उदाहरणार्थ आर्थिक आयुष्य
तुमच्या आयुष्यात पैसा मग तो कुठल्या स्वरुपात का असेना तो कसा येतो? त्यासाठी आकर्षित होतो कि मेहनत करावी लागते? जर आकर्षित होत असेल तर तुमची कंपने आणि उर्जा हि पैश्यांसोबत जुळून आली आहे जर आकर्षित होत नसेल आली प्रचंड मेहनत करून देखील पैसा येत नसेल तर तुमची कंपने हे समृद्धी श्रीमंती सोबत जुळून आलेली नाही.
श्रीमंती आणि समृद्धी सोबत कंपने जुळवून आणण्यासाठी काय करायचे?
सोपे आहे, पहिले तुमच्या अंतर्मनात समृद्धी आणि श्रीमंतीचे विचार रुजवायचे, मग त्यांचे भावनेत व त्यानंतर कंपनांत रुपांतरीत होऊ द्यायचे मग ती कंपने शरीराबाहेर निघून ब्रम्हांडाशी जुळून येतील.
बस इथे कंपने जुळून आली कि तुमच्या आयुष्यात तुम्ही जसा समृद्धी आणि श्रीमंतीचा प्रवाह मागितला असेल अगदी तश्याच प्रकारे श्रीमंती आणि समृद्धीचा प्रवाह तुमच्या आयुष्यात येईल.
इथे नेहमी लक्ष्यात ठेवा तुम्ही जे मागाल आणि जसे मागाल तसेच तुम्हाला भेटेल म्हणून नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनच मागा. चुकुनही एकही नकारात्मक विचार गेला तर तसेच तुम्हाला मिळेल.
मी कठीण परिश्रम करेन तरच सुखी समृद्धी आयुष्य जगेल, समृद्ध आणि श्रीमंत आयुष्य जगणाऱ्या लोकांना कौटुंबिक सुख भेटत नाही, मुले बिघडतात वगैरे वगैरे असे कुठलेही कंपने हि तुम्हाला ब्रम्हांडात सोडायची नाहीत नाहीतर तुम्हाला तसेच आयुष्य आकर्षित करून भेटेल.
फक्त महत्वाचे सकारात्मकता आणि अमर्याद लक्ष्यात ठेवा, इथे कुठेही अडथळा आणू नका आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगा.
आपले अनुभव शेअर कराल
धन्यवाद
अश्विनीकुमार




Comments
Post a Comment