आकर्षणाचा सिद्धांत सर्वांच्या आयुष्यात एकसारखा काम करतो. आकर्षणाचा सिद्धांत हे बघत नाही कि तुम्ही गरीब आहात कि श्रीमंत जर तुमची कंपने ब्रम्हांडाशी जुळत असतील तर ब्रम्हांड तुम्हाला जे पाहिजे ते देत जाईल, आकर्षणाचा सिद्धांत जर तुमची जीवनशैली असेल तुम्हाला विशेष मेहनत करायची गरज नाही, प्रत्येक क्षण तुम्ही चमत्कारिक आणि भाग्यशाली आयुष्य जगाल.

एक गरीब व्यक्ती त्याला खायला प्यायला मिळते, गरजेपुरते पैसे मिळतच जातात, जिथे जास्त पैश्यांची गरज असते ती देखील पूर्ण होत असते, खाजगी, व्यवसायिक आणि सामाजिक आयुष्य समृद्धीने जगत असते, साथ देणारा जोडीदार देखील असतो, मित्र देखील असतात आणि चार चौघात आदर देखील मिळत असतो. म्हणजे जे पाहिजे ते मिळत जाते. ह्याला बोलतात जीवनशैली.

अश्याच पद्धतीने एक श्रीमंत व्यक्ती आयुष्य जगत असते, तिला देखील सर्वकाही मिळत जाते, आकर्षित होत जाते. अश्याच पद्धतीने एक व्यक्ती न बरा होणारा आजार बरा करून टाकते, अश्याच पद्धतीने एक व्यक्ती जोडीदार आकर्षित करत जाते, अश्याच पद्धतीने सकारात्मक लोक त्यांना जे पाहिजे ते मिळत आयुष्य जगत असतात. हि आकर्षणाचा सिद्धांत ज्याच्या आयुष्यात काम करतो सर्वांची जीवनशैली आहे.

ह्या विरुद्ध आकर्षणाचा सिद्धांत काम करत नाही अश्या लोकांचे आयुष्य असते, मग तो गरीब असला तर अजून खोलात जातो व श्रीमंत असला तरी अजून खोलात जातो. आजारपण बरे होत नाही, उद्योग व्यवसाय वाढत नाही, नोकरी भेटत नाही किंवा कमी पगार आणि जास्त कामाची मिळते, मित्र नसतात, जोडीदार भेटत नाही व चार चौघात कोणीही विचारत नाही.

माझ्या संपर्कात असे बरेच श्रीमंत लोक काहेत ज्यांना अनेक देश फिरता आले नाही पण असे अनेक गरीब लोक आहेत जे जास्तीत जास्त देश कामानिमित्त फिरून आले आहे. आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करून देतो, जर तुम्ही विदेशी प्रवास आकर्षित केला तर तो तुम्ही वास्तवात करणारच.

म्हणून मी सांगितले कि आकर्षणाचा सिद्धांत भेदभाव करत नाही. माझ्याकडे गरीब श्रीमंत असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी येतात व ते त्यांचे त्यांचे आयुष्य काही कमी न पडता जगत असतात. तुम्ही उद्योग व्यवसाय करा फ्रीलान्सिंग करा किंवा नोकरी तुम्हाला अमर्याद मिळतच जाईल. खाजगी, व्यवसायिक आणि सामाजिक समृद्ध आयुष्य तुम्ही जगाल.

प्रत्येक क्षण तुम्हाला सर्वांगीण समृद्धीचा विचार करायचा आहे, भावना व्यक्त करायच्या आहेत, कंपने सकारात्मक करून ब्रम्हांडात सोडायच्या आहेत. सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहयचे आहे व अमर्याद आयुष्य जगायचे आहे इतका सोपा आहे आकर्षणाचा सिद्धांत. ह्या क्षणापासून वापर करा व अमर्याद आयुष्य जगा.

धन्यवाद
अश्विनीकुमार


 

Comments