आयुष्याचा धडा भाग १



आज आपल्याला एक दगड तोडणारा मजूर आयुष्याचा महत्वाचा धडा देणार आहे. ह्या धड्यामुळे तुमचे आयुष्य पूर्ण बदलून जाईल.

समजा तुमच्या आयुष्यातील रस्त्यात मोठ मोठे संकटे आणि समस्यांचे दगड आहेत. तुम्ही पूर्ण शून्यात गेला आहात, आयुष्यात तळ गाठला आहे आणि तुमच्या आयुष्याचा रस्ता हा मोठ मोठ्या संकटे आणि समस्यांच्या दगडांनी व्यापला आहे. निराशा इतकी कि एक एक दगड फोडायला तुम्हाला वर्ष लागत आहे, कठीण परिश्रम करावे लागत आहे. अतिशय निराश होवून तुम्ही आयुष्य जगत आहात. संकटे आणि समस्यांनी भरलेला एक एक क्षण हा अनंत वाटत आहे. तुम्ही आता अक्षरक्ष गुडघे टेकणार आहात, हार मानणार आहात.

ठीक आहे, टेका गुडघे. खाली बघा, तुमच्याकडे फक्त एक हातोडा आणि काही मोठे खिळे आहेत.

आता परत उठा. खिळे आणि हातोडा घ्या व तुमच्या आयुष्यात असलेले संकटे आणि समस्यांची दगडे फोडायला घ्या पण आता तुमच्या कठीण परिश्रमाची उर्जा हि मन मेंदूला द्या. शांत व्हा. निरीक्षण करा व कामाला लागा. आता तुमच्या इतक्या वर्षांचे कठीण परिश्रम वाया जाणार नाही, धीर धरण्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्ही सकारात्मक बनला आहात, संकटे आणि समस्यारुपी मोठ मोठे दगडे फोडण्याचे प्रयत्न कराल, नव नवीन प्रयोग करून बघाल आणि त्यातून तुम्हाला मार्ग सापडेल.

आता तुम्हाला संकटे आणि समस्यांच्या तुमच्या आयुष्यातील अडथळे रुपी दगडांची भीती वाटणार नाही. आता तुमचा आत्मविश्वास पूर्ण वाढला आहे. तुम्ही ठराविक अंतरावर खिळे ठोकाल. सर्व खिळ्यांना संकटे आणि समस्यांच्या दगडात रुतवाल. सततच्या मारलेल्या हातोड्याच्या फटक्याने खिळे आतमध्ये रुतत जातील. काही तासांच्या प्रयत्नाने तुम्हाला संकट आणि समस्येच्या दगडाला तडा गेलेला दिसेल. आणि मग काय पुढील फटक्यात तुमच्या संकट आणि समस्येच्या दगडाचे तुकडे झालेले दिसतील.

बस फक्त एक यश. आता तर तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असेल. तुम्हाला सर्वकाही शक्य आहे असे वाटेल. ५ १० वर्षांची मेहनत फळ द्यायला लागली. किती सोपे आहे हे तुम्हाला समजले असेल त्यामुळे आता तुम्ही एव्हरेस्ट देखील फोडू शकता इतका आत्मविश्वास निर्माण झाला असेल. बस हाच एक क्षण जो चमत्काराचा असतो ज्यासाठी तुम्ही अनेक वर्षांची मेहनत घेतलेली असते.

असेच छोटे छोटे खिळे म्हणजे आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, ध्यान, सातत्य, एकाग्रता, कठीण परिश्रम, कौशल्य आणि इतर सकारात्मक गुण, आणि हातोडा म्हणजे प्रयत्न ह्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठमोठे दगड फोडून काढता.

आज तुम्ही मशीन वापरून दगडे फोडून घेत असाल म्हणजे मानसोपचार तज्ञ, अध्यात्मिक गुरु, त्या त्या क्षेत्रातील तज्ञ पण ह्यासाठी अगोदर तुम्ही स्वतः कठीण परिश्रम घेतले होते म्हणून आज तुम्ही यशाच्या शिखरावर पोहचलात.

किती सोपे आहे हे तुम्ही खालील व्हिडीओ बघितल्यावर समजेल. लगेच व्हिडीओ बघू नका, पहिले तुम्ही शांत बसून तुमच्या आयुष्यातील संकटे आणि समस्यांची दगडे फोडण्याचा प्रयत्न करा त्यानंतर खालील व्हिडीओ बघा. तुम्ही मला खोटे बोलू शकतात पण स्वतःला नाही.

https://fb.watch/cTpiqVeNbW/

धन्यवाद

अश्विनीकुमार 

Comments