जिवंत व्यक्ती आशावादी असते तर निर्जीव व्यक्ती म्हणजे जिवंतपणी मेलेली व्यक्ती हि घोर निराशावादी असते.

आशावादी व्यक्तीच्या आयुष्यात चमत्कार घडतात तर निराशावादी व्यक्तीच्या आयुष्यात संकटे येत असतात.

आशावादी व्यक्ती किठी मोठे संकट का असेना त्यामधून बाहेर पडते तर निराशावादी व्यक्ती संकटात अडकून राहते.

आशावादी व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा नवीन सुख समाधान आणि सर्वांगीण समृद्धीने भरलेला असतो तर निराशावादी व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा नवीन दुख अतृप्तीने आणि सर्वांगीण अधोगतीने भरलेला असतो.

आशावादी व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर सकारात्मक वाटते व निराशावादी व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर नकारात्मक वाटते.

आशावादी व्यक्तीच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत सकारात्मक काम करतो, जे पाहिजे ते सर्व सकारात्मक अमर्याद मिळत जाते तर निराशावादी व्यक्तीच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत नकारात्मक काम करतो व सर्व नकारात्मक अमर्याद मिळत जाते.

तुम्ही आशावादी आहत कि नाही?


जर आशावादी असाल तर शुभेच्छा आणि नसाल तर तुम्ही ह्या क्षणापासून आशावादी बनून तुमचे आयुष्य चमत्कारिकरित्या बदलू शकता.

धन्यवाद
अश्विनीकुमार

 

Comments