संमोहन शास्त्रातील मागील लेखात मी तुम्हाला ३ उदाहरणे दिली होती त्यावर लेख न लिहिता माझा जो विद्यार्थी होता ज्याने काल कॉल करून त्याच्या जीवनाचा चमत्कारिक प्रवास सांगितला होता तो मी तुम्हाला इथे सांगत आहे.
कोरोनाच्या अगोदरची गोष्ट आहे जेव्हा विद्यार्थी हा मानसिक,
आर्थिक व खाजगी आयुष्यातील समस्यांनी ग्रस्त होता, त्यावेळेस तो संमोहन शास्त्र हा
कोर्स करण्यासाठी आला होता. आम्हा दोघांना नव्हते माहिती कि हा आमचा प्रवास एक
कोर्स पुरता मर्यादित न राहता अजून पुढे वाढत जाणार आहे.
कोर्स सुरु होण्याअगोदर मी पहिले समजून घेण्याचा प्रयत्न
करतो त्यानंतरच कोर्स ला सुरुवात करतो, ह्यासाठी पहिल्यांदा मला ३ दिवस द्यायला लागले
इतक्या समस्या त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात होत्या. मी वेळ दिला, आर्थिक नुकसान
झाले पण आज चमत्कार बघायला भेटत आहे.
जेव्हा सर्व भावना व्यक्त झाल्या, त्याला एकच अट घातली कि इथून
पाठी जाता येणार नाही, भूतकाळातील सर्व पूल जाळून टाकायचे व मी जो शब्द देईल तो
शेवटचा, हे कुठेही लिहून नव्हते पण त्या विद्यार्थ्याने मनापासून तयारी दाखवत
होकार दिला व आमच्या चमत्कारिक प्रवासाला सुरुवात झाली.
कोर्स च्या सुरुवातीला व शेवटी प्रोपर समजावून सांगायचो,
प्रत्येक सराव त्याच्याकडून करून घेतला आणि आश्चर्य जेव्हा दुसर्या दिवसाचा सराव
होता त्यामध्ये सिंगापूर चे हवामान त्याला फील होत होते. मला सुरुवातीला समजले
नाही पण जस जसा कोर्स पुढे गेला तस तसे चित्र स्पष्ट होत गेले.
“नेहमी तुम्हाला जे ध्येय साध्य करायचे आहे त्याचा मानसिक
सराव असा करा कि वास्तवात ते तुम्ही जगत आहात म्हणजे तुमचे ध्येय साध्य झाले आहे
आणि काही दिवस ते महिन्यात तुमचे ध्येय हे साध्य झाले असेल.” - अश्विनीकुमार
जेव्हा अंतर्मनाचा सराव सुरु झाला तेव्हा विद्यार्थ्याला
आश्चर्याचा धक्का बसला, त्याला पहिल्यादा त्याच्या अंतर्मनाचा प्रवास व्यवस्थित
करता आला. मग तो अंतर्मनाचा प्रवास इंजोय करत करू लागला. शुक्ष्म निरीक्षण सुरु
ठेवले व इतक्या संधी मला सांगितल्या कि त्यामधून एक किंवा त्यापेक्षा जास्त निवडणे
सोपे झाले.
माझ्या प्रत्येक सूचना ह्या अंतर्मनात रुजवल्या. प्रचंड
आत्मविश्वास वाढला, जेव्हा रस्त्याने चालू लागला तेव्हा सहज त्याने मला फोन केला व
मी त्याला एक टास्क दिला कि ह्या गर्दीच्या रस्त्याने सरळ चालून दाखवायचे आणि
त्याने ते केले.
पहिले विद्यार्थी शांत बसला, डोळे बंद केले, सर्वात अगोदर
नकारात्मक विचार आले व ते लगेच थांबवले गेले व अंतर्मनात सूचना टाकली मी हा
गर्दीचा रस्ता सरळ चालत जावून पार करून दाखवेल. आणि सूचना अंतर्मनात रुजवली.
जसा विद्यार्थी चालू लागला तसा समोरून येणारा व्यक्ती समान
घ्यायला बाजूच्या दुकानात वळला, त्या पुढील मुलीला तिच्या मैत्रिणीने खेचून घेतले
जसे कि त्या खूप दिवसांनी भेटल्या होत्या दुसरे पाउल सरळ टाकले गेले असे करत करत
पूर्ण गर्दीचा रस्ता सरळ चालत जावून आरामात पार झाला.
असे टास्क द्यायला मला आवडते कारण मी तपासतो कि खरच मी
दिलेला सराव मनापसून करत आहेत कि नाही? नीट समजून घेतले कि नाही, मन मेंदू आणि
शरीर ह्यांचे कनेक्शन झाले कि नाही? अंतर्मनात सूचना रुजवता येतात कि नाही? जेव्हा
असे प्रात्यक्षिक करतो तेव्हा समजून येते कि वास्तवात बदल दिसून येतो. परिस्थिती
बदलते.
अंतर्मनात आयुष्य जगतांना एका संधी मध्ये असे जाणवले कि
नैसर्गिक कल मध्ये सर्वांगीण समृद्धी आहे पण आर्थिक समृद्धी थोडी कमी आहे पण दुसऱ्या संधी
मध्ये नैसर्गिक तर नाही बोलता येणार पण आवडीने काम करून सर्वांगीण समृद्धी आहे
सोबत आर्थिक समृद्धी चे प्रमाण पण जास्त आहे. मग इथून सुरुवात झाली ती शेअर
ट्रेडिंग ची.
मग काय प्रश्न उरला तो धाडस दाखवायचा. बायको सोबत बोलणे
झाले कि ६ लाख पेकेज असलेली नोकरी सोडायची व पूर्ण वेळ ट्रेडिंग करायची. हा निर्णय
घेण्याअगोदर अंतर्मनात मानसिक सराव खूप केला होता त्यानंतरच निर्णय घ्यायचे ठरवले.
जोडीदाराची साथ तर पाहिजे, जर नसेल तर तुम्ही तुमच्या पूर्ण
क्षमतेने आयुष्य जगू शकणार नाही. दोघांची हि साथ हवी. कठीण निर्णय घ्यायला शिका,
आयुष्य एकच भेटले आहे. इथे दुसरा पर्याय नाही.
एक नवीन आयुष्याचा जन्म झाला असे म्हणू आपण. ट्रेडिंग ने ३
महिन्यात जम बसवला. आरामात जावू दिले, घाई न केल्यामुळे काही संधी गेल्याच पण पुढे
चालून जश्या पाहिजे तश्या संधी येतच गेल्या.
इथे इंट्रा डे करायला मी सांगितले कारण इथे मला लक्ष किती
आहे हे बघायचे होते व क्षणात निर्णय घेवू शकतो कि नाही हे बघायचे होते. ह्यासाठी
विशेष कोर्स जो फक्त मोठ्या गुंतवणूकदारांसाठी असतो ज्यांना कमीत कमी २ वर्षांचा
अनुभव असतो त्यांनाच प्रवेश मिळतो पण इथे पाया मजबूत असल्यामुळे कोर्स करायचे
ठरवले. कोर्स हार्ड असतो पण ज्याला आयुष्यात काहीतरी करायची आवड आहे तो आरामात करू
शकतो.
ठराविक वेळ, ठराविक रक्कम आणि ठराविक नफा तोटा ह्यावर सौदा टाकायचा
होता. काही वेळेस क्षणात निर्णय घ्यायचा होता. काही जन्मजात गुण नसल्यामुळे १२ ते
१६ तास कालावधी जात होता त्यामधील जास्त वेळ हा ज्ञान मिळवायचा होता.
फक्त ३ महिन्यात प्रचंड नफा कमावला पण इथे पैश्यांपेक्षा जे
धाडसी आयुष्य जगले त्याची सर कश्यालाही नाही. समृध्द लोक धाडस दाखवत आयुष्याचा
प्रवास करत असतात म्हणून त्यांना समृद्धी बक्षीस स्वरुपात मिळते, जिथे सामान्य
गुडघे टेकतात तिथे हि लोक उभी असतात.
जसे समृद्ध आयुष्य जगायला सुरुवात झाली तसे समृद्ध लोक
संपर्कात येवू लागले, त्यापैकी काही असे होते कि पैश्यांची कमी नाही, मैत्री होती
तर माझा विद्यार्थी सहज बोलून जायचा कि मी पैसे बाजारपेठेत लावून तुम्हाला तुमचा पैसा
वाढवून देतो. एकदा का तुम्ही समृध्द झालात तर समृद्ध लोकच तुमच्या संपर्कात येतील.
दोघा तिघांनी मिळून करोड रुपये दिले व त्यांना ४० % नफा काढून दिला.
असाच एक मित्र होता तो बोलला कि आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय
कंपन्यात गुंतवणूक करशील का? मग विद्यार्थ्याने होकार दिला, इथून पुढे वसुधैव
कुटुंबकम ची सुरुवात झाली.
आता संमोहन शास्त्र हा स्वभाव झाला आणि सर्वांगीण समृद्धी
हि जीवनशैली झाली. तुमचे आयुष्य बदलण्यासाठी खाली टीप देत आहेत त्याचा वापर करून
तुमचे आयुष्य बदलाल.
१)
पहिले तुम्ही तुमचे
आयुष्य सामान्य स्तरावर आण जिथे जास्त समस्या तुम्हाला नसतील
२)
आता सामान्य आयुष्य
जगायला लागल्यावर तुम्हाला नक्की काय पाहिये ते ठरवा
३)
आता तुम्ही स्वतःला
गुंगीच्या अवस्थेत नेवून किंवा झोपण्याअगोदर जे ध्येय निश्चित केले आहे त्याचा
सराव करा.
४)
जर वरील नसेल जमत तर
तुम्हाला जसे पाहिजे तसे आयुष्य जगण्याचा मानसिक सराव करा
५)
सराव जास्तीत जास्त
वास्तव वाटला पाहिजे तसाच करा मग स्वप्न हे तुमचे सत्यात उतरतीलच
धन्यवाद
संमोहन तज्ञ अश्विनीकुमार

Comments
Post a Comment