हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मानसिक तणाव ह्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत चालली आहे
हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब
आणि मानसिक तणाव ह्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घर गृहिणी बायको, वयात असलेली मुल
हा संसार पाठी सोडून जात आहे. मुंबई सारख्या हुशार, उच्च शिक्षित
आलेल्या शहरात हे सर्व घडत आहे. काल ज्या व्यक्तीला चालते फिरते बघितले तो
दुसऱ्यादिवशी हृदयविकाराचा झटका येवून मरण पावला हि बातमी मिळत आहे. आत्महत्यांचे
प्रमाण देखील वाढले आहे.
शहरीकरण, भांडवलशाही ह्याचे मुख्य कारण आहे. नोकरी करणारा, छोटामोठा
व्यवसाय करणारा ताण सहन करू शकत नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. स्पर्धा तीव्र
झाली आहे. मुलभूत विषय सोडून जिथे बघावे तिथे जात, धर्म, प्रांत
व इतर भेदभाव पसरवणारे विषय दिसत आहे त्यामुळे मुख्य विषयाकडे लक्ष्यच जात नाही.
म्हणून मी बोलत असतो कि आपण भले व आपले काम भले. तुमचे घर तुम्हाला
चालवायचे आहे.
चला उद्योजक घडवूया ह्या पेज वर ह्यासाठी अपडेट नाही ठेवत कारण
मनुष्य जिवंत असेल तरच तो पैसा कमवू शकतो, त्याची मानसिक स्थिती चांगली असेल तरच
तो सुख, समाधानाने आयुष्य जगू शकतो. इतके महत्व मानसिकतेला आहे.
चुकणे आणि मुर्खपणा ह्यामध्ये फरक आहे. चुका सुधारू शकतो पण मुर्खपणा
नाही. चुकणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात रहा ना कि मूर्ख लोकांच्या सहवासात.
कामाचे वाढलेले तास, ४ तास प्रवास. प्रवास इतका त्रासदायक
आहे कि लोकल ट्रेन मध्ये प्रचंड गर्दी, रोड ने जायचे झाल्यास प्रचंड ट्रेफिक.
घरी फक्त झोपण्यासाठी. मुल आहेत, बायको आहे, आईवडील आहेत
ह्यांच्या सोबत बोलायला देखील मिळत नाही.
ऑफीस मध्ये राजकारण, बॉस चे वाईट वागणे, कमी
पगार किंवा पगार जास्त तर महागाई सर्व पैसे काढून घेते. ऑफीस मध्ये होणारा मानसिक
छळ, इमानदार असल्यामुळे वरची कमाई करता येत नाही. आर्थिक गुन्हेगारांची
तक्रार करायची झाल्यास कायदा व सुव्यवस्था योग्य नाही. हेल्मेट वाले सापडतात पण
गुन्हेगार नाही.
कुटुंब चालवायची कसरत, पगार कमी पण बॉस किंवा कंपनीचा मालक
प्रचंड श्रीमंत. हॉस्पिटल चा प्रचंड खर्च. जीतके पैसे कमावले ते एका झटक्यात
हॉस्पिटल चे बिल भरण्यात जातात. कर्ज घेवून मुलांचे शिक्षण चालू आहे. एलआयसी
पोलिसी गुंतवणूक म्हणून घेतली तर ह्या गुंतवणुकीमधून परत काही भेटत नाही.
हे सर्व मुंबई मध्ये घडत आहे. मग गावी कशी परिस्थिती असेल?
माझे उच्च शिक्षित आयटी क्षेत्रात काम करणारी मित्र हि डिप्रेशन ने
ग्रस्त आहेत. एकच भीती कि कधीही नोकरी जावू शकते. दर वर्षी आयटी मध्ये सतत बदल होत
जातो. जिथे अगोदर २० ३० वर्षे नोकरी व्हायची तिथे जास्तीत जास्त ३ वर्षे नोकरी
होते.
तिशी चाळीशी नंतर अचानक काढले जाते. संसाराचा गाडा ओढायचा कसा?
३०
वर्षांखालील मुलांचे छळ केले जातात, कमी पगारात काम करून घेतले जाते.
शिक्षण महाग, पालकांचे पैसे बुडू नये म्हणून मुलांवर
दबाव टाकण्यात येतो. त्यांचे खेळणे बंद केले जाते. मुलांना बाहेरचे आयुष्य कसे आहे
ह्याचा अनुभव नसतो. जेव्हा मुल हि घराबाहेर शाळेबाहेर पाउल टाकतात तेव्हा त्यांना
आयुष्याची काळी बाजू देखील दिसून येते.
लैंगिक आयुष्य देखील धोक्यात आले आहे. कामामध्येच इतके व्यस्त असतात
कि शेवटचे नवरा बायको कधी एकमेकांशी बोलले असतील हे देखील माहिती नसते. सर्व भावना
संपून जातात. अगोदर मानसिक तणाव हा श्रीमंत लोकांमध्ये आढळून यायचा आता मात्र गरीब
आणि मध्यम वर्ग ह्यामध्ये देखील आढळून येतो.
गरीब मध्यम वर्ग देखील हृदय विकार, मधुमेह आणि
रक्तदाब ह्या सारख्या जीवघेण्या आजारांनी ग्रस्त आहे. सोबत मानसिक आजार देखील
आहेत. उपचारासाठी वेळ आणि पैसा नाही. सरकारी हॉस्पिटल मध्ये प्रचंड गर्दी आणि लांब
आहे. एका दिवसाच्या सुट्टीत काम होत नाही. मग आजारपण तसेच ठेवून आयुष्य जगत असतात.
दीर्घ आयुष्य हे कमी करून टाकतात.
स्त्रियांना जास्त बंधने असल्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक, मनोशारीरिक
आणि शारीरिक आजारांची लक्षणे आढळून आली. चाळ संस्कृती
मध्ये गृहिणी एकमेकांच्या घरी जायच्या. बोलत बसायच्या. विचार पूस व्हायची, दरवाजा
उघडा असायचा. त्या काळात भावना व्यक्त करण्यासाठी अनेक व्यक्ती असायच्या. सहसा गैर
फायदा घेतला जात नव्हता पण आता गैर फायदा घेणारेच जास्त भेटतात.
इतक्या कृत्रिम समस्या असतील तर हृदयविकाराचा
झटका येणारच, मधुमेह आणि उच्च रक्तदाब आजार बळावतीलच आणि मानसिक आजार नैराश्य,
उदासीनता, तणाव, चिंता आणि इतर आजार देखील बळावतील.
अश्या अनेक समस्या आहेत ज्यामुळे हृदयविकार,
मधुमेह, रक्तदाब आणि मानसिक आजार वाढले आहेत. पर्याय सोपा आहे पण जुन्या विचारांनी
नाही तर नवीन विचार आत्मसात करून. जो काळानुसार बदलेल तोच टिकेल. मनुष्य
प्राण्याने निर्माण केलेले कायदे व नियम हे श्रीमंत व्यक्तींना वेगळे आणि सामान्य
गरीब लोकांना वेगळे आहेत.
जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील व्यक्ती वरील
कुठल्याही आजाराने ग्रस्त असेल तर आजच संपर्क करा, पुढील होणारे मोठे नुकसान टाळू
शकतो. आता जर कुठे ट्रीटमेंट चालू असेल तर अजून उत्तम, आकर्षणाच्या सिद्धांताने
वैद्यकीय उपचारांचा प्रभाव वाढत जावून आजार पूर्ण पणे बरा होवून जातो. जर तुमच्या
घरातील कमावती व्यक्ती गेली असेल आणि कुटुंबाचा भार तुमच्यावर आला असेल तर तुम्हाला
देखील आकर्षणाचा सिद्धांत समुपदेशन, प्रशिक्षण आणि उपचाराची गरज आहे.
आपली कुठलीही समस्या असेल ती फेसबुक मेसेज,
व्हास्टएप, इमेल, मोबाईल कॉल आणि स्कायपी चा वापर करून माझ्यापर्यंत पोहचवू शकता. जे
अंतर्मनात आहे ते व्यक्त करा. जसा निसर्ग भेदभाव करत नाही तसा मी देखील करत नाही. प्रत्येकाला
जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःला पाहिजे तसे आयुष्य जगू शकते.
धन्यवाद
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण,
मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध
शुल्क लागू

Comments
Post a Comment