आता अनेक व्हिडीओ दिसायला लागले आहेत जिथे लोकांनी त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांचे आजारपण बरे केले आहे. काही व्हिडीओ मध्ये असे दिसून आले कि रुग्णांनी त्यांचा एक वेगळाच मार्ग निर्माण केला व ते बरे झाले. जास्त आश्चर्य ह्याचे वाटले कि काही मेंदूच्या संदर्भातील आजार बरे केले गेले ज्यावर अजून संशोधन सुरु आहे. जर मेंदूच्या रिलेटेड आजार बरे होऊ शकतात म्हणजे तुमच्यासाठी, तुमच्या अंतर्मनासाठी आणि तुमच्या इच्छा शक्तीसाठी सर्वकाही शक्य आहे. जर तुम्ही ठरवले तर तुम्ही पाहिजे ते करू शकता.
- फक्त आजार नाही तर पैसे कमवायचे, वाढवायचे विविध मार्ग लोकांनी शोधून काढले आहेत.
- यशाचे विविध मार्ग शोधून काढले आहेत.
- मुलांच्या प्रगतीसाठी विविध मार्ग शोधून काढले आहे.
- कुटुंबाच्या सुखासाठी विविध मार्ग शोधून काढले आहे.
- आत्मविकास करण्याचे विविध मार्ग शोधून काढले आहेत.
- कर्जमुक्तीचे विविध मार्ग शोधून काढले आहे.
- उद्योग व्यवसायात भरभराटीचे विविध मार्ग शोधून काढले आहेत.
- शेअर बाजारात प्रचंड नफ्यासाठी विविध मार्ग शोधून काढले आहेत.
- गरजेनुसार तत्काळ समाधानासाठी विविध मार्ग शोधून काढले आहेत.
- भीतीवर मात करण्यासाठी विविध मार्ग शोधून काढले आहे.
- जोडीदार मिळवण्यासाठी विविध मार्ग शोधून काढले आहेत.
- डिप्रेशन वर मात करण्यासाठी विविध मार्ग शोधून काढले आहे.
विज्ञान, संशोधन आणि अध्यात्म पलीकडे एक जग आहे जिथे व्यक्ती निराश होवून जाते व तिथे चमत्कार घडतो.
हो हे सत्य आहे आणि अनेक व्हिडीओ समोर येत गेले त्यावरून सिध्द होत गेले. ते सर्व व्हिडीओ हे प्रत्यक्ष ज्यांच्या सोबत घडले आहे अश्या लोकांचे होते कारण मला नेहमी पुरावा लागतो किंवा अनुभव तो देखील प्रत्यक्ष.
मला अनुभव का लागतो?
मी अगोदर भाग्यशाली आयुष्य जगायचो, मध्ये काही समस्या निर्माण झाल्या व नकारात्मक आयुष्य सुरु झाले, त्यानंतर परत सकारात्मक आयुष्यात परत जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, सुरुवातीला अध्ये मध्ये चमत्कार घडायचे पण टिकायचे नाही. अजून कालावधी गेला व त्यानंतर सर्वकाही ठीक झाले, म्हणजे फक्त शब्द विचार नाही तर कृती आणि वास्तवात.
जसे संमोहन शास्त्रातील टेक्निक्स चा वापर केला तर चालत बोलता तुम्ही समोरील व्यक्तीला कंट्रोल करू शकता मग ती व्यक्ती ओळखीची असो किंवा अनोळखी. आकर्षणाचा सिद्धांत वापरून तुम्हाला जे पाहिजे ते अमर्याद भेटत जाते, कुठलाही अडथळा नसतो, रेकी हिलिंग चा वापर करून कुठलेही आजार बरे करता, कुंडलिनी शक्तीचा वापर करायला शिकता, उच्च दैवी आणि दानवी उर्जाचा अनुभव घेता. हे शब्द नाही तर अनुभव आणि जीवनशैली आहे.
तुम्ही घेतला आहे का अनुभव कि एक अवस्था अशी येते जिथे सर्वकाही शांत वाटते व वेळ थांबली आहे असे वाटते? संमोहानातील अंतर्मनाचा अनुभव आहे. वाटायला शांत पण तुम्ही जग बदलू शकता इतकी शक्ती असते त्यामध्ये. तो एक क्षण जरी असला तरी अंतर्मनात तुम्ही काही मिनिटे दिवस महिने आणि वर्षे जगला असाल जशी तुम्ही क्षमता आहे तसे.
इथे एक महत्वाची सूचना सांगतो, ती कायमस्वरूपी लक्ष्यात ठेवा
जेव्हा हा अनुभव पहिल्यांदा येईल तेव्हा लगेच ह्या अनुभवाची सवय करून घ्या, जर चुकून हा अनुभव नाकारला, गांगरून गेला तर परत तो अनुभव येण्याची शक्यता कमी आहे. शक्तिशाली लोकांचे आयुष्य असेच निरस दिसते त्याची सवय करून घ्या, ह्याला दुसरा पर्याय नाही. कारण तुमच्या आयुष्यात असे अनुभव येवून जातात व तुम्ही त्यावर दुर्लक्ष करता. इथे तुम्हाला सामान्य आयुष्य त्यागायला लागेल आणी ह्यासाठी तयार रहा कारण सामान्य आयुष्यापेक्षा जास्त चांगले आयुष्य हे चमत्कारिक निरस आयुष्य आहे. निरस म्हणजे रेकी हिलिंग ऊर्जा शास्त्र समजा, तुम्हाला मोठा सिने स्टार आणि सामान्य व्यक्ती उर्जेच्या स्तरावर एकसारखे वाटतील, न सुंदरता ना समृद्धी तुम्हाला दिसेल, दिसनार फक्त ऊर्जा, जसे सर्जरी करण्याऱ्या सर्जन ला सगळ्या व्यक्ती दिसतात तसे कारण तेच वास्तव आहे.
परत बोलतो सोपे आहे, पुढील स्टेप्स फोलोव करा :
१) ध्यान
२) व्यायाम
३) घरचा आहार
४) सकारात्मक लोकांची संगत
५) जिथे गरज असते तिथे मदत घ्या जसे कि कोर्स
६) जर तुम्हाला महत्व माहिती असेल तर तुम्ही वैयक्तिक प्रशिक्षक किंवा गुरु करू शकता
७) अद्भुत शक्ती असलेल्या लोकांच्या समूहात, संपर्कात रहा
८) जीवनशैली करा
९) सकारात्मक आयुष्यासाठी महिन्याला आर्थिक निधी बाजूला काढून ठेवा
आज पासून सुरुवात करा, आणि चमत्कार बघा, आपले अनुभव शेअर कराल.
अश्विनीकुमार
विना औषधी उपचार
रेकी ग्रांड मास्टर, हिप्नोथेरपीस्ट, आकर्षणाचा सिद्धांत प्रशिक्षक, उर्जा उपचार, वास्तू ऊर्जा, ज्योतिष आणि अध्यात्मिक अलौकिक उपाय

Comments
Post a Comment