६ वर्षांपूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे कोर्स करायला आला होता. तो आयुष्यात सतत अपयशी व्हायचा, कितीही तो योग्य का असेना पण काही ना काही करून अपयशीच व्हायचा. थोडक्यात सांगायचे झाल्यात तर्कच काम करत नाही. सर्व उपाय करून झाले तरीही रिझल्ट काही येत नव्हता. आता हळू हळू त्याच्या मानसिकतेवर परिणाम व्हायला लागला. पण त्याने योग्य निर्णय हा घेतला कि माझ्याकडे कोर्स करून घ्यायचा, त्याला वाटले कि मी देखील इतरांसारखे कोर्स घेतो, काहीतरी त्या संदर्भातच शिकवले जाईल, द सिक्रेट पुस्तक वगैरे लिहिले असेल तेच सांगितले जाईल, ध्यानाचा कुठलातरी प्रकार असेल वगैरे वगैरे.
मी सुरुवातीला कोर्स सुरूच केला नाही, पहिले समुपदेशन केले, समजून घेतले व त्यानुसार त्याला काही उपाय सांगितले सोबत त्याला उपयोगी पडेल असा कोर्स तयार करून शिकवला गेला. पूर्ण वेगळा अनुभव त्याला आला.
जेव्हा तो दीड वर्षांनी माझ्याकडे आला तेव्हा त्याचे आयुष्य हे पूर्ण बदललेले होते, आता तो आंतरराष्ट्रीय कंपनीची, श्रीमंत लोकांची तोटा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनाची कामे घेतो.
हे घडले कसे?
सर्व यश कसे मिळवायचे शिकवतात पण कोणीही अपयशाचा सामना कसा करायचा हे शिकवत नाही.
त्याला नेव्ही सील चे उदाहरण दिले जी अमेरिकेची एक सैन्य तुकडी आहे जसे आपल्याकडे मार्को आहेत तसे. हे जे स्पेशल कमांडर असतात त्यांची ट्रेनिंग प्रचंड हार्ड असते, जीव देखील जातो त्यामुळे इतके सोपे नाही. एक स्पेशल कमांडर तयार करायला सरकारचा प्रचंड पैसा लागलेला असतो त्यामुळे त्याला तयार देखील तसेच केले जाते. हे स्पेशल कमांडर तितकेच महत्वाचे देखील असतात कारण कितीही कठीण प्रसंगात ते काम करू शकतात.
ट्रेनिंग चा मुख्य भाग म्हणजे जिवंत राहणे ह्यावर भर दिला जातो, त्यांना सर्वकाही शिकवले जाते म्हणजे वेळ पडली तर त्यांना लहान ऑपरेशन करून टाके सुद्धा लावावे लागतात. जे उपलब्ध साधने आहे त्यांचा वापर करायला शिकवतात. योद्धा म्हणजे नुसते शत्रूला मारणे नव्हे.
त्यानंतर शिकवले जाते स्वतःला कमीत कमी हानी कशी होऊ द्यायची, स्वतःला वाचवत कसे ठेवायचे ते. सिनेमात दाखवतात तसे नाही कि समोर आले आणि मारायला सुरुवात केली, इथे गोळी कुठूनही येवू शकते, हुशारीने शक्ती असली तरी डोक्याने काम करावे लागते. निसर्ग नियमाचा वापर करतात जसे वाघ शक्तिशाली असून दबा धरून शिकार करतो तसे, ना कि डरकाळी फोडत येतो, मग तर लांबूनच शिकार पळून जाईल व वाघ उपाशी मरेल.
आपला शिष्य अपयशी होतोय ना? मग ठीक आहे तो अपयशी होतांना जास्त हानी नाही होणार ह्यावर मी भर द्यायला सुरुवात केली व सुरुवातीपासून रिझल्ट यायला लागला. जे अपयशामुळे नैराश्य यायचे ते कमी झाले. जे नुकसान व्हायचे ते कमी झाले, जो परत उभे रहायला वेळ जायचा तो कमी झाला. जसे आयुष्य सुरु होते त्यामधून त्याने भरारी घ्यायला सुरुवात केली.
तुम्ही शाओलीन, कुंफू मोंक म्हणजे भिक्कू बघितले असणार ना? त्यांना पडतांना कधी बघितले का? ते पडतांना इजा होणार नाही असे पडतात व तितक्याच वेगाने उठतात देखील. बस हाच नियम मी वापरला आहे. तुम्ही काय मी काय किंव जगातील इतर कुठलीही व्यक्ती काय ती आयुष्यात अपयशी हि होतेच पण अपयशी होतांना ती सांभाळून होते कि नाही हे महत्वाचे आहे.
अपयशी होण्याची कला हि कोणीही शिकवली नाही, जो तो येतो तो यशस्वीच हो हे बोलतो पण अपयश तर यशाची पायरी आहे ना? एक एक पायरी चढूनच तुम्हाला यश भेटणार आहे. इथे तर लहानपणापासूनच यशस्वी व्हा शिकवले जाते जिथे सांभाळून अपयशी कसे व्हायचे, कमीत कमी नुकसान करत अपयशी कसे व्हायचे, परत यश कसे मिळवायचे हे कोणी शिकवतच नाही, असे जर संस्कार लहानपणापासून मिळाले तर हीच मुले पुढे मोठे झाल्यावर अपयशाचा सामना केल्यावर डिप्रेशन मध्ये जातात.
आईच्या पोटातून कोणीही शिकून येत नाही तर शिकवावे लागते, जितकी जबाबदारी आई वडिलांची आहे तीतकीच समाजची सुद्धा.
आपण काय शिकलो?
१) अपयशाला घाबरू नका तर त्यापासून शिका.
२) नुकसान कमी होईल असे अपयशी व्हायला शिका.
३) अपयशाची तीव्रता कमी करणे हे देखील एकप्रकारचे यशच आहे.
३) अपयशी झाल्यानंतर लगेच उठून यशस्वी व्हा.
४) सकारात्मक मानसिकता ठेवा.
५) तज्ञ लोकांची मदत घेत चला.
धन्यवाद
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment