आकर्षण चा सिद्धांत तुम्हाला जे पाहिजे ते मर्याद मिळवून देतो

आकर्षण चा सिद्धांत तुम्हाला जे पाहिजे ते मर्याद मिळवून देतो फक्त ब्रम्हांडात सोडण्याची कंपने हि योग्य रीतीने जुळून आली पाहिजे तही तर तुम्ही दिलेली कंपने हि वाया जातात.

उदाहरणार्थ

जर एखाद्या व्यक्तीला करोडो रुपये पाहिजे असतील आणि वर्तमानात तो आहे त्याच्या समाधानी नसेल, येणारा जो कुठला पैश्यांचा मार्ग आहे त्याचा आदर करत नसेल, आनंद घेत नसेल तर त्याला भविष्यात देखील काहीही मिळणार नाही, उलट पैसा हा दूर दूर चालला जाईल.


माझ्या ज्या शिष्यांकडे पैसा आकर्षित होत आहेत ते १ रुपयाला देखील तितकेच महत्व देतात व १ अब्ज ला देखील कारण ब्रम्हांडासाठी दोन्ही एकसारखेच आहे.

ते ज्या मार्गांनी पैसे कमावतात त्या मार्गाचा देखील तितकाच आदर करतात व कधीही नकारात्मक बोलत नाही असे नाही कि एखादा मजुरी करत असेल तर कमी आदर व मालकाला जास्त आदर असे कधीही देत नाही, पैसे कमावण्याच्या प्रत्येक मार्गाचा आदर करतात व महत्व देतात.

मग ते एक रूम च्या खोलीत राहू देत किंवा करोडोच्या बंगल्यात, त्यांना कधीही पैश्यांची कमी पडत नाही. त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार अमर्याद आयुष्य जगत असतात.


फक्त श्रीमंत अमर्याद आयुष्य जगू शकतात हा गैरसमज आहे. काहींकडे पैसा आहे तर काही कर्जात बुडालेले आहे, काहींकडे मित्र नाही तर प्रेम नाही त्यामुळे बाहेरील परिस्थिती बाजून जज नका करू, वास्तव वेगळे असते.

तिथे दुसरीकडे पैसा नसून सुद्धा जग फिरून आले आहेत, भाग्य नसून सुद्धा भाग्यशाली आयुष्य जगले आहेत, प्रेम न भेटून सुद्धा प्रेमाचे आयुष्य जगले आहेत,

जर ठरवले कि सर्वकाही शक्य आहे, फक्त ध्येय आणि तुमचा विश्वास ह्यामधील अडथळे दूर केले पाहिजे. ह्या कशी अडथळे दूर करा तर ह्या क्षणी तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल.

इतक्या सोप्या पद्धतीने आकर्षणाचा सिद्धांत काम करतो. मस्त पैकी सकारात्मक राहून, आनंदी राहून आयुष्य जगा, मग शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला कसलीही कमी पडणार नाही.


 

Comments