कल्पना करा कि तुम्ही एका दरवाज्यासमोर आहात, तुम्ही आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, कुंडलिनी, रेकी हिलिंग ह्यापैकी एका शास्त्राचा वापर करून तुम्ही तो दरवाजा उघडला, तुम्हाला एक खोली दिसत आहे कारण तुम्ही अजून उंबरठा पार केला नाही, समोर दुसरा दरवाजा दिसत आहे आणि तो दरवाजा पार करून जायचे आहे.
सोपे वाटते ना?
थांबा
खुश होऊ नका
जसे तुम्ही दरवाज्याच्या आत पाउल टाकाल, खोलीत प्रवेश कराल तितक्यात तुम्ही एका अनंतात पोहचाल, हो फक्त एक पाउल टाकल्याबरोबर असे झाले, म्हणजे जो दुसरा दरवाजा १० फुटांवर दिसत होता आता तो दिसत नाही. सर्व भूत भविष्य वर्तमान अनंत मध्ये दिसत आहेत, सर्वकाही अमर्याद आहे.
आता कळाले तुमचे अंतर्मन किंवा तुम्ही जी शक्ती किंवा विद्या मानतात ती किती शक्तिशाली आहे ते?
आताच एकाने ५ करोड आकर्षित केले
दुसऱ्याने विदेशात नोकरी आकर्षित केली
अजून एकाने आजारपणावर मात केली
असे अनेकांनी त्यांचे त्यांचे ध्येय साध्य केले.
त्या सर्वांना हा अंतर्मनाचा दरवाजा पार करून जावेच लागले असणार, त्यांना देखील अनंताचा सामना करावा लागला असणार, त्यानंतरच ते पलीकडच्या दरवाज्याकडे पोहचले कि नाही?
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास
एकाकडे पैसे नव्हते तो करोडपती झाला आणि फक्त लॉटरीच नाही तत्काळ करोडपती बनण्याचे साधन तर त्या अमर्याद अनंत अंतर्मनात असे अनेक तत्काळ करोडपती बनण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
असेच लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडतात, एका दिवसात हुशार बनला, एका दिवसात नोकरी लागली, एका दिवसात आजारपणावर मात केली म्हणजे जे जे साध्य करायचे होते ते ते साध्य झाले आणि लोक ते आयुष्य जगत आहेत.
म्हणून यशस्वी भाग्यशाली आणि चमत्कार घडवणारी लोक दररोज न चुकता सराव करतात कारण त्यांना हेच अंतर्मनाचे १० फुटांचे अनंताचे अंतर पार करायचे असते. ते दररोज मानसिक अध्यात्मिक सराव करतात व जे पाहिजे ते त्याच दिवशी घेवून जातात.
तुमचेच अनंत अंतर्मन किंवा ब्रम्हांड आहे सर्वकाही त्याच्यात आहे, म्हणून बघा जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा तुमचा मेंदू हा वेगळाच विचार तुमच्या डोक्यात घेवून येतो, वेगळ्याच भावना तुमच्या मनात येतात, त्यामुळे हृदय भरून येते किंवा जास्त धडधड करते. आता तुम्हाला कारण हे समजलेच असेल.
म्हणून ध्यान व त्या संलग्न साधना शास्त्र म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन शास्त्र, कुंडलिनी आणि रेकी हिलिंग ह्यांचा सराव दररोज न चुकत चालू असतो जेणेकरून जेव्हा अंतर्मनात प्रवेश होईल तेव्हा त्यांना स्पष्ट असते कि अनंतात सुद्धा समोरील दरवाज्याकडे जायचे आहेत व ते तिथे जातातच कारण हा त्यांचा दररोजचा सराव असतो.
आता समजा समोरील दरवाजा हा कर्जमुक्तीच्या ध्येयाचा असेल तर मग तो दरवाजा पार केल्यावर तुम्ही वास्तवात कर्जमुक्त झाला असाल. म्हणजे जे ध्येय आहे ते साध्य झाले असेल.
ह्या जगात अब्जो लोक आहेत आणि दररोज काही करोड लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडत असतो, इथे काहीही मर्यादित नाही, सर्व अमर्याद आहे. माझे विद्यार्थी आणि उपाय उपचार करणारे हे जवळपास कमीत कमी ५० लाख ते करोड हि उलाढाल करणारे आह. हि रक्कम तुम्हाला जास्त वाटत असेल पण इतके कमावणारे भारतात खूप आहे, काळा पैश्यांचा विषय बाजूला जरी ठेवला तरी आरामात लाखो रुपये कमावता येतात.
पण इथे एक धोक्याची सूचना आहे.
जर तुम्ही अनंत अंतर्मनात नकारात्मकतेमध्ये अडकलात तर तुम्ही तेच तेच नकारात्मक करतांना दिसाल व कधीही तुम्ही तो दरवाजा उघडू शकणार नाही. परत मग तुम्हाला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागले.
ज्यांनी माझ्याकडे एकापेक्षा जास्त वेळेस कोर्स केला आहे त्यांना माहिती होते कि जोपर्यंत तो दरवाजा उघडत नाही किंवा ते हा अनंत प्रवास करण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत त्यांना सातत्य ठेवायचेच आहेत आणि नेमके ह्यामध्ये समृद्ध लोक जास्त आहेत, मध्यम आणि गरीबांचे प्रमाण कमी आहे.
समृद्ध ध्येय ते ध्येय आरामात वाटचाल करतात तर मध्यम आणि गरीब हे मधल्या मध्ये भटकत राहतात.
जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत लेख परत परत वाचा, कारण एकदा का समजले कि तुम्ही चमत्कार घडवू शकता. सर्वकाही तुमच्या अंतर्मनात आहे, ब्रम्हांडात आहे. तुमच्यातील शक्ती जागृत करा. सोपे आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment