तुम्ही कुठल्याही प्रकारची ध्यान साधना वापरु शकता, जरुरी
नाही कि तुम्ही ठराविक ध्यान साधनच वापरावी, कुठलीही ध्यान
साधना वापरून ध्यान करणे महत्वाचे आहे. ध्यानाचे सर्व मार्ग तुमच्यासाठी फायद्याचे
आहे.
काळ असा बदलला कि उद्योजकांकडे वेळच नसतो, इतके ते व्यस्त
असतात. तणाव, नैराश्य आणि उच्च रक्तदाब हे तर सामान्यह जीवनशैलीचे भाग झाले आहेत
आणि इथेच ध्यान साधना फायदा पोहचवत असते. ध्यान तणाव दूर करून रक्तदाब काबु करते
ज्यामुळे अनेक आजार दूर होतात व लक्ष्य केंद्रित होते.
सर्वांचे म्हणणे एकच होते कि त्यांना ध्यान कसे करायचे माहित नाही
किंवा वेळ नाही पण ध्यान करायची इच्छा आहे. अश्यांना मी काही टिप्स देत आहे.
सुरवातीला सर्वांनाच नकारात्मक विचार दूर करणे शक्य होत नाही.
त्यांना एका जागी शांत देखील बसता येत नाही. जितक्या जोशाने ध्यान करण्याची सुरवात
करतात तितक्याच नकारात्मक जोश ने परत ते ध्यानापासून दूर जातात. एक लक्ष्यात ठेवा
कि पहिल्या वेळेस कोणीही तज्ञ बनत नाही. मलाच २० वर्षे लागली तज्ञ बनायला आणि अजून
प्रवास सुरु आहे. तेव्हा कुठे जावून विविध अध्यात्मिक आणि वैज्ञानिक साधनेत
प्राविण्य मिळवले आहे.
कोणीही ध्यान करू शकते. फक्त सुरवात करणे आणि सराव दररोज करत राहणे
ह्याची गरज लागते. ह्यासाठी मी आता ऑनलाईन मार्गदर्शन देखील सुरु केले आहे
ज्यामुळे सराव तुम्ही जेव्हा कधी आणि कुठेही सवड भेटेल तेव्हा करू शकता. ह्याचा
प्रचंड फायदा अनेकांन भेटला आहे. सरकारी, खाजगी उच्च पदाधिकारी, उद्योजक,
व्यवसायिक
आणि गुंतवणूकदार फक्त ह्यांनाच फायदा भेटला नाही तर गृहिणी, विद्यार्थी
ह्यांना देखील प्रचंड फायदा झाला आहे.
दिशादर्शक ध्यान
ध्यानाचा हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे.
इथे मी समुपदेशन केल्यावर ज्या काही समस्या निघतात तेच विचार सतत मनात आणायचे
आहेत. जर नसेल तर तुम्ही फक्त श्वासावर लक्ष्य केंद्रित करून "माझे संपूर्ण
लक्ष्य श्वासावर केंद्रित आहे." "संपूर्ण शरीर शिथिल झाले आहे." हे
दोन्ही मंत्र तुम्ही मनातल्या मनात बोलत कृती करू शकता. सुरवातीला २ मिनिटांपासून
सुरवात करा आणि नंतर हळू हळू वेळ वाढवत न्या. कधी कधी तुम्हाला वेळ भेटणार नाही तर
काहीही समस्या नाही जेव्हा कधी भेटेल तेव्हा ध्यान करत जा. मग हळू हळू तुम्ही
आपोआप ध्यानासाठी वेळ काढत जाल.
वेळापत्रक
ध्यानाची योग्य वेळ सकाळी ३ ते ५ आहे का?
अनेकांना गैर्साज असतो कि फक्त सकाळ ध्यानासाठी योग्य वेळ आहे. जो पहाटे ३ ते ५ ची
वेळ दिली आहे त्यामध्ये फक्त गुरु ज्यांचे आश्रम हिमालयात किंवा एकांत ठिकाणी आहे
त्यांचा आहे. ताठ बसने, अगरबत्ती लावणे वगैरे करावे लागते हे सर्व घरी शक्य होत
नाही. जिथे कुठे आरामदायक जागा असेल तिथे तुम्ही ध्यान करू शकता. जेव्हा ऑफिसमध्ये
वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ध्यान करू शकता. जर तुम्ही खूप व्यस्त असाल तर नेहमी
लक्ष्यात ठेवा कि झोपण्याआधी तुम्हाला ध्यान करण्यास वेळ भेटेलच. ती सुरवातीची २
मिनिटे तुमचे आयुष्य बदलू शकतात. हे मी अनुभवले आहे आणि गरजूंना शिकवून त्यांना
देखील अनुभव घ्यायला लावला आहे.
वेळ / कालावधी
सुरवातीचे चालता, बोलता झोपताना किंवा काम
करताना केलेले ध्यान हे जर तुम्ही मनापासून २ मिनिटे जरी केले तरी प्रचंड प्रभाव
पाडते. जर तुम्हाला दीर्घकाली सवय लावून घ्यायची असेल तर सृवातीचे कमीत कमी २१
दिवस ते ९० दिवस म्हणजे ३ महिने सतत सराव करा. २१ दिवसानंतर सवय लागते किंवा सवय
लागायला सुरवात होते.
ध्यानाचे प्रकार
ध्यानाचे अनेक प्रकार आहे. जसे विचार काढणे,
एका विचारावर लक्ष्य केंद्रित करणे, शब्दांचा जप करणे, बाहेरील वस्तूवर लक्ष्य
केंद्रित करणे, कल्पना करणे इत्यादी. तुम्ही वैज्ञानिक अध्यात्मिक मार्गाचा वापर
करू शकता, जर कोणी सुधार करून बनवले असेल त्यामार्गाचा आणि तंत्र, मंत्र काळ्या
जादूचा देखील. ध्यान आणि ध्यान साधना ह्याचे अनेक प्रकार भारतात उपलब्ध आहे तुम्ही
तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल तो प्रकार निवडू शकता, सोयीनुसार बदल करू शकता.
गुरूंची मदत घेणे
उत्तम मार्ग. तुम्ही जर गुरूंची मदत घेत असाल
तर तर तुमच्या शंकांचे निराकरण लवकर होते व तुम्ही न भरकटता योग्य मार्गाने जातात.
जेव्हा शंकांचे निराकरण होत नाही तेव्हा नैराश्य येते व व्यक्ती ध्यान करणे
कायमस्वरूपी सोडून देते. शक्यतो गुरूंची मदत घेत जा. काही हजार रुपये हे तुमचे
भविष्यातील होणारे करोडो रुपयांचे नुकसान आणि वेळ वाया जाण्यापासून वाचवते.
ध्येय उद्देश ठेवून ध्यानाला बसत जा
ध्यानाचा सराव करण्याअगोदर सकारात्मक ध्येय
किंवा उद्दिष्ट ठेवून ध्यानाला सुरवात करत जा. सकारात्मक उद्दिष्टाने ध्यान करायला
बसलात कि तुम्हाला आत्मिक आनंद भेटतो, ह्या आत्मशांती मधून तुमची कधीही न सुटणारी
समस्या असेल त्यावर समाधान सापडते. संकटे टाळली जातात. न बरे होणारे आजार बरे
होतात. म्हणजे जे काही अशक्य आहे ते सर्व शक्य होते, तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून
टाकते.
ध्यानाचा कुठलाही योग्य अयोग्य मार्ग नाही.
महत्वाचे आहे कि जो मार्ग तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या मार्गाने सुरवात कराल.
आपल्या प्रतिसादाची नेहमीप्रमाणे प्रतीक्षा
राहील.
धन्यवाद
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण, मार्गदर्शन
आणि उपचार उपलब्ध

Comments
Post a Comment