"भास, भ्रम कि वास्तव?"

अश्या वेळेस निर्णय कसा घ्यायचा?


आमच्या घराजवळ असलेल्या हायवेवर काही अपघात झाले. अपघाताचे कारण होते कि एक कुत्रा अचानक मध्ये आला, एक स्त्री अचानक मध्ये आली. इथे दुचाकी किंवा चार चाकी चालवणाऱ्यांनी तो तो कुत्रा आणि त्या स्त्री ला वाचवण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावला.
जेव्हा चांगली गाडी चालवणारा २० वर्षांचा मुलगा एका इंजिनिअर वडील आणि डॉक्टर आई ने गमावला तेव्हा त्यांनी कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याच जागी जितके अपघाती मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबांना भेटून माहिती गोळा केली. माहिती मध्ये कारणे एकसारखीच होती.
हे सर्व अपघात रात्रीच्या वेळेस झाले होते. रस्त्यामध्ये अचानक कुत्रा आणि स्त्री आली आणि अपघात झाला.
आता इथे प्रश्न येतो "भास, भ्रम कि वास्तव?"
तुम्ही कधी एखादे स्वप्न बघितले आहे का ज्यामध्ये तुम्हाला असे वाटते कि ते स्वप्न नसून वास्तव आहे? उंचावरून पडत आहात व दचकून जागे होतात, साप किंवा इतर प्राणी तुमच्यावर हल्ला करतात व तुम्ही दचकून जागे होतात, एखादी आनंदी घटना बघता व आनंदाने जागे होता, संकट, समस्या ह्या मधून बाहेर पडण्याचे उत्तर भेटते व तुम्ही आनदाने जागे होतात, एखादे लैंगिक उत्तेजक स्वप्न बघता आणि वीर्य स्खलन होते.
ह्या प्रत्येक स्वप्नात तो किंवा ती व्यक्ती हि वास्तवात असल्यासारखे आयुष्य जगत असते. कधी कधी स्वप्ने हि काही कालावधी नंतर वास्तवात उतरतात. लोकांना हृदय विकाराचा झटका येवून मृत्यू देखील झाला आहे इतकी दाहकता भ्रम, भास मध्ये आहे.
एक शेअर ट्रेडर ला तर जवळपास दुसर्या दिवसाचे भविष्य दिसले होते. त्याने काही विश्वास ठेवला नाही आणि तसेच घडले, जिथे त्या व्यक्तीने कृती करायला पाहिजे होती तिने ती संधी घालवली आणि त्या वेळेस ज्या ज्या लोकांनी भविष्य माहिती नसताना देखील गुंतवणूक केली त्यांनी प्रचंड नफा कमावला, काहींनी तर आयुष्यभराची कमाई करून टाकली तर काही आर्थिक संकटातून आरामात बाहेर पडले.
तुम्हाला भ्रम आणि वास्तव ह्यामधील फरक ओळखता आला तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला लागतील. तुम्ही स्वप्नात अंतर्मनात आयुष्य जगत आहात ते देखील वास्तव आहे आणि तसेच आयुष्य तुम्ही वास्तवात उतरवू शकता. इथे फक्त अध्यात्मिक, वैज्ञानिक आणि नैसर्गिक शक्ती पैकी कुठली शक्ती काम करत आहे हे शोधून काढले पाहिजे. कुठेही तुम्ही क्वांटम फिजिक्स किंवा आत्मा ह्यांची थेअरी वापरू शकत नाहीत.
माझे स्वतःचे ७० % अनुभव हे खरे झाले होते, विद्यार्थी आणि शिष्यांना देखील सारखेच अनुभव आले होते. अनुभवला पर्याय नाही. अनुभव असेल तरच पुढे जा नाहीतर जसे तार्किक आयुष्य जगत आहात तसेच जगा, विनाकारण कुणाच्याही नादी लागून वेळ पैसा वाया घालवू नका.
आपल्याला असे अनुभव आले असतील तर इमेल, व्हास्टएप किंवा फेसबुक मेसेज ह्या मार्गांनी शेअर करा. संपूर्ण माहिती हि खाजगी ठेवण्यात येईल. इथे तुलना केली जात नाही. भावना चांगल्या किंवा वाईट हा विचार नका करू तर स्वतःला व्यक्त करत जा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध

Comments