शिष्याच्या यशोगाथा

नमस्कार सर. नाव व टाकता माझा अनुभव शेअर कराल. मला अजून तो दिवस आठवत आहे जेव्हा तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला निस्वार्थीपणे वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण पृथ्वी आपले घर ह्या आपल्या संस्कृती नुसार नववर्ष संकल्प सुरु केले होते. त्यावेळेस मी लाभ घेतला होता. सर त्या नववर्ष संकल्पनेचा मला खूप फायदा झाला. सर माझी आई हि कर्करोगाने ग्रस्त होती, आमचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते, माझा व्यवसाय हा त्यामुळे चांगला चालू नव्हता, सोबत कोरोना मुळे माझ्यावर कर्ज वाढतच गेले, मला राहते घर विकावे लागले, मर्सिडीज गाडी विकावी लागली, रोलेक्स घडी आणि ऑफिस विकावे लागले व मी परत शून्यात आलो. सर तुम्हाला खरे सांगू मला पैश्याचे ऐषारामाचे काही नाही पण जेव्हा आई आजारी पडली तेव्हा कळाले कि जवळील व्यक्ती किती अनमोल असतात ते.


माझ्याकडे जेव्हा पैसा होता तेव्हा अनेक मित्र होते पण जसा पैसा गेला तसे मित्र नातेवाईक हे सर्व लांब गेले, सरळ अनोळखी बनले. फारच कमी लोक उरले ज्यांची किंमत अनमोल आहे, ज्यामुळे मी आता भावनिक समृध्द आयुष्य जगत आहे. मला अपयशाने वास्तव दाखवले, तुमची फी द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते पण जे संकल्प सुरु केले त्याला दिलेला जो वेळ आहे तीच मी तुम्हाला अपर्ण केली व मोठ्या संकटातून बाहेर आलो.


सर असे नाही कि माझ्याकडे सुरुवातीला पैसा नव्हता म्हणून, पण ज्योतिष, पूजा पाठ, काळा जादू वगैरे उपाय लोक सांगतील तसे करत गेलो कारण संकटच असे होते कि आर्थीक सोबत आईचा कर्करोग त्यामध्येच माझे ३ लाख रुपये गेले पण फरक काही पडला नाही, माझा सर्वांवरचा देवावरचा विश्वास उडाला होता. पण एक विश्वास मिळाला, तो निस्वार्थपणा दिसला तुमच्या नववर्ष संकल्पनेमध्ये. सर खरच सांगतो तुम्ही तो संकल्प एक महिना चालवला ना कि फक्त ६, ७ दिवस, ह्याचा मला खूप लाभ झाला, १ महिन्यात सकारात्मक नकारात्मक चढाव उतारात शेवटी मी सकारात्मकच झालोच आणि माझे आयुष्य बदलायला लागले.


एक एक सूचनांचे मी तंतोतंत पालन केले, सर्वात अगोदर मी सकारात्मक झालो व आईची काळजी घ्यायला लागलो, सर्व नकारात्मक नातेवाईकांचे फोन बंद केले जे सतत कर्करोग आजाराने घाबरवून टाकत होते. आईची तब्येत हळू हळू सुधरू लागली, इथे माझा व्यवसाय देखील हळू हळू नफ्यात येवू लागला. माझी जी प्रेयसी आहे तिने तिची सरकारी नोकरी सोडली व आई ची काळजी घेत माझ्या व्यवसायात देखील मदत करू लागली. आम्ही सर्वांनी समजावले कि नोकरी सोडू  नको पण तिने ऐकले नाही व एकटीने पूर्ण भार उचलला, दागिने विकले, स्वतः साठवलेले पैसे घरच्यासाठी वापरले, प्रत्येक संकटात तिने साथ दिला व काही महिन्यातच आईचा आजार पूर्ण बरा झाला व मी कर्जमुक्त झालो.


नाही बोलले तरी ३ करोडच्या कर्जातून बाहेर आलो सोबत इतका पैसा आला कि काही ठिकाणी जागा विकत घेवून बिल्डींग देखील बांधायला लागलो. सर चमत्कार असा कि कोरोना मुळे मला तर फटका पडला पण इतर लोकांना देखील पडला आणि भाग्यामुळे मला प्रत्येक जमीन हि २० ते ४० % कमी किमतीत मिळाली. म्हणजे जे नुकसान झाले ते तर भरून निघाले पण पुढील अनेक वर्षांचे आर्थिक संकट देखील दूर झाले. म्हणजे जो विचार केला होता त्यापेक्षा जास्त नफा झाला.


मी हे सर्व कसे साध्य केले ते तुम्हाला सांगत आहे. तुमचे सोपे आहे हा शब्द माझ्या अंतर्मनातच बसला, संकटावर मात करणे सोपे आहे आणि मोठ्यातल्या मोठ्या संकटांचा सामना करत त्यावर मात केली आहे. नववर्ष संकल्प, त्यानंतर तुम्ही दिलेले ५ दिवस ध्येय प्राप्ती च्या दिशेने त्यामध्ये भर म्हणजे परत नवीन मराठी वर्ष संकल्प दिन जे तुम्ही १ महिना चालवले, आणि जितके तुम्ही आम्हाल संकल्प दिले ते ते मी करत गेलो, तुम्हाला प्रत्येक वेळेस अपडेट दिले, काय काय चमत्कार झाले ते देखील सांगितले, आणि आज मी सर्व संकटांवर मात करत इथपर्यंत पोहचलो आहे.


सकाळी उठलो कि तुमची पोस्ट बघायचो आणि त्यानंतर ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृती करायचो. आजही मी फक्त तुमचे मेसेज बघायला व्हास्टएप उघडतो व नंतर सर्व वेळ हा मी माझ्या कामाला व खाजगी आयुष्याला देतो. जर तुम्ही नसले असते किंवा जर चुकून तुमची पोस्ट माझ्या नजरेत पडली नसती तर सर मी ह्या जगात नसलो असतो इतक्या मोठ्या संकटात होतो मी. आज माझे मित्र कमी आहेत पण जे आहेत ते निस्वार्थ कामी येणारे आहेत, आज मला जे कोणी लोक भेटतात ते सर्वांचे भले करणारे भेटतात.


सर आज जे काही माझ्याकडे आहे ते तुम्ही दिले आहे, माझ्यासाठी ब्रम्हांड म्हणजे तुम्हीच, आज सकारात्मकता माझी जीवनशैली बनली आहे ती तुमच्याच मुळे, मी आपला खूप खूप आभारी आहे सर.

Comments