आशेचा किरण मोफत ध्यान साधना

 


आशेचा किरण हा शब्द का वापरला? इथे आर्थिक, खाजगी किंवा सामाजिक परिस्थिती महत्वाची नाही तर अश्या मानसिक परिस्थिती साठी आहे जिथे व्यक्ती पूर्ण हार मानून जातो, म्हणजे मानसिक परिस्थिती. ह्या सर्व लोकांना पैसा किंवा बाकी काही महत्वाचे नसते पण फक्त एक आशेचा किरण पाहिजे असतो, बुडत्याला काडीचा आधार पाहिजे असतो तोच मी देण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला आशा तुम्ही मला यशस्वी कराल.


इथ मी आणि माझी ध्यान साधना घनदाट काळ्याकुट्ट अंधारात एक आशेचा किरण, बुडणाऱ्यासाठी एक काडी आहे. मला माहिती आहे कि एक आशेचा किरण एका व्यक्तीच्या आयुष्यात काय काम करू शकतो ते. कुठलीही सेवा मोफत देण्याच्या पक्ष मध्ये मी नाही आहे कारण जे मोफत देतात त्यांनी नंतर श्रीमंतीचे साम्राज्य उभे केले आहे. पण मानसिकता अशी एक स्थिती आहे जिथे मी समजतो कि जिथे थोडी जरी मदत केली तरी लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतात.


तुम्ही परत या किंवा नका येवू हे महत्वाचे नाही तर तुम्ही तुमचे बहुमुल्य आयुष्य परत पुनर्निर्माण करत जगणे महत्वाचे आहे. त्यामुळे हि ध्यान साधना तुम्ही तुमच्या मनात गुरुदक्षिणा वगैरे काही न ठेवता आरामात करू शकतात म्हणजे मी सर्व तुमच्या मनातील दडपण कमी केले आहेत. इथे डोनेशन मागणार होतो पण तो शब्द देखील मागे घेतला, तुम्हाला कुठल्याही दडपणात टाकायचे नाही. आता तुम्ही आणि तुमचे आयुष्य बस इतकेच.


दररोज एक तास, सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याअगोदर. तुमच्या सोयीनुसार वेळ पाठीपुढे होऊ शकते. कमीत कमी १ वेळेस ध्यान साधना झालीच पाहिजे. २१ दिवसांचे चक्र ठेवा आणि ते पूर्ण करा. २१ दिवसात ध्यान साधनेत कुठेही खंड पडू देवू नका. इथे शोर्टकट नाही आहे, एक तासाला पर्याय नाही आहे, मी जे तुमचे आयुष्य बदल्यासाठी योग्य आहे त्यानुसारच एक तासाची ध्यान साधना सुरु केली आहे.


आशेचा किरण हि ध्यान साधना अशी करा कि ब्रम्हांड हादरले पाहिजे आणि तुमच्या समस्या, संकटे स्वतः येवून दूर केली पाहिजे. हो तुमच्यात हि क्षमता आहे आणि तुम्ही आशेचा किरण हि ध्यान साधना करुन जागृत करणार आहात. सर्व तुमच्या आत आहे तर बाहेर काय शोधत आहात? बाहेर काही नाही भेटणार, स्वतःच्या आत शोधा.


धन्यवाद

अश्विनीकुमार


युट्युब चैनल : https://www.youtube.com/channel/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg


फेसबुक पेज : https://www.facebook.com/मानसशास्त्र-आणि-आकर्षणाचा-सिद्धांत-281324852234592

Comments