जे खऱ्या प्रेमात असतात अश्या जोडप्यांची हृदय एकसारखी धडकतात. त्यांची कंपने हि जुळून येतात. त्यांना प्रेम व्यक्त करण्याची गरज पडत नाही किंवा टिकवून ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागत नाही. सर्वकाही आपोआप होते. आपल्या कंपनाना जुळणारी व्यक्ती भेटत नसेल तर विनाकारण जबरदस्तीने प्रयत्न करत बसू नका. स्वतःवर प्रेम करा. लग्नासाठी जोडीदार शोधताना हा नियम विसरू नका. हाच नियम व्यवसायिक आयुष्यात देखील कामी येतो. जर तुमच्या हृदयाची कंपने तुम्ही करत असलेल्या उद्योग व्यवसाय, गुंतवणूक किंवा इतर कुठलेही आर्थिक व्यवहारांशी जुळत असतील तर तुम्हाला आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत नाही आणि जर जुळत नसतील तर तुम्हाला १०० % तोटा हा होणारच. उच्च शिक्षित तज्ञ हा मेंदूने विचार करतो तर बाजारपेठेत लहानपणापासून अनुभव घेतलेला तज्ञ हा हृदयाने विचार करतो.
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध

Comments
Post a Comment