यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. ह्या परीक्षेमध्ये अपयशी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन कारण तुम्ही प्रयत्न तरी केला. जे पास झाले, जे पहिल्या क्रमांकावर आले त्यांचे सगळीकडे मुलाखती चालू आहेत पण जे नापास झाले त्यांचे काय? म्हणजे २०२२ मध्ये जागा ८६१ आहेत . ११ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला. ह्यापैकी ५ लाख विद्यार्थी तरी परीक्षा देतीलच. म्हणजे काही वरच्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसाठी उरलेल्या लाखो विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करायचे? तुमचे प्रयत्न वाया गेले नाही जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर जास्तीत जास्ती अजून एकदा प्रयत्न करा व नंतर दुसरा मार्ग अवलंबवा. कमी कमीत एक वर्ष आणि जास्तीत जास्त दुसरे वर्ष पुरेसे नंतर खाजगी नोकरी बघा, उद्योग व्यवसाय करा. तुमचे ज्ञान दुसरीकडे वापरा. विनाकारण डिप्रेशन मध्ये जाण्याची गरज नाही, हे नाही तर ते असे जगा, निसर्ग नियमांचे पालन करा ते म्हणजे सर्व्हाइव्ह साठी प्रयत्न करा.

अश्विनीकुमार

Comments