आकर्षणाचा सिद्धांत आणि जोडीदार शिष्यांच्या यशस्वी अनुभवाद्वारे (नाव बदललेले आहे)

एक व्यक्ती वय २८ जी लग्नाचा प्रयत्न करत होती पण लग्न होत नव्हते.

एक व्यक्ती वय ३२ जिचा घटस्फोट झाला होता.


हे दोघेही माझेच शिष्य. त्या व्यक्तींना आपण मयुरेश आणि रिया असे नाव देवू. मयुरेश हा व्यवसाय करायचा, त्याचा व्यवसाय सुरळीत सुरु नव्हता म्हणून तो माझ्याकडे उपाय मागण्यासाठी आला होता. मयुरेश ने माझा कोर्स केला मी सांगितल्या प्रमाणे तो आयुष्य जगू लागला, सुरुवातीला एक टक्काही फरक जाणवत नव्हता पण जस जसे दिवस पुढे गेले तस तसे त्याची कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला लागली आणि तो वाहत जावू लागला.


एक कुंडलिनी चक्र जागृत झाल्यामुळे त्याला शरीर संबध ठेवण्यासाठी जोडीदार भेटू लागले व तो त्यामध्ये वाहून जायला लागला. आता इथे आयुष्यात प्रवेश होतो तो रियाचा.


रिया हि एक आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कामाला असते. ती माझ्याकडे नकारात्मक लग्न तुटू नये त्यासाठी आली असते पण जेव्हा मी तिला सांगतो कि वेगळे झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण सुरुवातीपासून समस्या होत्या त्यामुळे आहे तसे सुरु ठेवले तर तिला पुढे जावून मानसिक आणि मनोशारीरिक समस्या निर्माण झाली असती, असेच रक्तदाब, निद्रानाश च्या समस्या निर्माण झाल्या होत्या व मधुमेहाची सुरुवात होती.


रिया ने माझा कोर्स केल्यावर आत्मविश्वास निर्माण केल्यावर वेगळे होण्याचा निर्णय घेतला व ६ महिन्यात दोघेही वेगळे झाले. रियाचे पुढील आयुष्य हे आनंदी जावू लागले. एकदा रिया प्रवास करत असतांना तिला स्टेशनरी ची गरज भासली तर तिने गाडी थांबवून स्टेशनरी चे दुकान शोधू लागली. तिला थोडे पुढे जावून मयुरेश चे दुकान भेटले.


त्या वेळेस मयुरेश च्या दुकानात गर्दी नव्हती. रिया मयुरेश च्या दुकानात वस्तू घेत असतांना दोघांचे बोलणे होऊ लागले. बोलणे हळू हळू वाढू लागले व दोघांमध्ये भावना निर्माण झाल्या. एकमेकांचे नंबर घेतले व भेटायचे ठरवले.


मयुरेश च्या आयुष्यात भले समस्या निर्माण होत्या पण तो नकारात्मक झाला नव्हता. एकदा मयुरेश ने तिला घरी बोलावले व ती घरी गेली, ती जेव्हा घरी गेली तेव्हा भले मयुरेश आणि रियाच्या डोक्यात शरीर संबंध ठेवण्याचे विचार होते पण एक घर कसे असावे तिने दाखवून दिले.


रिया ने घरची साफ सफाई केली, घर स्वच्छ केले, घर पूर्ण नीटनीटके वाटू लागले, एकदम सकारात्मकता जाणवू लागली. मयुरेश ने बाहेर जावून खाण्यासाठी काही बनवण्यासाठी रिया ने सांगितलेले सामान आणले व रिया ने दोघांसाठी खायला बनवले. त्यांचे बोलणे सुरु होते, एक छोटीशी पार्टी देखील झाली, म्हणजे वेळ हा खूप आनंदात गेला. त्यांच्यात शरीर संबंध देखील झाले. दोघांचा वेळ आनंदात गेला, रिया तिच्या घरी निघून आली.


असेच काही महिने गेले, रिया आणि मयुरेश ची कंपने अजून सक्षम पणे जुळून आली. रिया ने मयुरेश ला त्याचा व्यवसाय सुरळीत चालवा म्हणून आर्थिक मदत केली, कमतरता तिला जितक्या जमल्या तितक्या दूर केल्या व मयुरेश चा व्यवसाय प्रचंड नफ्यात चालू लागला. काही महिन्यातच मयुरेश ने दुकान दुसऱ्याला चालवायला दिले व तो स्वतः होलसेल मध्ये उतरला.


शेवटी दोघांनी लग्न करायचे ठरवले व लग्न केले. ते आता आनंदी आयुष्य जगत आहेत. ज्यांना वाटत असेल कि स्त्रिया कमी शिकलेल्या मुलांसोबत लग्न करत नाहीत, कमी कमावणाऱ्या मुलांसोबत लग्न करत नाही, अपयशी मुलासोबत लग्न करत नाही, हा गैरसमज आहे.


मी हे नाही बोलत कि त्यांच्या आयुष्यात समस्या नाही येणार, त्या येतीलच पण ते आता त्यांच्यावर आरामत मात करतील ते दोघेही एकमेकांना सांभाळून आहे. आजही मयुरेश हा रिया पेक्षा कमी कमावतो, कमी शिकलेला आहे पण हा कधीही वादाचा विषय झालाच नाही, रियाची प्रगती होतच आहे पण ह्याचा काही त्यांचे नातेसंबंधावर परिणाम झाला नाही.


सर्वकाही शक्य आहे, तुम्ही नकारात्मक आयुष्यातून सकारात्मक आयुष्याकडे आरामात जावू शकता. सकारात्मकता नेहमी जागृत ठेवा, आशावादी बना, काहीतरी चांगले होईल हा विचार करा त्यामुळे मयुरेश आणि रिया जसा भाग्यशाली आयुष्य जगत आहे तसे तुम्ही जगाल. मयुरेश जोडीदार आणि आर्थिक आयुष्यामध्ये भाग्यशाली ठरला तर रिया जोडीदार मध्ये भाग्यशाली ठरली.


जितके सांगायचे आहे तितके महत्वाचे मुद्दे सांगितले आहे, तुम्ही बघा कि आयुष्य किती सोपे असते ते जे आपण कठीण करून टाकतो. कंपने जुळली तरच नातेसंबंध टिकवा नाहीतर तोडून टाका, नकारात्मक नातेसंबंधात राहण्यापेक्षा नातेसंबंधात न राहिलेले बरे.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Comments