अंतर्मन एक रेडिओसारखे आहे – प्रचंड शक्तीला ट्यून करा आणि आकर्षणाच्या सिद्धांताचा उपयोग करा

 

मानसशास्त्रज्ञ एक आकर्षक विचार संशोधन करत आहेत जो आपल्याला मानवी मन समजून घेण्याच्या पद्धतीला आव्हान देतो. विचार हे आपल्याला सक्रियपणे तयार करणे असू शकत नाही. त्याऐवजी, ते कदाचित गहन अवचेतन प्रक्रियांमधून उगम पावतात, जे जाणीवपूर्वक नियंत्रणाच्या पलीकडे असतात. विचार हे प्रत्येक क्षणात तयार होणारे नसून, ते स्वयंचलितपणे येतात, बहुतेक वेळा चेतनेशिवाय किंवा इच्छाशिवाय.

ब्रेन इमेजिंग अभ्यास दाखवतात की विचाराशी संबंधित न्यूरल एक्टिव्हीटी विचार येण्यापूर्वी काही मिलीसेकंदांमध्ये सुरू होतो. याचा अर्थ असा की जाणीव येण्याआधी विचार आधीच तयार होतो. ध्यानावरील संशोधन देखील याला समर्थन देते, ज्यात असे दर्शवले जाते की, जेव्हा मन शांत असते तेव्हा विचार स्वयंचलितपणे उगम पावतात आणि मग ते आपले लक्ष दुसरीकडे वळवल्यानंतर गायब होतात.

हा दृष्टिकोन चिंता, सर्जनशीलता आणि आत्म-निर्णयाशी आपला संबंध बदलतो. जर विचार निवडण्याऐवजी स्वीकारले गेले तर आसक्तीशिवाय त्यांचे निरीक्षण करणे सोपे होते. मानसिक स्पष्टता मनावर नियंत्रण ठेवण्यापासून नाही तर जाणीवपूर्वक ऐकण्यापासून येऊ शकते.

मन हे लेखकापेक्षा रेडिओसारखेच अधिक असू शकते , जे आधीच गतिमान असलेल्या सिग्नलशी जुळवून घेत असते.

आकर्षणाच्या सिद्धांत आणि मानसशास्त्र :

आकर्षणाच्या सिद्धांताचा दृष्टिकोन देखील याच प्रकारे आहे. जर आपले विचार स्वयंचलितपणे येत असतील, तर त्यांना सकारात्मकतेने स्वीकारून आपल्याला हवे असलेले जीवन आकर्षित करणे अधिक सोपे होते. आपल्याला विचारांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता नाही, परंतु त्यांना जागरूकतेने पाहणे आणि त्यांना सकारात्मकतेने स्वीकारणे हे आकर्षणाच्या सिद्धांताच्या यशाचे महत्त्वाचे घटक आहेत.

ब्रम्हांडात अशी सिग्नल्स फिरत असतात, फक्त तुम्हाला ट्यून व्हायचे आहे व जे पाहिजे ते मिळवत जायचे आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सकारात्मक व्यक्ती सकारात्मक आयुष्य आकर्षित करते तर नकारात्मक व्यक्ती नकारात्मक आयुष्य आकर्षित करते.

इथे ट्युनिंग खूप महत्वाची आहे जी सकारात्मक व्यक्ती नकारात्मक सहवासात राहते व तो सहवास बदलण्याचा प्रयत्न करत नाही ती नकारात्मकताच आकर्षित करेन किंवा नकारात्मक कंपने सक्षम करेन व त्या नकारात्मक व्यक्तीला परिस्थितीला सर्वकाही सकारात्मक भेटत जाईल.

एक सारख्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून व्हा, इतरांना विनाकारण बदलण्याचा प्रयत्न करू नका कारण जिला बदलायचे असेल ती स्वतःहून बदलेल, स्वतःच्या आयुष्याला पाळणाघर करू नका.

आकर्षणाच्या सिद्धांताच्या टेक्निक्स ज्याचा वापर करून तुम्ही पाहजे ते आकर्षित करू शकता :

१)      ध्यान : ध्यान सर्वात उत्तम आणि सोपे टेक्निक्स आहे तुम्हाला जे पाहजे ते आकर्षित करण्यासाठी, जर तुम्ही ध्यानाला हलक्यात घेत आहात तर तुम्हाला ध्यानाची शक्ती माहिती नाही किंवा तुम्ही अनुभव घेतला नाही. तुम्हाला जसे जमते तशी ध्यान साधना करा व जे पाहिजे ते आकर्षित करा.

२)      विचार : तुम्हाला जे आकर्षित करायचे आहे त्या बद्दल सकारात्मक विचार निर्माण करा.

३)      भावना : विचारांना भावनानाचे स्वरूप द्या.

४)      व्हिज्युअलाईझेशन : तुम्हाला जे आकर्षित करायचे आहे त्याचे अति सूक्ष्म च्या सूक्ष्म निरीक्षण करा.

५)      प्रार्थना : ब्रम्हांडाकडे प्रार्थना करा

६)      आभार व्यक्त करा : तुम्हाला जे आकर्षित करायचे आहे ते आकर्षित करून दिल्याबद्दल ब्रम्हांडाचे आभार माना.

सोपे आहे, प्रयत्न करून बघा, सातत्य ठेवा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, अगदी आरामात तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही आकर्षित कराल.

धन्यवाद

अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत कोच
८०८०२१८७९७

Comments