संमोहन शास्त्र हे सर्वात शक्तिशाली शास्त्र आहे. संमोहन शास्त्र कोर्स आणि उपचारामध्ये विद्यार्थ्याला झोपेची अर्धवट अवस्था, ट्रांस अवस्था, तल्लीन अवस्था ह्या मध्ये नेले जाते, जिथे व्यक्ती झोपलेली असते, शरीर हलवू शकत नाही पण ऐकू शकते. ह्या अवस्थेत नेल्यावर त्या व्यक्तीच्या अंतर्मनात सूचना टाकल्या जातात ज्या कायमस्वरूपी अंतर्मनात रुजतात, त्यानंतर फक्त त्याची निगा राखावी लागते जे खूप महत्वाचे आहे.
संमोहन हि नैसर्गिक अवस्था आहे, जर तुम्ही झोपण्याअगोदर सकारात्मक विचार सतत करत राहिलात आणि ते काही कालावधीसाठी पकडून ठेवता आले म्हणजे गाढ झोपण्याच्या अगोदरपर्यंत तर मग तुम्ही तो विचार तुमच्या अंतर्मनात आरामात रुजवाल.
अर्थात ह्याला सराव लागतोच, अनेकांच्या सरावाची सुरुवात हि लहानपणापासून होते तर काहींची उशिरा, ज्यांची सुरुवात लवकर होते ते कमी वयात चमत्कारिक आयुष्य जगतात तर ज्यांची उशिरा होते ते चाळीशी आणि पन्नाशी नंतर चमत्कारिक आयुष्य जगतात.
माझ्याकडे १३ वर्षाची विद्यार्थिनी सुद्धा आहे तर ७० वर्षांचे विद्यार्थी सुद्धा आहेत. इथे ज्यांची शिकण्याची आवड असते ते वय काहीही असले तरी लवकर शिकून घेतात. अर्थात इथे मानसिकता खूप महत्वाची आहे. नेहमी काहीही शिकतांना सकारात्मक मानसिकता ठेवून शिकायचे व जे काही तुम्ही शिकला आहात अनुभव घेतले आहे त्याच्याशी तुलना करत बसायचे नाही तर आवडीने शिकायचे.
सर्व प्रकारच्या मानसिक, मनोशारीरिक आणि शारीरिक आजारपणावर प्रभावी काम करते, जर तुमचे उपचार सुरु असतील तर त्यासोबत संमोहन उपचार सुरु ठेवले तर दुप्पट फायदा होतो, तुम्ही जे डॉक्टर उपचार करत आहेत त्यांना सकारात्मक प्रतिसाद देता व लवकर बरे होतात.
मी आता जे अनुभव सांगत आहेत ते थोडक्यात सांगत आहे, पुढे जावून विस्तृत लेख लिहील.
१) एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मुलाखतीदरम्यान एक दिवस अगोदर संमोहन उपचार केले व मुलाखतीच्या दिवशी जे संमोहन शास्त्र शिकले होते त्याचा एक सराव करत, श्रवण क्षमतेचा वापर करत, मुलाखत घेणारा जेव्हा इतर लोकांची मुलाखत घेत होता तेव्हाचे ऐकत, आपल्यात काय काय बदल करायचे ते करत जेव्हा त्याचा मुलाखत देण्याचा क्रमांक आला तेव्हा तो आरामात सिलेक्ट झाला व चांगल्या पगाराची नोकरी ह्या रिसेशन मध्ये मिळाली.
२) वयाच्या ३० व्या वर्षी नकारात्मक गेलेल्या बालपणामुळे जगण्याची आशा गेली होती, विविध आजार जडले होते, पण माझा कुठलातरी लेख वाचून फोन करायची इच्छा झाली, एका वर्षात उपचारात सातत्य ठेवून आयुष्य पूर्ण पालटून टाकले, इतके कि संमोहन शास्त्रात तज्ञ झाला, जिथे ६ महिने नोकरी केली ते दुकान चालवायला घेतले, एका वर्षात एक छोटा कारखाना चालवायला घेतला व आज २०० % नफ्यात व्यवसाय करत आहेत. फक्त एका वर्षात ३० वर्षांचे नकारात्मक आयुष्य जावून सकारात्मक आयुष्य जगायला लागला.
३) ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय डबघाई ला आला होता, कर्ज जास्त झाले होते, जिथे शान ने जगत होते तिथे अचानक गरिबी आली, होते नव्हते ते सर्व पैसे विविध उपायांच्या नावाखाली लुटले गेले, आता एकच पर्याय कि हा शेवटचा उपाय करायचा आणि जर यश नाही आले तर आत्महत्या. इथे असे उपचार केले कि मानसिक दृष्ट्या व्यक्ती सक्षम बनली, एक मनोशारीरिक व्यक्तिमत्व निर्माण केले, जेव्हा व्यवहार करण्यास जायचे तेव्हा एक छाप पडायची व एक एक करत क्लाइंट वाढत गेले, आज त्यांनी कर्जाची परतफेड केली व नफ्याचे आयुष्य सुरु झाले, इथे संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते व सर्वांनी मिळून कुटुंबाला संकटातून बाहेर काढले.
असे एक नाही तर अनेक अनुभव आहेत आणि हे शक्य आहे कारण ज्यांची उदाहरणे मी दिली ते कधीही अश्या मोठ्या संकटातून बाहेत पडतील असे वाटत नव्हते पण चमत्कार मी बघितला आहे व विस्तृत त्यांचे अनुभव ऐकले आहेत, एक एक टप्प्यावर ते संपर्कात असायचे, मी तो कालावधी देखील बघितला जिथे हे सगळे यश आणि अपयश ह्यामध्ये उभे होते आणि त्यांना निर्णय घ्यायचा होता, हो आणि हा निर्णय घेणे सोपे नाही.
तुम्ही देखील तुमचे आयुष्य बदलू शकता तुम्हाला तुमच्या अंतर्मनावर काम करायचे आहे व नैसर्गिक संमोहन शास्त्राचा वापर करायचा आहे. ह्यासाठी मी पुढे दिलेल्या सूचना तुम्ही तुमच्या अंतर्मनात रुजवाल, करायचे आहे तर मनापासून करा, फक्त मोफत मध्ये ह्या लेखामध्ये दिले आहे म्हणून कसेही करू नका नाहीतर काहीच फरक पडणार नाही. मोफत किंवा पैसे देवून जो स्वतःच्या आयुष्याला महत्व देतो तो आयुष्य बदलतोच, नाहीतर करोडो रुपये खर्च करून देखील काहीही फरक पडत नाही.
१) झोपण्या अगोदर मन शांत करा.
२) श्वासावर लक्ष केंद्रित करा.
३) मी सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे. हि सूचना सतत मनात बोलत रहा.
४) सलग २१ दिवस सातत्य ठेवा, खंड पडता कामा नये.
सुरुवातीपासून फरक जाणवायला लागेल आणि बघता बघता तुमचे आयुष्य चमत्कारिक रित्या बदलून जाईल, मानसिक, मनोशारीरिक आणि शारीरिक आजार बरे होतील, आत्मविश्वास वाढेल, सकारात्मक बनाल, डॉक्टरांच्या उपचारांना सकरात्मक प्रतिसाद द्याल, कर्ज मुक्त आयुष्य जगाल, वर्तमानात तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगाल. जर फरक नाही पडला तर आपले संमोहन उपचार आणी कोर्सेस आहेतच, ऑनलाईन देखील उपलब्ध आहे, सुरुवातीला तुम्ही प्रयत्न तरी करा. सोपे आहे.
धन्यवाद
संमोहन तज्ञ अश्विनीकुमार

Comments
Post a Comment