेअरी नाही आणि तर आयुष्य बदलण्याचा सिद्धांत आहे.


धन्यवाद अश्विनीकुमार सर, मी आपली खूप खूप आभारी आहे.


मेघना बर्वे


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments