एकमन आणि फ्रिसन ह्यांनी १९८६ साली मानवी भावनिक अभिव्यक्तीवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले कि आनंद, दुःख, राग, आश्चर्य, किळस आणि भीती ह्या मुलभूत भावनांमुळे जे चेहऱ्यावर हावभाव निर्माण होतात ते जगभरातील लोकांमध्ये विलक्षणरित्या समान आहेत, मग ती व्यक्ती भारतातील असो, युरोपातील, जपानमधील किंवा अमेरीकेतील. एखाद्या दुर्गम भागात राहणारी व्यक्ती असो किंवा शहरी भागात राहणारी व्यक्ती, गरीब व्यक्ती असो किंवा गर्भश्रीमंत, तुम्ही असो किंवा मी, आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मुलभूत भावनांचे चेहऱ्यावर व्यक्त होणारे हावभाव हे एकसारखेच आहे.


अश्विनीकुमार



Comments