कल्पना करा
तुम्हाला सर्वांगीण समृध्द आयुष्य जगायचे आहे
तुम्ही तुमची पूर्ण उर्जा हि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगण्यासाठी वापरता.
आता कल्पनेत भाऊ बहिण एड करा ज्याची जिची इच्छा तुमच्यासारखी आहे
आता तुमच्या दोघांची उर्जा हि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगण्यासाठी वापरात येत आहे.
इथे तुम्ही सकारात्मक आयुष्य जगत आहात.
आता कल्पनेत आई वडील दोघांपैकी एक एड करा
आता तुमच्या तिघांची उर्जा हि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगण्यासाठी वापरत आहात.
इथे तुम्ही भाग्यशाली आयुष्य जगत आहात.
आता कुटुंबातील चारही सदस्यांचे ध्येय एकच आहे ते म्हणजे सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगणे. आता चौघांची उर्जा हि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगण्यासाठी वापरत आहात.
इथे तुम्ही चमत्कारिक आयुष्य जगत आहात.
आता कल्पनेत मित्र परिवार, नातेवाईक व आयुष्याच्या प्रवासात भेटणारी लोक एड करा.
आता तुमच्या आयुष्यात असलेले व संपर्कात येणारे ह्या सर्व लोकांचे एकच ध्येय आहे कि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगणे व सर्व मिळून सर्व उर्जा हि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगण्यासाठी वापरत आहात.
इथे तुम्ही पृथ्वीवर स्वर्ग असल्यासारखे आयुष्य जगत आहात.
आता ह्याच्या उलट आपण बघू
बाहेरील व्यक्तीचे ध्येय सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगण्याचे नाही तर ती नकारात्मक आहे. ह्या बाहेरील व्यक्तीचा परिणाम जर तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून काढून टाकले तर तुमच्या आयुष्यावर नाही होणार. तिच्या जागी कोणी तरी सकारात्मक व्यक्ती येईल.
जर तुम्ही ती नकारात्मक व्यक्ती पकडून ठेवली तर नकारात्मकता तुमच्या घरात यायला वेळ नाही लागणार. मग एक क्षण असा येईल कि सर्वकाही तुमच्या हातातून निघून जाईल तो पर्यंत वेळ गेलेली असेल.
बाहेरील व्यक्तींना आपण आरामात आपल्या आयुष्यातून बाहेर काढू शकतो पण प्रश्न येतो तो कि घरच्या व्यक्तीचे काय?
५० ते १०० वर्षांच्या अथक संशोधनात हेच आढळून येत आहे कि सकारात्मक कुटुंबातील मुले प्रगती करतात, आयुष्य आनंदाने जगतात तर नकारात्मक कुटुंबातील मुले हि आयुष्य जगण्यासाठी धडपडत असतात, सतत लहानपणी जे नकारात्मक घडले ते आठवत असते, सतत चितेत असतात, सुख उपभोगू शकत नाही.
नकारात्मक व्यक्ती हि नकारात्मकच असते मग ती कुटुंबातील असो किंवा कुटुंबाबाहेरील. पर्याय एकच एकतर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यातून जा किंवा त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा.
आयुष्यातून जा बोललो आहे ना कि घरातून जा. आयुष्यातून काढून टाका बोललो आहे ना कि घरातून काढून टाका. दोन्ही वाक्यात जमीन आसमान चा फरक आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार










Comments
Post a Comment