हे मी तुम्हाला सांगत आहे ते एका शिष्याचे अनुभव आहेत ज्यांनी मला काल फोन करून सांगितला. शिष्य मला अगोदरपासून फोलोव करतो, समुपदेशन, कोर्सेस त्याचे सुरूच असायचे, त्याने आयुष्यात अनेक उतार चढाव बघितले पण माझ्या मार्गदर्शनाखाली होता त्यामुळे जास्त झळ बसली नाही, नाहीतर त्याच्या जागी दुसरा कोणी असला असता तर हार मानली असती इतके वाईट दिवस बघितले. एखाद वेळेस माझ्या मनात शंका यायची कि ह्या माझ्या शिष्याचे दिवस बदलतील कि नाही? जर शंकाच नाही तिथे चमत्कारच नाही, जेव्हा मनुष्य हरतो तेव्हाच चमत्कार घडतात, जितके जास्त अपयश तितका चमत्कार मोठा. पण शिष्याचा माझ्यावर अढळ विश्वास, कधी कधी त्याच्या सोबत बोलतांना मीच प्रोस्ताहित होवून जायचो.
काही महिन्यांनी शिष्याचा फोन आला होता, त्याचा आवाज
रडवलेला होता, कारण त्याच्या आईचे ऑपरेशन होते व सार्वजनिक वाहतूक
प्रवासात दीड लाख कोणीतरी चोरले होते. अनेकदा आपण तिसऱ्या अंपायर सारखे "मी
असलो असतो तर हे ते केले असते" वगैरे बोलतो पण जो परिस्थिती मधून जात असतो
त्यालाच त्या परिस्थिती ची दाहकता माहिती असते आणि जे बोलणारे असतात ना ते अश्या
परिस्थिती समोर तुटतांना बघितले आहेत. मी त्याची कशी तरी सांत्वना केली आणि त्याला
सामान्य केले, त्यानंतर फोन ठेवून मी पुढील कोर्स ची तयारी करत बसलो.
हि घटना सकाळी ९ वाजता ची होती, ऑपरेशन ५ वाजता
होणार होते, रात्री मी झोपलो होतो तितक्यात माझा फोन वाजला, त्याच शिष्याचा
फोन, मला वाटले कि काहीतरी सिरीयस असेल म्हणून पण जेव्हा समोरचा
आश्चर्यचकित, आनंदित झालेला आवाज ऐकला तर मीच गोंधळात पडलो. मला देखील
कुतूहल होते कि पुढे काय ऐकायला भेटणार ते.
शिष्याने पुढे सांगायला सुरुवात केली. जेव्हा शिष्याचे पैसे
हरवले तेव्हा तो प्रचंड तणावात गेला होता, माझ्याशी बोलून त्याला
स्वतःवर प्रचंड विश्वास आला. त्या विश्वासात त्याने पुढचा प्रवास सुरु केला, तिथून त्याला
तत्काळ हॉस्पिटल मध्ये बोलावले. त्याने रिक्षा थांबवायचा प्रयत्न केला पण त्या
दिशेने जायला रिक्षा भेटत नव्हता, तितक्यात एक ओला चालक आला
ज्याने नुकतेच एक भाडे सोडले होते व दुसरे भाडे शोधत होता पण भेटले नाही, सहज त्या ओला
चालकाला रिक्षा थांबवणारा माझा शिष्य भेटला, त्याने विचारले कि कुठे
सोडू, शिष्य हॉस्पिटल बोलला तसे तो तयार झाला, भाडे ठरवले व
गाडी हॉस्पिटल च्या दिशेने निघाली.
गाडीत बसल्यावर हातातील फाईल बाजूला ठेवली, एकदा व्यवस्थित
बसल्यावर फाईल पिशवीत टाकली. हॉस्पिटल च्या बिलिंग विभागात त्याला बोलावणे आले, कसे तरी
मित्राकडून २० हजार भेटले होते ते त्याने जमा केले पण एक लाख तीस हजाराचा प्रश्न आ
वासून उभा होताच, तो तिथेच थांबून मी जे जे
सराव करायला सांगितले होते तो ते करायला लागला. सराव करतांना सहज त्याला असेल
जाणवले कि अजून कुणाचे तरी सामान पिशवीत भरले गेले. ते सामान उघडून बघितले तर
त्यामध्ये २ नोटांचे बंडल, छोट्या फोल्डर मध्ये
कागदपत्रे, पेन ड्राईव्ह आणि आणी छोटे दागिन्यांचे खोके होते.
मोबाईल क्रमांक काही भेटला नाही पण एक बिल भेटले जिथे ती
व्यक्ती गेली होती, त्या जागी फोन केल्यावर
त्यांनी माहिती देण्यास नकार दिला पण जेव्हा कारण सांगितले तेव्हा त्यांनी क्रमांक
काढून दिला. त्या व्यक्तीला फोन केला, जेव्हा त्या व्यक्तीने
फोन उचलल्यावर ती व्यक्ती चिंतेत व प्रचंड घाबरलेल्या स्वरात बोलत होती, त्या व्यक्तीला
शिष्याने शांत केले, ती व्यक्ती कोण आहे हे
तपासले व त्यानंतर त्याने सांगितले कि त्यांची हरवलेली वस्तू भेटली आहे आणि
हॉस्पिटल चा पत्ता दिला. ती व्यक्ती बोलली कि एका तासात पोहचतो तिथे.
एका तासात ती व्यक्ती आली व तिच्या हातात तिचे समान दिले, ती व्यक्ती
अक्षरक्ष हाता पाया पडत होती, आभार मानत होती, ती व्यक्ती एक
व्यवसायिक होती व एक महत्वाचा सौदा करून तिला दुबई ला जायचे होते. ती शांत
झाल्यावर शिष्याची विचारपूस केली, शिष्याच्या आई च्या
ऑपरेशन चे कळाले, पैसे देण्याचा प्रयत्न
केला गेला, पण शिष्याने घेतले नाही, त्या व्यक्तीने शिष्याचा
क्रमांक घेतला व जायला निघाला, थोडे पुढे गेल्यावर एक
व्यक्ती दुसर्या व्यक्तीशी बोलत होती शिष्याचे कसे पैसे चोरीला गेले, हे ऐकल्यावर
त्याने बिलिंग विभागात चौकशी केली व सर्व पैसे भरू टाकले, सोबत एक पाकीट
दिला ज्यात दोन पैश्यांची बंडले टाकली व त्यांना सांगितले कि शिष्यास देण्यात
यावे.
शिष्याला काही माहिती नव्हते, डॉक्टर आई ला
ऑपरेशन साठी घेऊन गेले व ऑपरेशन यशस्वी झाले, जेव्हा बिलिंग विभागाकडे
जाने झाले तेव्हा समजले कि ऑपरेशन चे पैसे अगोदरच भरले गेले आहे. शिष्याचा
विश्वासच बसत नव्हता कि असे काही घडेल म्हणून, कुठेही तर्क लागू होत
नाही, काय माहिती चमत्कार इथेच थांबले कि अजून चमत्कार ऐकायला
मिळतील?
ती व्यक्ती संपर्कात होती, व शिष्याला
अकाउंट चे काम येत होते त्याला छोटासा व्यवसाय सुरु करून दिला. आज शिष्य तो
व्यवसाय उत्तम सांभाळत आहे, त्याची महिन्याला एक तरी
परदेशी वारी होते. त्याच्या आईला देखील दुबई बघायला मिळाले. दुबई च्या स्थानिक
लोकांमध्ये त्याचे नाव पोहचले होते. त्याच्याबद्दल आदर प्रचंड होता. तुमच्या
चांगुलपणाची कंपने इतकी सक्षम असतात म्हणून देश विदेशातून कुठूनही तुम्हाला
वेळप्रसंगी मदत येते.
हा चमत्कार तुम्हाला एका दिवसाचा वाटत असेल पण त्याच्या
मध्ये त्या माझ्या शिष्याचे मला भेटण्याअगोदरचे आयुष्य आणि नंतरचे आयुष्य, त्यामधील
प्रत्येक क्षण जे काही उतार चढाव आले असतील त्याचा केलेला सामना आणि आता कुठे
घडलेला चमत्कार. म्हणून कधीही ना स्वतःवर आणि नाही इतरांवर वर्तमान परिस्थितीवरून
शंका उपस्थित करू नका आणि नाही घडलेल्या चमत्कारांवर. प्रत्येकाचा प्रवास असतो, तुमचा
चमत्कारावर विश्वास नाही म्हणून बाकी ठेवणार नाही असे नाही, जो उज्वल भविष्यासाठी
धडपडेल त्याला ते मिळेल. जोत थांबला तो संपला.
महत्वाचे मुद्दे :
१)
परिस्थिती कितीही कठीण का
असेना नेहमी सकरात्मक रहा किंवा राहण्याचा प्रयत्न करा.
२)
“सर्व काही शक्य आहे” हा
सतत विचार करा.
३)
ब्रम्हांडाचे आभार माना. जरी
तुमच्या आजूबाजूला हितचिंतक नसतील तरीही ब्रम्हांड तुमची कंपने योग्य लोकांपर्यंत
पोहचवतील.
४)
सकाळी उठल्यावर आणि
रात्री झोपण्याअगोदर १० मिनिटे ध्यान करत जा.
५)
तुमच्या वेळेनुसार कमीत
कमी २० मिनिटे तरी व्यायाम करा, ह्यामुळे तुमची सकारात्मक कंपने वाढतील.
६)
फक्त सकारात्मक लोकांच्या
संपर्कात रहा, जर नसतील तर एकटे रहा पण काहीही करून नकारात्मक लोकांच्या संपर्कात
राहू नका.
७)
तुम्ही ब्रम्हांडाचा एक
अंश आहात असेच आयुष्य जगा.
आपले अनुभव शेअर करा.
धन्यवाद
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment