आकर्षणाचा सिद्धांत हा सिद्धांत आहे, ह्या सिद्धांताचा वापर व्यक्ती सकारात्मक करते किंवा नकारात्मक. जर सकारात्मक वापर केला तर आकर्षणाचा सिद्धांत अमर्याद तुम्हाला सकारात्मकता देतो जसे कि अमर्याद पैसा, आरोग्य, प्रेम, जोडीदार आणि अमर्याद समृद्धी. जर नकारात्मक वापर केला तर पैसा, आरोग्य, प्रेम, जोडीदार आणि समृद्धी ह्यापैकी काहीही भेटत नाही, जे अमर्याद भेटते ते नकारात्मकता.


अश्विनीकुमार

आकर्षणाच्या सिद्धांताचे शिष्याला आलेले अनुभव


अश्विनीकुमार सर सर्वात अगोदर तुमचे खूप खूप आभार जे तुम्ही मला माझी वडिलोपार्जीत जमीन विकू दिली नाही आणि त्या ४ एकर जमिनीचे आज तुमच्या मार्गदर्शनाने ४० एकर जमीन केली आहे. कधीकाळी मी कर्जबाजारी शेतकरी होतो ते आज मी समृद्ध शेतकरी आहे. शहरातील लोक गावाच्या जवळ किंवा मुंबई च्या बाहेर दुसरे घर घेतात आणी तुम्ही मला शहरात घर घ्यायला लावले ज्याचा मला खूप फायदा झाला व ती गुंतवणूक फायद्याची ठरली. जर शहरातील लोक मुंबई बाहेर घर घेवू शकतात तर शेतकरी शहरात का नाही घेवू शकत? एक चौकट मोडल्यासारखी वाटत आहे त्यामुळे संपूर्ण जगच जवळ आल्यासारखे वाटत आहे. ह्या दीड ते दोन वर्षाच्या चमत्कारिक प्रवासासाठी अनुभवासाठी तुमचे खूप खूप आभार.

Comments