मॅनिप्युलेशन म्हणजे एखाद्याच्या मनावर ताबा मिळवून त्याला आपल्या तालावर नाचवणे. कुटुंबात किंवा प्रेमात ही गोष्ट 'कर्तव्य' किंवा 'प्रेमाच्या' नावाखाली केली जाते. "जर तुझे माझ्यावर प्रेम असेल, तर तू हे करायलाच हवे," असे म्हणणे ही प्रेमाची अट नसून ती एक मानसिक चाचणी आहे.
मॅनिप्युलेटिव्ह व्यक्ती अनेकदा 'Isolation' चा वापर करते. ती तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींपासून किंवा इतर नातेवाईकांपासून तोडण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुमच्यावर फक्त त्यांचाच प्रभाव राहील.
महत्त्वाचे मुद्दे :
भावनिक ओझे: तुम्हाला सतत चुकीचे किंवा अपुरे वाटायला लावणे.
तुलना करणे: तुमची तुलना इतरांशी करून तुमचा आत्मविश्वास कमी करणे.
प्रतिसाद कसा द्यावा : अशा लोकांशी संवाद साधताना "नाही" म्हणायला शिका. "नाही" हे एक पूर्ण वाक्य आहे, त्यासाठी स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. स्वतःला भावनिकदृष्ट्या खंबीर बनवा. जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला 'गिल्ट' मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा शांतपणे तिथून निघून जा. तुमच्या आयुष्याचे रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका. गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घ्यायला संकोच करू नका.
अश्विनीकुमार
समुपदेशक
विना औषधी उपचार
ग्रांड मास्टर रेकी हीलर, संमोहन, आकर्षणाचा सिद्धांत, ध्यान साधना आणि नकारात्मक उर्जा मुक्ती

Comments
Post a Comment