सर्वसामान्य व्यक्ती देखील चमत्कारिक जीवन जगू शकतो


एक व्यक्ती माझ्याकडे आली होती, ती मला अगोदरपासून फोलोव करते, काही विशेष गुण नाही किंवा कौशल्य नाही ह्यामुळे तिला अक्षरक्ष मजुरी करण्याची वेळ आली.

तुमच्याकडे कौशल्य किंवा विशेष गुण का असेना त्याचा आणि तुमचा सर्वांगीण समृध्द आयुष्य जगण्याचा काहीही संबंध नाही. माझ्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे बाह्य गुण नकारात्मक तरीही चमत्कारिक आयुष्य जगत आहे. पैसा सर्व मार्गांनी येतो, जोडीदार मिळत जातात, वाईट वागले गेले तरी लोक स्तुती करतात, ज्या क्षेत्रात पारंगत नाही तरीही त्या क्षेत्रात उच्च पदावर आहेत व कौशल्य असलेले त्यांचा उद्योग व्यवसाय चालवतात.

मी फक्त त्याच्या कंपनावर काम केले, त्यांची कंपने सक्षम केली, जे पाहिजे ते ब्रम्हांड तुम्हाला आकर्षित करून देईल असा विश्वास ठेवायला सांगितला व त्यांनी तो ठेवला. इथे आपले काम संपले, आता ब्रम्हांड तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करून देईल.

ज्यांची कंपने ब्रम्हांडाशी जुळून आली आहेत अश्या लोकांच्या संपर्कात रहायला काम करायला सांगितले, असे करता करता विविध क्षेत्रांचा अनुभव घेत एक व्यक्ती अशी भेटली कि जिथे तो काम करायचा तिथे काम वाढले म्हणून अजून एक कंपनी काढली व तिथे ह्या व्यक्तीला पार्टनर म्हणून घेतले.

आता दोघांची कंपने हि चमत्कार घडवत आहेत, कामाची कुठलीही कमी नाही, सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांगीण समृध्द आयुष्य जगत आहेत.

तुमच्याच आजूबाजूला अशी चमत्कारिक उदाहरणे असतील जी तुम्हाला माहिती नाही, कारण तुमचा दृष्टीकोन अजून बदलला नाही, अशी लोक संपर्कात आली नाही, दृष्टीकोन बदला मग तुम्हाला आजूबाजूला चमत्कारच दिसतील.

मी जे आता लिहित आहे ते कायमस्वरूपी लक्षात ठेवा किंवा जीवनशैली करा:

तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अमर्याद स्वरुपात मिळवू शकता, त्यासाठी तर्क काम करत नाही तर तुमची कंपने काम करतात. नेहमी विश्वास ठेवा कि तुम्हाला जे पाहिजे ते मिळणारच.

तुम्ही ज्या परिस्थितून जात आहात तिथून पुढे पुढे जात जा, फक्त कंपने सक्षम ठेवा व ब्रम्हांडावर पूर्ण विश्वास ठेवा, कुठल्याही मार्गाने तुम्हाला जे पाहिजे ते ब्रम्हांड आकर्षित करून देईल.


तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो अशी मी ब्रम्हांडाकडे प्रार्थना करतो.

आभारी आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार


 

Comments