एखादी व्यक्ती समजूतदार आहे कि नाही हे कसे ओळखायचे?




१)       समजूतदार व्यक्ती सतत काहीतरी करत असताना आपले फोटो सोशल नेटवर्किंग साईट वर टाकत नाही बसत.

२)       समजूतदार व्यक्ती बर्गर च्या जागी वडापाव खाणे पसंद करते ते हि सोशल नेटवर्किंग वेबसाईट वर फोटो अपलोड न करता.

३)       समोरच्या व्यक्तीसोबत वादविवाद होईल असे विषय टाळतात आणि लगेच माफ देखील करतात.

४)       समजूतदार लोक प्रेम आणि शारीरिक आकर्षण ह्यामधील फरक ओळखतात व दोन्ही भावना एकत्र करत नाहीत.

५)       समजूतदार व्यक्ती कौटुंबिक असतात. प्रेम करताना एकनिष्ठ असतात. ते घरपण टिकून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतात व तुटण्यापासून वाचवण्याचा शर्थीने प्रयत्न करत असतात.

६)       समजूतदार व्यक्ती हि स्वावलंबी असतात व कधी कधी परस्परांवर अवलंबून असतात.

७)       समजूतदार व्यक्तींना पैसा कसा वापरायचा हे माहित असते व आपले आर्थिक आयुष्य हे परक्या लोकांपासून गुपित ठेवते.

८)       समजूतदार व्यक्ती इतरांना कमी दाखवण्यासाठी किंवा इतरांवर स्वतःचा छाप पडावा ह्यासाठी प्रयत्न करत बसत नाही. तिला माहित आहे कि हे काही व्यर्थ आहे.

९)       समजूतदार व्यक्ती शांत डोकं ठेवून खोल विचार करून निर्णय घेते. गैर वर्तन  करत नाही.

१०)   समजूतदार व्यक्ती हि सामान्यतः प्रामाणिक असते.

११)   समजूतदार व्यक्ती हि शांत असते व तक्रार करत बसत नाही.

१२)   समजूतदार व्यक्ती कामजोरांना त्रास देत नाही, तुच्छ लेखत नाही मग मित्र असू दे किंवा इतर कोणीही.

१३)   साम्जुदार व्यक्तीला कधी कुठे काय बोलायचे हे चांगलेच माहित असते. ते जास्तीत जास्त वेळेस गप्प राहणेच पसंद करतात.

१४)   समजूतदार व्यक्ती नकारात्मक लोकांपासून लांब राहतात. त्यांना माहित आहे कि नकारात्मक लोकांमुळे वेळ वाया जातो, नकारात्मक उर्जा पसरते आणि औरा खराब होतो.

१५)   शेवटचे, वयाने समजूतदारपणा येत नाही. वयस्कर व्यक्ती हि समजूतदार असेलच असे नाही.

वर वधू शोधणे असू दे किंवा मित्र मैत्रिणी निवडणे, जर तुम्ही समजूतदार व्यक्ती निवडत असाल तर भविष्यात तुम्हाला काहीही समस्या होणार नाही. मनाची शांती देखील लाभेल. फक्त खाजगी नाही तर व्यवसायिक आयुष्यात देखील समजूतदार व्यक्तींची सोबत तुम्ही दीर्घकालीन स्थिर आर्थिक आयुष्य जगू शकता.

आकर्षणाचा सिद्धांत आपल्या मनातील आणि अंतर्मनातील नकारात्मक भावना आणि द्वंद ह्यांचे निवारण करून आपल्याला समजूतदार व्यक्ती बनवतो किंवा समजूतदार व्यक्ती आपल्या आयुष्यात आकर्षित करतो.

आकर्षणाच्या सिद्धांताद्वारे लहान मुलांना समजूतदार बनवून त्यांच्या आई वडिलांच्या डोक्यावरील ओझे आणि ताण तणाव आपोआप दूर करतो.

धन्यवाद
अश्विनीकुमार

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध

Comments