तुमचे शब्द फक्त आवाज आहे कि आदेश आहे?





मी नेहमी सांगत असतो कि आपली उर्जा, कंपने जेव्हा सक्षम होतात तेव्हा आपली नजर, आपला आवाज भेदक बनवून जातो. तुम्ही बघितले तरी समोरच्या व्यक्तीचा आत्मा हादरून जातो, बोलले तर आदेशासारखे लगेच पालन करायला लागतो. हि क्षमता जागृत कशी होते?
ध्यान साधनेने हि क्षमता जागृत होते. भले तुमचे पद कितीही मोठे का असेना मान फक्त त्या पदाचा असतो पण त्यामुळे काही तुमची नजर आणि तुमचा आवाज हा भेदक झालेला नसतो. ह्या क्षमता तुम्हाला अभ्यासाने नाही तर ध्यान साधनेने जागृत किंवा निर्माण करता येते.
ध्यानामुळे तुमच्यामध्ये प्रचंड दैवी क्षमता जागृत होते. जसा हायड्रोजन चा अनु छोटा असतो पण उर्जा प्रचंड असते तसेच तुमच्या बाबतीत घडते, तुमच्यात प्रचंड दैवी उर्जा ध्यानामुळे वाढून संचारत असते त्यामुळे तुमच्या प्रत्येक वागण्या बोलण्यात उर्जा बाहेर पडत असते जी समोरील एका किंवा अनेक व्यक्तींवर प्रभाव पडत असते. समोरच्या व्यक्तीच्या उर्जेवर तुमची उर्जा हि हावी होत असेत त्यामुळे ती तुमच्यासमोर नतमस्तक होते.
म्हणून एखाद्या गुरूच्या चरणी मोठ मोठे नेते, उच्च पदावर काम करणारे सरकारी आणि खाजगी कर्मचारी, शक्तिशाली लोक आणि सवर्सामान्य लोक नतमस्तक होतात. हे जग आपल्या आतील अद्भुत उर्जेवर चालते भले पद काहीही का असेना त्याचे काही चालत. प्रत्येकाला ध्यानामुळे जागृत होणार्या उर्जेची शक्ती माहिती आहे त्यामुळे लोक तिथे नतमस्तक होतात.
माझा प्रत्येक शब्द हा आदेश असतो म्हणून तो फोलोव केला जातो. जे सर्वसामान्य लोक असतात त्यांना इतके करण्याची गरज नाही, त्यांना फक्त त्यांचे आयुष्य समाधानाने जगता यावे इतकी तरी उर्जा निर्माण करावी लागते जेणेकरून जी नोकरी करत असतील, जो उद्योग व्यवसाय करत असतील तिथे त्यांचे शब्द हे आदेशासारखे घेण्यात यावे इतके.
आयुष्य सोपे आहे, अतिरेक करण्याची गरज नाही. हळू हळू पुढे जात जा आणि मग बघा काही वर्षात तुमचा शब्द हा आवाज न राहता आदेश बनून गेला असेल. तुमच्यासाठी जास्तीत जास्त एक तासाची ध्यान साधना पुरेसी आहे.
तुम्ही जिथे काम करता तिथे लोकांसोबत संबंध चांगले राहतात, उद्योग व्यवसायात ग्राहकांवर तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडतो, कंत्राट घेतांना देणाऱ्यावर प्रभाव पडतो, कर्जाऊ रक्कम मागितली कि परत मिळायला सुरवात होते, चारचौघात प्रभावी बोलता येते, असे एक नाही तर अनेक समस्या तुमच्या आयुष्यातील सुटून जातात.
हि क्षमता तुमच्यात आहे तुम्हाला फक्त ती जागृत करायची आहे. ह्यासाठी ध्यान हाच एक पर्याय आहे आणि जर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केले तर अजून प्रभाव निर्माण करता येतो व वापर करता येतो.
धन्यवाद
अश्विनीकुमार
इंस्टाग्राम : aaple.aantarman

Comments