ब्रम्हांडाने तुम्हाला सर्वांगीण समृद्ध आयुष्य द्यावे असे वाटत असेल तर त्या साठी तुम्ही ब्रम्हांडाला पैसे देवू शकत नाही कारण ब्रम्हांड सर्वांना देतो, ब्रम्हांडाकडे कमी नाही. ब्रम्हांडाकडे चालणारे चलन म्हणजे तुमचे विचार, तुमच्या भावंना आणि तुमची कंपने. तुम्ही ब्रम्हांडाला सकारात्मक विचार, भावना आणि कंपनांचे चलन द्या तो तुम्हाला सर्वांगीण समृद्ध आयुष्य देईल. ह्याला दुसरा पर्याय नाही. म्हणून पैश्यांपेक्षा अमूल्य हे आपले विचार भावना आणि कंपने आहेत.

अश्विनीकुमार


नमस्कार सर, आज तुमच्या कोर्स सल्ल्याने माझे आयुष्य पूर्ण बदलले, सर माझ्यातील कमतरता तुम्ही ओळखली आणि जो सल्ला दिला तो चमत्कारिक रित्या काम करून गेला नाहीतर माझ्या मनात माझ्यात असलेल्या कमतरतेमुळे प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला होता आणि आज माझ्या हाताखाली प्रचंड आत्मविश्वास असलेली उच्च शिक्षित लोक काम करत आहेत. जर तुमचे मार्गदर्शन अगोदर भेटले असते तर आज माझी परिस्थिती अजून वेगळी असली असती. तुम्ही बोलता ना सर्व प्रकारची लोक यशस्वी आयुष्य जगतांना त्यापैकी मी एक आहे कि ज्यामध्ये तार्किक आणि शैक्षणिक जगताने ठरवलेले कुठलेही गुण नाही तरीही मी आज यशाच्या शिखरावर पोहचलो आहे. मला माझे जीवन जगण्याचे रहस्य मिळवून दिले त्यासाठी तुमचा जितके आभार मानु तितके कमी आहे, कृपया मी मनापासून देत असलेली भेटवस्तू स्वीकारा. परत एकदा आभार.

 

Comments