तुम्ही संकटे आणि समस्यामधून जात आहात?

तुमच्यासाठी पुढील आकर्षणाच्या सिद्धांताच्या सूचना ज्या तुम्हाला सलग २१ दिवस फोलोव करायच्या आहेत.


प्रयत्न करणे कधीही थांबवायचे नाही. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणे.


स्वतःवर विश्वास ठेवणे कधीही थांबवायचे नाही. काहीही झाले तरी स्वतःवर विश्वास ठेवणे थांबवू नका, मनुष्य आहे चुकतोच, त्यापासून शिका, जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत नव नवीन अनुभव येतच राहतील.


एक सकारात्मक विचार कधीही तुमचे आयुष्य बदलू शकतो. तुम्ही कितीही मोठ्या संकटात का असेना समस्यांच्या चक्रव्यूहात का अडकले असेना ह्या मध्ये नकारात्मक विचर तर कामाचेच नाही तर सकारात्मक विचारच कामाचे आहे त्यामुळे सकरात्मक विचारांवरील विश्वास ढळू देवू नका.


मदत, मार्गदर्शन आणि सल्ला मागायला लाजू नका, मन मोकळे करायला लाजू नका, जवळ तशी व्यक्ती नसेल तर तज्ञांची मदत घ्याल. ब्रम्हांडाकडे तुम्हाला जे पाहिजे ते मागायला लाजू नका. प्रत्येक व्यक्ती हि वेगवेगळी असते व तिच्या आवडी निवडी सुद्धा त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा ना कि जगाचा.


आभार मानायला विसरू नका. आभार मानाने हे एक प्रकारे आपण ब्रम्हांडाशी कनेक्ट होणे आहे. ब्रम्हांडाचे, गुरूंचे, निसर्गाचे, देवांचे तुमचा ज्यावार विश्वास आहे त्यांचे आभार मना. चांगले अनुभव आले तर आभार मानणे सोपे आहे पण वाईट अनुभव आले व जेव्हा आपल्याला समजले कि पुढे मोठे संकट आहे व तिथून आपण माघारी फिरतांना देखील सर्व शक्तींचे आभार मानायचे. रस्त्यात अडथळे येतच जातील, तुम्हाला फक्त रस्ता बदलत जायचे आहे किंवा त्यावरून जायचे आहे आणि जे अडथळे टाळू नाही शकत त्यांना आयुष्याच्या रस्त्यावरून हटवायचे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

 

Comments