मनाला मानसिक दृष्टीला पाती लावून आयुष्य जगू नका


ह्या मानसिक दृष्टीला लावलेल्या पातीचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठी समाज उद्योग व्यवसाय करू शकत नाही म्हणून. क्षमता हि प्रचंड असते, अनेक कंपन्यांवर उच्च पदे देखील भूषवतात, कंपनीसाठी मोठमोठ्या डील यशस्वी करतात, कंपनीसाठी चांगले वाईट काम करतात पण स्वतःची कंपनी काढून आपण असे काही करू शकतो ह्याचा त्यांना मागसुमच नसतो. तसे चौकटीबाहेर आयुष्य जगणारे मराठी आहेत पण त्यांचे प्रमाण खूप कमी आहे.

जेव्हा पैसे कमवायचे असतात तेव्हा मराठी समाजाला नोकरीची पाती आणि उद्योग व्यवसाय केला तरी कमी पैसे कमावण्याची पाती हि असते म्हणजे असतेच. कितीही क्षमता असली तरी स्वतःची क्षमता कमी करायची करोडो कमवायची लायकी असताना सुद्धा पगाररुपी पैसा येवू द्यायचा आणि बाकीचा पैसा हा मालकाला आयता कमवून द्यायचा.

काही लोकांच्या सर्वांगीण आयुष्याला पाती लावलेली असते तर काही जणांच्या ठराविक आयुष्याच्या भागाला पाती लावलेली असते. उदाहरणार्थ एक व्यक्ती हि व्यवसायिक आयुष्यात यशस्वी असेल तर तीच व्यक्ती खाजगी आयुष्यात सपशेल अपयशी असते. जर तुम्ही अश्या व्यक्तींचे व्यवसायिक यश बघून त्यांच्याकडून खाजगी आयुष्याबद्दल सल्ला घेत असाल तर तुम्हाला देखील प्रचंड प्रमाणात खाजगी आयुष्यात अपयशाला सामोरे जावे लागेल.

जर तुम्ही पाती लावलेल्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घेत असाल तर तुम्ही सुद्धा त्यांनी ज्या ज्या संकटांना तोंड दिले ती संकटे तुमच्या वाट्याला येतील, कदाचित त्यांचे स्वरूप अजून भीषण झालेले असेल, जसे आपण काळानुसार बदलतो सक्षम होतो तशीच संकटे सुद्धा स्वतला बदलत असतात, हा श्रुष्टी चा अलिखित नियम आहे बदलाचा.

तुमच्या मानसिकतेला पाती लावण्याचे काम तुमच्या लहानपणापासून सुरु होते, जर मोठ्या व्यक्तीला गुलाम बनवायचे असेल तर लहानपणापासून सुरवात करा हा अध्यात्मिक आणि मानसशास्त्राचा नियम आहे, ह्याला माइंड कंट्रोल म्हणजे दुसर्याच्या मनावर ताबा मिळवणे असे म्हणतात.

वातावरणानुसार मनुष्य प्राणी स्वतला बदलत असतो हे नैसर्गिक आहे पण तुम्हाला अनेक मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले कृत्रिम भेदभाव प्रचंड प्रमाणात दिसून येतील. अनेक संस्कृती आणि परंपरा ह्या बिनकामाच्या असताना सुद्धा लादलेल्या असतात व मनुष्य प्राणी न प्रश्न विचारता लादलेले ओझे पिढ्यान पिढ्या वाहत जातो, ह्यामध्ये नुकसान फक्त आणि फक्त गरीब मध्यम वर्गाचे होते, श्रीमंत, समृद्ध आणि सत्ताधारी मुक्त आयुष्य जगत असतात.

साधे उदाहरण घ्या, समजा तुमचे मुल हे नुकतेच जन्माला आलेले आहे, त्या मुलाला तुमच्यापासून अलग करून जे त्यांचे पालक नाही त्यांना सुपूर्द केले व पालन पोषण करायला सांगितले, जेव्हा ते मुल मोठे होत जाईल तेव्हा जे पालनपोषण करतात पण ज्यांनी जन्म दिला नाही त्यांना तो त्याचे आई वडील समजेल, ते जे संस्कार देतील त्याचेच अनुसरण करेल व त्याचे संपूर्ण आयुष्य व्यतीत करेल.

म्हणजे आता जे तुम्ही चांगले वाईट आयुष्य जगत आहात त्याची प्रोग्रामिंग हि लहान पणीच संस्कार रुपात तुमच्यावर झाली आहे. अर्थात इथे अनुवांशिकता हा भाग वेगळा आहे त्याबद्दल वेगळा लेख लिहू शकतो. ह्याचा विरुद्ध अर्थ हा होतो कि ह्या पृथ्वीतलावर जन्माला येणारे प्रत्येक बाळ हे नैसर्गिकरीत्या स्वतंत्र असते, त्याच्यामध्ये अध्यात्मिक मानसशास्त्रीय शक्त्या ह्या जन्मजात असतात. जस जसा तो मोठा होत जातो तस तसे त्याच्या  मानसिकतेला विविध प्रकारच्या संस्काररूपी पात्या लावून एकसारखे निरस दुर्भाग्यशाली आयुष्य जगू लागतो किंवा जगायला मजबूर केले जाते.

कधी कधी मानसिक पात्या ह्या गरजेच्या असतात उदाहरणार्थ तुम्हाला ३० वर्षांचे ध्येय ३ वर्षात, ३ वर्षांचे ध्येय ३ महिन्यात, ३ महिन्याचे ध्येय ३ दिवसात, ३ दिवसाचे ध्येय ३ तासात, ३ तासाचे ध्येय ३ मिनटात आणि ३ मिनिटांचे ध्येय ३ सेकंदात गाठायचे असेल तर स्वताहून ते ध्येय गाठण्यासाठी मानसिक पाती लावून घेतलेली बरी, ती मानसिक पाती ध्येय पूर्ण झाल्यावर गळून पडते, पण जर इतरांकडून मानसिक पाती लावून घेतली तर सहसा आपण ती काढायला तयार होत नाही कारण एक भीती असते कि परत आपण मागे गेलो तर?

ध्येय गाठण्यासाठी लावलेली मानसिक पाती हि आपले लक्ष्य विचलित होऊ नये म्हणून आपण लावून घेतो, व ते ध्येय अगदी कमी वेळेत गाठतो. ह्यामुळे आपण घनदाट आयुष्याच्या जंगलात न भरकटता ध्येय कुठल्याही संकटात न पडता साध्य करून घेतो, हि मानिसक पाती ८० % नकारात्मक विचार आणि १९ % सकारात्मक विचार ह्यांना बाजूला सारते, व १ % ध्येयाच्या विचारांना ठेवते जेणेकरून प्रत्येक क्षणी आपण ध्येयाच्या योग्य दिशेने वाटचाल करत असतो.

आता तुम्ही तुमचे आयुष्य तपासून पहा कि तुम्ही मानसिक पाती लावली आहे कि नाही, ती तुम्ही लावली आहे कि इतरांनी? ती तुमच्या फायद्याची आहे कि नाही? तात्पुरती आहे कि कायमस्वरूपी? जितक्या लवकर मानसिक पाती काढाल तितक्या लवकर तुम्ही खर्या अर्थाने मुक्त आयुष्य जगाल.

जर स्वताहून मानसिक पाती निघत असतील तर ठीक आहे जर नाही तर तज्ञांची मदत घ्याल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध

Comments