तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे कि समृध्द व्हायचे आहे? दोघांमध्ये फरक आहे. श्रीमंती म्हणजे जास्तीत जास्त पैसा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तर समृद्धी म्हणजे तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत तुम्ही ज्या परिस्थिती मध्ये जगत आहात त्यापेक्षा जास्त पैसा तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्ही समृद्ध आयुष्य जगत आहात. प्रत्येक श्रीमंत व्यक्ती हि सकारात्मक असते असे नाही पण प्रत्येक समृध्द व्यक्ती हि सकारात्मक असते. श्रीमंती हि येत जात असते तर समृद्धी हि टिकून राहते. श्रीमंतीचे आयुष्य अल्पकाळ असते तर समृद्धीचे आयुष्य हे दीर्घकाळ असते. श्रीमंत व्यक्ती हि आर्थिक परिस्थितीनुसार भेदभाव करू शकते तर समृध्द व्यक्ती हि भेदभाव करत नाही, आदर करते.
आता एक सत्य घटनेवर आधारित उदाहरण देतो.
१० वर्षे अगोदरची घटना आहे. एक व्यक्ती माझ्याकडे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आली होती. अतिशय गरीब लोक राहतात अशी गरीब वस्ती होती जिथे घरे हि पत्र्यांची होती. एक मित्राकडे मोबाईल आणि इंटरनेट होता त्यावर त्याने माझा लेख वाचून मला संपर्क केला होता. रोजंदारीचे काम, महाराष्ट्रातील एक दुष्काळ ग्रस्त परिसरातून तो आला होता.
गरीब व्यक्ती पैसे वाचवणे, दिवसाला इतका खर्च, महिन्याला इतका खर्च, मुलभूत गरजा भागू लागल्या, असे करता करता एका वर्षात त्याने २ वर्षे मुलभूत गरजांसाठी पुरेल इतका पैसा बाजूला काढला आणि इथून त्याचे आयुष्य बदलायला लागले.
श्रीमंत घरात जन्माला येणाऱ्यांना शून्यातून काहीही निर्माण करावे लागत नाही, त्यांना आयुष्यात धोका कमी पत्करावा लागतो. जे आहे तिथून फक्त त्यांना टिकवून ठेवावे लागते किंवा वाढवावे लागते. त्यांना फक्त प्रोस्ताहित करणारी लोक मिळतात, उद्या अपयशी जरी झाले तरी ते रस्त्यावर येत नाहीत त्यामुळे तोटे सहन करून देखील आरामात पुढच्या प्रयत्नाला लागतात. पण गरीब आणि मध्यम वर्गाचे असे नसते, एक आर्थिक चुकी हि पुढील ७ पिढ्या कर्जत बुडवू शकते. ह्याचा अर्थ असा नाही कि मध्यम वर्ग समृद्ध आयुष्य जगू शकत नाही म्हणून, ह्यावर देखील उपाय आहेत.
जर तुम्हाला माहिती आहे कि पुढील २ वर्षे तुमच्याकडे मुलभूत गरजा पूर्ण होतील इतके पैसे आहे तर तिथे तुम्ही निश्चिंत होता कारण मन मेंदू आणि अंतर्मन ह्यांची रचनाच अशी आहे कि मुलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्याची, त्यामुळेच आपण जिवंत राहू शकतो म्हणून निसर्ग बोला किंवा देव बोला त्याने अंतर्मनात तसे प्रोग्राम करून ठेवले आहे.
निश्चिंत झालेला मेंदू हा स्वयं विकासाकडे लक्ष केंद्रित करू शकतो. तुमच्यामध्ये दडलेल्या सुप्त शक्त्यांचा शोध घेवून त्या जागृत करू शकतो. तुमचे ध्येय आणि स्वप्ने पूर्ण करण्याच्या कामाला लागतो,, तुम्ही प्रत्येक क्षणाचे अति शुक्ष्म निरीक्षण करता व संधी पकडता, जर संधी नसेल तर निर्माण करता, पोट भरलेले असल्यामुळे आणि रात्री घरी गेलो तर अन्नाची टंचाई नसल्यामुळे तुम्ही तुमची पूर्ण क्षमता वापरून दिवस जगता आणि जास्तीत जास्त ध्येय स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने जाता, तुमचा सर्वांगीण विकास करता.
इथून पुढे माझ्या शिष्याची प्रगती व्हायला लागली, योग्य लोकांशी संपर्क होऊ लागला, मिळेल ते काम करत असल्यामुळे इतके व्यवसायिक क्षेत्र बघून झाले कि त्यामध्ये एक निवडणे सोपे झाले. एक क्षेत्र निवडले व तो पुढे पुढे जात गेला. नियतीचे चक्र प्रगतीच्या दिशेने फिरू लागले. सकारात्मक मानसिकता अगोदरच तयार झाली होती त्यासोबत समृद्धी यायला लागली.
आता पुढील २ वर्षे मध्यम वर्गीय आयुष्य जगू शकेल इतका पैसा हाताशी आला, जीवनशैली वाढली, पण ह्या जीवनशैली मध्ये दिखाव्याची जीवनशैली नव्हती, कर्ज फक्त मुलभूत गरजांसाठी घेतले गेले जसे कि फ्रीज, ,वाशिंग मशीन, बाकी मोबाईल पासून सर्व जे रोख मध्ये घेता येईल तेच घेतले, कुठेही शून्य टक्के व्याजावर जावून १० हजाराच्या जागी ३० हजाराचा मोबाईल घेतला नाही.
असे करता करता पुढील ५ वर्षे उच्च मध्यम वर्गीय आयुष्य जगेल इतका पैसा साठवून ठेवला व त्यानंतर जो श्रीमंतीचा प्रवास सुरु झाला तो सुरूच आहे. आता महागडी गाडी आहे ती फक्त कामासाठी, मीच त्याला बोललो कि आर्थिक व्यवहार वाढले आहेत तिथे तुम्हाला तुमच्या हाताखाली लोक हि कामाला ठेवावीच लागतील, महागडी गाडी हि तुम्हाला प्रवासात आराम देईल त्यासाठी गरजेची आहे जेणेकरून तुम्ही मिटिंग आरामात करू शकतात. आता ऐश आराम आहे तो मानसिक शांतीसाठी ना कि देखाव्यासाठी.
इथे फक्त हे काही श्रीमंत झाल्यापैकीचे एक उदाहरण आहे. बाकी अनेक गरीब आहेत पण काही वर्षे टिकेल इतका पैसा गाठीशी धरून आहे, काही मध्यम वर्ग ते उच्च मध्यम वर्ग इतकी झेप घेतली. ह्याला बोलतात समृद्धी ना कि फक्त श्रीमंती.
समृद्धी दीर्घकाळ टिकून राहते तर श्रीमंती हि अल्पकाळ. समृद्धी मध्ये सर्वांगीण समृद्ध होतो तर श्रीमंती मध्ये फक्त आर्थिक. तुम्हाला समृध्द आयुष्य जगायचे आहे ना कि श्रीमंत. आता तुम्ही ठरवा, आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.

Comments
Post a Comment