संमोहन शास्त्र, अंतर्मन, अचेत मनाचे शक्तिशाली अनुभव


संमोहन शास्त्र हे एक नैसर्गिक शास्त्र आहे, संमोहन शास्त्र हे आपल्या अंतर्मनावर काम करते. आपले दोन मन असतात, एक अंतर्मन आणि दुसरे बहिर्मन. बहिर्मन म्हणजे आपल्या मनात मेंदूत येणारे दररोजचे विचार आणि अंतर्मन म्हणजे नैसर्गिक रुजलेला जन्मजात कौशल्य अद्भुत शक्ती क्षमता असलेले विचार म्हणजे प्रोग्रामिंग, हे प्रोग्रामिंग एखाद्या समूहासारखे असते, म्हणजे जर एखादी व्यक्ती आरोग्यदायी आयुष्य जगत असेल तर तिच्या अंतर्मनात फक्त ध्यान नाही तर ध्यान, व्यायाम, आहार आणि चांगल्या लोकांची संगत ठेवणे असे सामुहिक विचार रुजलेले असतात तेव्हा कुठे जावून ती व्यक्ती आरोग्यदायी आयुष्य जगते ना कि फक्त एकाच विचाराने.


काहींमध्ये अंतर्मनात विचार रुजवण्याची काढण्याची क्षमता हि जन्मजात असते तर बाकी संमोहन शास्त्राने हि क्षमता जागृत करतात किंवा संमोहन उपचार घेवून तात्पुरते उपचार करतात.


माझ्या एका शिष्याचे अनुभव मी इथे शेअर करत आहे.


माझ्याकडे एक शिष्य ६ महिन्यांपूर्वी संमोहन शास्त्र शिकण्यासाठी आला होता, तो क्वालिटी कंट्रोल चे काम करत होता, त्याचे काम हे फक्त भारतापुरते होते. कामात काही समस्या नाही पण त्याचे बालपण आई वडील असतांना सुद्धा नकारात्मक गेले कारण आई वडील हे दोन्ही नकारात्मक होते, त्याने स्वबळावर त्याचे आयुष्य हे पुन्हा उभे केले व वेगळे राहू लागला. त्याला लग्नासाठी संमोहन शास्त्र शिकायचे होते जेणेकरून जोडीदार चांगला भेटावा कारण त्याने त्यांच्या आई वडिलांचा संसार आणि मुलावर होणारे नकारात्मक परिणाम हे बघितले होतेच आणि असे परत न घडण्यासाठी संमोहन शास्त्र कोर्स शिकायचा होता.


मी सुरुवातीला शिष्याला बोललो कि पहिले नकारात्मक विचार बाहेर काढू आणि जर विचारांचे रुपांतर हे विश्वासात झाले असेल तर कोर्स आणि उपचार हे सोबत ठेवावे लागतील. कोर्स आणि उपचार हे सोबत ठेवले, त्याचा फायदा खूप झाला कारण काही विचार होते तर काहींचे रुपांतर हे विश्वासात झाले.


"आई वडिलांना कळकळीची सूचना कृपया मुलांच्या मनात लहानपणापासून नकारात्मक विचार बिंबवू नका कारण मोठे झाले कि त्याचे विश्वासात स्वभावात रुपांतर होते आणि तुमचा मुलगा नकारात्मक आयुष्य जगायला लागतो, हात जोडून विनंती आहे कृपया गर्भ संस्कार, वयोगटाप्रमाणे संस्कार करत रहा. इथे तज्ञांची मदत घ्या, प्रचंड फायदा होईल."


नकारात्मक विचार आपण पहिल्या संमोहन शास्त्राच्या कोर्स मध्ये किंवा उपचार सेशन मध्ये कधी शकतो पण जर नकारात्मक विचारांचे रुपांतर हे विश्वासात झाले असेल तर २ किंवा त्यापेक्षा जास्त सेशन किंवा उपचार घ्यावे लागतात आणि इथे सातत्य खूप महत्वाचे आहे. संमोहन शास्त्राद्वारे एक विचार काढणे, विचारांची शृंखला काढणे, एक विश्वास काढणे आणि विश्वासाची शृंखला काढणे ह्यामध्ये फरक आहे, एक विचार काढायला कमी कालावधी लागतो तर विचारांची शृंखला काढायला थोडा जास्त, एक विश्वास काढायला अजून जास्त तर विश्वासाची शृंखला काढायला त्यापेक्षा जास्त, सुरुवातीपासून कोर्स आणि उपचारामध्ये सातत्य असेल तर टप्प्या टप्प्याने ३ महिन्यात तुम्ही तुमच्या अंतर्मनाची पूर्ण सकारात्मक प्रोग्रामिंग करू शकता.


शिष्याला अनेक मनात शंका होत्या कि तो संमोहन शास्त्र कोर्स शिकू शकणार कि नाही, समस्या दूर होणार कि नाही, पण जेव्हा कोर्स सुरु झाला तेव्हा त्याच्या सर्व शंका दूर झाल्या कारण मी शिष्याला समजेल अश्या सोप्या पद्धतीने समजावून कोर्स शिकवत होतो व त्याच क्षणी त्याच्या सर्व शंका दूर करत होतो, सुरुवातीपासून रिझल्ट आला, आता दुसरा दिवस त्या मध्ये २३ तासांमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या मी दूर केल्या. इथे संमोहन शास्त्र शिकवत देखील होतो सोबत तो आयुष्यात वापर कसा करत आहे हे देखील बघत होतो.


अगदी कोर्सच्या तिसऱ्या दिवशी शिष्याला इतका मानसिक आराम मिळाला कि विचारूच नका, अक्षरक्ष तो खुश होता, जे अशक्य वाटत होते ते शक्य झाले, जीवन जगण्याची एक नवीन उमेद जागी झाली, शिष्याला एक समजले कि जर घरचे साथ देत नसतील तर गुरूंच्या सहाय्याने आपले नवीन सकारात्मक जीवन सुरु करू शकतो, सर्व नकारात्मक संस्कार काढून टाकू शकतो. नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आयुष्य जगा, तुम्ही ठरवले तर जग तुमचे कुटुंब बनते.


शिष्याला अंतर्मनात जाण्याचा अनुभव काय असतो तो समजला, विश्वास बसला कि त्याचे म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे अंतर्मन किती शक्तिशाली आहे आणि किती अद्भुत क्षमता त्यामध्ये दडल्या आहेत ते. जेव्हा आम्ही मुख्य करिअर वर लक्ष केंद्रित करत होतो तेव्हा शिष्याने पूर्ण कल्पना केली होती कि त्याला काय काय करायचे  आहे व मार्ग कुठला असेल, ध्येय देखील ठरवले होते. अगदी तंतोतंत तो ध्येय साध्य झाले आहे हे बघत होता, सूक्ष्म च्या सूक्ष्म निरीक्षण तो करत होता. आणि काही महिन्यातच तो युरोप च्या एक देशात पोहचला, सर्वकाही त्याने अंतर्मनात बघितले होते, स्वप्न बघितले होते ते सत्यात उतरले होते.


शिष्याला तेथील वातावरण, स्थानिकांच्या बोली भाषा, संस्कृती असे लहान सहान सर्वांचे अतिसूक्ष्म अनुभव घेतले होते ना कि फक्त वरच्या वर. फक्त विचार नाही तर शरीराला ते जाणवत होते, जर तेथे थंडी असेल तर इथे शिष्याचे शरीर थंड पडलेले असायचे, जर उन्हाळा असेल तर इथे शरीर गरम व्हायचे, कधी कधी बोलतांना त्या देशातील नागरिक मराठी कशी बोलतील अगदी तसे शब्द बाहेर पडायचे. हे शक्य कसे झाले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? कारण जी व्यक्ती नकारात्मक घरात वाढते अपवाद सोडून तिला स्वप्ने देखील नकारात्मक पडतात, सकारात्मक विचार करायलाच खूप त्रास होतो तर असे शक्य कसे होऊ शकते?


तुम्हाला पडलेला प्रश्न हा योग्यच आहे कारण वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध देखील झाले आहे पण सोबत जर मानसिकता बदलली तर व्यक्ती आरामात तिचे आयुष्य बदलू शकते हे देखील संशोधनात सिद्ध झाले आहे. आपण आपली मानसिकता स्वतःहून किंवा संमोहन शास्त्र, आकर्षणाचा सिद्धांत शास्त्र ह्यांचा वापर करून बदली शकतो. संमोहन शास्त्रात सूचना ह्या अंतर्मनात रुजवल्या जातात तर आकर्षणाचा सिद्धांत मध्ये पेशी स्तरावर रुजवून स्वतःला चुंबक बनवून आकर्षित केले जाते.


तुमच्यासाठी संमोहन शास्त्राचा लहानसा सराव देत आहेत त्याचा वापर करून तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता. सोपे आहे.


पहिली लिंक


https://www.youtube.com/watch?v=nDkVb_cOkQo


दुसरी लिंक


https://www.youtube.com/watch?v=ytn2jD9bgJc


जर नाही जमले तर आपला कोर्स ऑनलाईन उपलब्ध आहे त्याचा तुम्ही लाभ घेवू शकता. फॉर्म लिंक खाली दिली आहे.


https://bit.ly/3dRYP5g

Comments