मानसिक आरोग्य हे काय आहे?
मानसिक आरोग्य म्हणजे सोप्या भाषेत समजायचे झाल्यास आपले विचार काय आहेत? भावना कुठच्या निर्माण होतात? व्यायाम ध्यान आणि आरोग्यदायी आहार करता कि नाही, उस्ताह वाटतो कि नाही? तुमचा जसा स्वभाव आहे त्यानुसार तुम्ही वागता कि नाही? तम्ही समजूतदार आहत कि नाही? तुमची तुमच्या भावना व्यक्त करू शकता का? जर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हि हा असतील तर तुम्हाला कुठलीही मानसिक समस्या नाही आहे, तुमचे मानसिक आरोग्य उत्तम आहे. जर वरील प्रश्नाची उत्तरे नाही असतील तर तुम्हाला मानसिक समस्या आहे व तुम्हाला त्यावर उपचार करावे लागतील.
माझ्याकडे उपचाराला आलेल्या व्यक्तीचे उदाहरण देऊन सांगतो. ती व्यक्ती हि भावनिक दृष्ट्या हळवी होती, एकदा तिचा तरून वयात सर्व नातेवैकांसमोर अपमान झाला व तो वयाच्या ५० वर्षापर्यंत तसाच होता, ह्या मानसिक समस्येचे रुपांतर हे मनो शारीरिक आजारात झाले होते, डिप्रेशन फोबिया, एंझायटी मध्ये झाले होते. ह्यामुळे डोके दुखीचा आजार झाला होता व त्यावर समस्या नाही समजल्यामुळे अर्ध शिशी आजाराचा उपचार सुरु होता.
जेव्हा समुपदेशन सेशन सुरु झाले तेव्हा त्याच्या पूर्ण भावना व्यक्त केल्या, त्याच्या मनात काहीही ठेवले नाही. जस जसे सेशन पुढे जावू लागले तसतसे त्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधार दिसू लागला, झोप पूर्ण व्हायला लागली, डोके दुखी एकदमच कमी झाली, पोटाचे आजार बरे झाले व काही दिवसातच ती व्यक्ती पूर्ण बरी झाली.
हा मनोशारीरिक आजार का झाला असेल?
आता समजा एक व्यक्ती आहे जिची पचनक्षमता उत्तम आहे तिने कितीही खाल्ले तरी कसलेही आजार होत नाही. सर्वकाही पचून जाते. आता इथे दुसरी व्यक्ती आहे, जिची पचनक्षमता हि कमजोर आहे व जास्त खाल्ले किंवा काहीही खाल्ले कि पोट खराब होते. हे अनुवांशिक किंवा जन्मजात बोलू शकतो ह्यामुळे ह्या जगातील कुठल्याही व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हि वेगवेगळी असते. मग आजारी न पडण्यासाठी कमजोर पचनक्षमता असलेल्या व्यक्तीला योग्य आहार घ्यावा लागतो. असेच काही मानसिकतेचे देखील आहे.
वर पचन क्षमतेचे उदाहरण दिले आहे त्यानुसार आपल्या सर्वांच्या मानसिकतेचे देखील विविध प्रकार असतात. एखादी व्यक्ती असेल जिला कितीही काहीही बोलले तरी फरक पडत नाही ती तिचेच आयुष्य आरामात जगत असते तर दुसरीकडे दुसरी व्यक्ती हि तिच्या हळव्या स्वभावाच्या तीव्रतेनुसार काही शब्द मनाला लागले तर जखम करून जाते किंवा आत्महत्या करतात. इथे आपण असे बोलू शकत नाही कि मी असलो असतो तर असे नसते केले म्हणून. मानसिकता एक व्यक्ती नाही तर समाजाने मिळून सांभाळावी लागते, एकमेकांना सांभाळून घ्यावे लागते.
आता ह्यावर उपचार काय आहेत?
समुपदेशन, जवळील मानसोपचार तज्ञांकडे जावून तुम्ही उपचार करू शकता. कमीत कमी ३ सेशन तरी करा आणि जास्तीत जास्त मानसोपचार तज्ञ सांगतील तितके सेशन करा, ह्यामुळे तुम्ही पूर्ण बरे व्हाल. ऑनलाईन समुपदेशन पाहिजे असेल तर लेखाच्या शेवटी मी फॉर्म लिंक देईल.
जर समस्या तीव्र असतील तर मनोविकार तज्ञ ह्यांच्याकडे जावे लागते, इथे तुम्हाला औषधे आणि गोळ्या दिल्या जातात व ह्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरु कराव्या लागतात व बंद कराव्या लागतात, ह्यांची सवय लावून घ्यायची नाही.
ध्यान, संमोहन, योगा, व्यायाम आणि घरचा आहार केल्याने देखील तुमचे मानसिक आरोग्य हे निरोगी राहते. ध्यानामध्ये विविध प्रकार आहेत तुम्ही तुम्हाला जो काम करेल तो वापरा, व्यायाम तुम्ही तुम्हाला सूट होईल तो कराल, इथे हृदयाची गती वाढली पाहिजे असा व्यायाम पाहिजे. आहार जितका जास्त होईल तितका घरचा कराल. जे कराल ते मनापासून कराल. मन त्यामध्ये गुंतले पाहिजे. आकर्षणाचा सिद्धांत आणि संमोहन शास्त्र ऑनलाईन शिकण्यासाठी मी लिंक खाली देत आहे.
व्यक्त व्हा मुक्त व्हा व आत्मविकास हे दोन्ही मोफत उपक्रम मी घेवून येत आहे त्याचा तुम्हाला लाभ होईल.
आता महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे मानसिक आरोग्य वर सांगितल्याप्रमाणे सर्व करूनही सुधरत नसेल तर तुम्ही तपासा कि समस्या तुमच्यात आहे कि बाहेर जसे कि व्यक्ती आणि परिस्थिती मध्ये, जर समस्या बाहेर असेल तर त्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा ते देखील कायमस्वरूपी, परिस्थिती मधून बाहेर पडा. सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा, नकारात्मक व्यक्ती घरची असली तरीही तिला आयुष्यातून बाहेर काढा, तुम्ही सवय बदलू शकता आणि स्वभाव नाही.
स्वतःचे मानसिक आरोग्य जपा.
समुपदेशन
https://bit.ly/3Qmvxdl
आकर्षणांचा सिद्धांत
https://bit.ly/3CFLKWJ
संमोहन
https://bit.ly/3dRYP5g
युट्युब चैनल ध्यान हिलिंग साठी
https://www.youtube.com/channel/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg
धन्यवाद
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment