"सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आत्मविश्वास हा शब्द सतत मनातल्या मनात उच्चारत राहिलात दिवसाची सुरुवातच आत्मविश्वासाने होईल. इथे तुमचे ह्या २४ तासांचे भविष्य तुम्ही बदलवून टाकले. आत्मविश्वास हा सकारात्मक शब्द असल्यामुळे संपूर्ण दिवस सकारात्मक जाईल. नकारात्मक घडले तरी त्यावर तुम्ही आत्मविश्वासाने मात कराल व परत सकारात्मक दिवस जगाल. असेच सतत कमीत कमी २१ दिवस ते जास्तीत जास्त ३ महिने केले कि तुमचे व्यक्तिमत्व बदलेल, दृष्टीकोन बदलेल आणि संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. सोपे आहे."


अश्विनीकुमार

Comments