मी संमोहन शास्त्र संदर्भात काही वर्षांपूर्वी पोस्ट केली होती ती वाचून एक फोन आला होता. समोरील व्यक्ती हि सतत विचारत होती कि किती दिवसात फरक पडणार? संमोहन शास्त्र काम करते काय? ह्यागोदर केले होते तर पैसे वाया गेले होते वगैरे वगैरे. मी त्या व्यक्तीची भावना समजू शकतो, तो कुठल्या समस्येमधून जात हे हे काही मला समजले नाही पण तो जो काही उपाय करत होता ते उपाय काम करत नव्हते.
शेवटी मी एकच उपाय दिला कि तुम्ही समुपदेशन करून घ्या. जसे समुपदेशन सुरु झाले तसे समजले कि ती व्यक्ती अनेक वर्षांपासून नकारात्मक आयुष्य जगत होती, तिच्या घरी वातावरण देखील तसेच, त्यामध्ये नशीब इतके वाईट कि आई वडील देखील नकारात्मक, म्हणून मी बोलत असतो कि आई वडिलांची देव म्हणून पूजा नका करू ते देखील मनुष्यच आहे, कोणाच्या घरात कुठली परिस्थिती असेल सांगता येत नाही. अनेकदा आई वडिलांसाठी मुलं सोफ्ट टार्गेट असतात. म्हणून जे चांगले आहे त्याला चांगलेच बोला व वाईट आहे त्याला वाईट, ह्यामुळे तुम्ही अनेक आत्महत्या थांबवू शकतात.
लहानपणापासून ते वयाच्या ४० शी पर्यंत नकारात्मक आयुष्य, त्यामध्ये उपाय केले ते काम केले नाही, कसे काम करणार? तीथे तर कोर्स विकला गेला ना कि समस्या दूर करण्यासाठी. जेव्हा समुपदेशन झाले तेव्हा ती व्यक्ती रडली, मर्द को दर्द होता है, जे काही घडले ते सर्व सांगत होता, लहापणापासून सतत नकारात्मकता भरवली जात होती, आई वडिलांनी आत्मविश्वास हा ठेवलाच नाही. विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे कि जसे आई वडील लहानपणी विचार भरवतील तसेच आयुष्य मुलं पर्यंत जगतील, मुलं जन्माला घालणे सोपे आहे पण वाढवणे कठीण. काळ बदलला आता वास्तव वैज्ञानिक पुराव्यानिशी उपलब्ध आहे.
जस जसे समुपदेशन सेशन पुढे जात गेले तस तसे हळू हळू बदल होत गेले. ४ महिन्यात ४० वर्षांच्या नकारात्मकतेवर त्या व्यक्तीने स्वतःहून मात केली, स्वताहून? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? मी भले मार्ग दाखवत असेल तरी त्या मार्गावर चालायचे त्याच व्यक्तीला आहे ना? जर आता मी हात पकडून त्याला चालवले तर तो माझ्यावर अवलंबून राहील मी माझीच पूजा करत बसेल, मला अपंग शिष्य आणि विद्यार्थी चालत नाही, यशस्वी किंवा अयशस्वी तो तोडीस तोड झाला पाहिजे किंवा माझ्या पुढे गेला पाहिजे. जो कधीच अयशस्वी झाला नाही त्यावर कधीही विश्वास ठेवू नका. जास्त जिवंतपणा आणि शिकण्यासारखे तुम्हाला अयशस्वी लोकांकडे मिळेल ना कि यशस्वी. आयुष्यात कसलीही हमी येत नाही.
सुरुवात हि सातत्यापासून केली, तेच तेच बोलणे सुरु असायचे, सुरुवातीला काहीच बदल दिसत नव्हता पण सातत्य राखण्याचे ठरवले होते. महिन्याला १० सेशन झाले, न चुकता. सातत्य आले, आणि बदल दिसू लागला. पुढील महिन्यात आत्मविश्वास वर काम करायला घेतले, आता ह्या महिन्यात ८ सेशन मध्ये आत्मविश्वास आला. आता मुख्य समस्या होती ती मानसिकता तर थोडीफार बदलली आता हि मानसिकता आणि जग ह्याचे सांगड घालणे महत्वाचे आहे, कटू अनुभव पचवता येणे महत्वाचे आहे नाहीतर आहे तिथेच ती व्यक्ती पोहचली असती.
इथे जावून जावून नाही बोलले तरी २ महिने गेलेच. सोपे नाही, जो प्रयत्न करत असतो त्यालाच माहिती असते कि किती त्रास होतो ते, इथे हे बोलणे नाही चालत कि मी असलो असतो तर असे तसे वगैरे, ज्याचे जळते त्यालाच कळते. पण बदल हा झालाच, सातत्य आणि आत्मविश्वास ह्यांची सांगड बसली आणि जगाचा सामना करण्यासाठी ती व्यक्ती तयार झाली. त्या व्यक्तीला कळाले कि वसुधैव कुटुंब चा अर्थ कळला, चांगली लोक आयुष्यात यायला लागली, वाईट लोकांची पारख करता येवू लागली.
इथे काही कठोर निर्णय घ्यावे लागले, घर सोडावे लागले, जोडीदार हा नकारात्मक होता तर त्याला घटस्फोट द्यावा लागला, नंतर चांगला जोडीदार भेटला व जीवन स्वर्ग झाले. आता तो सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे. जो भूतकाळ होता तो आठवणीत राहणारच पण त्याची तीव्रता हि पूर्ण गेली, जे भूतकाळ आठवल्यावर तणाव नैराश्य यायचे डिप्रेस व्हायचा ते होणे पूर्ण बंद झाले व सकारात्मक भावनांना संपूर्ण शरीर साथ द्यायला लागले.
नवीन सकारात्मक आयुष्य, नवीन सकारात्मक दृष्टीकोन, नवीन सकारात्मक लोक आणि नवीन सकारात्मक जीवनशैली.
४० वर्षांच्या नकारात्मक आयुष्यावर मात करण्यासाठी ४ महिन्यात समुपदेशन वेळ लागला ३८ तास, सकाळ संध्याकाळ एक एक तास ध्यान व सकारात्मक विचार साठी वेळ लागला २४० तास, एकूण २७८ तास. वाया गेलेला वेळ ४० वर्षे म्हणजे ३,५०,४०० तास, ज्यावर २७८ तासात मात करण्यात आली, बघितले ना सकारात्मकते मध्ये किती शक्ती आहे ते. खर्च आला तो फक्त ७६०० रुपये, कालावधी लागला फक्त ४ महिने. आज जी व्यक्ती माझ्याकडे संमोहन कोर्स शिकत आहे. पैश्याने तुम्ही इच्छाशक्ती, सातत्य विकत घेवू शकत नाही ते तुम्हाला निर्माण करावे लागते. नुसते पैसे देवून सकारात्मक लोक आयुष्यात येत नाहीत तर तुम्हाला सकारात्मक बनावे लागते, वेळ प्रसंगी नकारात्मक लोकांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढावे लागते हे सर्व करावे लागते, त्यामुळे होणारा त्रास देखील सहन करावा लागतो. मस्करी नाही अति भावनिक लोकांना प्रचंड त्रास होतो, हृद्य विकाराचा त्रास देखील होऊ शकतो.
सोपे नाही ह्याचा अर्थ कठीण आहे म्हणून करायचे नाही असा नाही आहे. मी काही मुद्दे खाली देत आहे त्याचा तुम्ही वापर करून तुमचे आयुष्य आरामात बदलू शकता.
१) सकारात्मक बदल घडवा.
२) सातत्य ठेवा.
३) एक एक आठवड्याचा टार्गेट ठेवा.
४) सकारात्मक दिनचर्या बनवा व ती फोलोव करा.
५) नकारात्मक लोक आणि वातावरणापासून लांब जा. जर सकारात्मक भेटत नसेल तर एकटे रहा.
६) कठोर निर्णय घ्या.
७) सकारात्मक जीवनशैलीचे संरक्षण करा.
८) तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहा.
९) मदत मागायला लाजू नका.
१०) आशावादी बना.
सोपे आहे, तुम्ही वरील उपाय करा, जवळील मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन करून घ्या व आपले अनुभव शेअर करा मग बघा कसा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतो ते. जर मदत लागली तर मी आहेचच, तुम्ही एकदा स्वतःहून प्रयत्न तरी करून बघा. आयुष्य जगणे सोपे आहे.
जे अंतर्मनात आहे तेच बाहेर आहे, अंतर्मन बदला आयुष्य बदलेल.
- संमोहन तज्ञ अश्विनीकुमार
Comments
Post a Comment