कंपनाचा नियम हा वैश्विक सिद्धांत आहे. प्रत्येक गोष्ट (प्रत्येक अणू, वस्तू आणि सजीव) सतत गतीमध्ये असते, विशिष्ट पद्धतीने वारंवारतेने कंपन होत असते. कंपनांचा वेग किंवा शक्ती ह्याला फ्रिक्वेंसी म्हणतात. दोन वस्तू किंवा व्यक्तीमधील फरक म्हणजे त्या व्यक्ती किंवा वस्तूच्या कंपनांची गती किंवा वेग. श्रीमंत व्यक्ती आणि गरीब व्यक्ती, आनंदी व्यक्ती आणि दुखी व्यक्ती, निरोगी व्यक्ती आणि रोगी व्यक्ती, भाग्यशाली व्यक्ती आणि दुर्भाग्यशाली व्यक्ती हा व्यक्तीच्या कंपनामधील फरक आहे.
तुम्ही फ्रिक्वेंसी ला कंपनांची उर्जा म्हणू शकता. एखाद्या व्यक्तीची कंपन ऊर्जा, किंवा एखाद्या भौतिक जागेची किंवा लोकांच्या समूहाची कंपन उर्जा, ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही पाहू शकता किंवा स्पर्श करू शकता - परंतु ती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जाणवते, अनुभवता येते आणि त्यावर प्रतिक्रिया देतो. म्हणून एक व्यक्तीच्या जवळ लोक आकर्षित होतात तर दुसऱ्या व्यक्तीकडे लोक बघत देखील नाही. एका जागी घरी, दुकानात लोक सतत ये जा करतात पण काही जागी घरी दुकानात लोक बघत पण नाहीत. ह्या दोन्ही उदाहरणात आपल्याला अनुभव येतो जाणवते कि इथे जायला पाहिजे नको म्हणून.
कंपनांचा सिद्धांत असे म्हणतो कि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूची कंपन उर्जा म्हणजे फ्रिक्वेंसी असते. आपण आपली कंपने बदलू शकतो व नकारात्मक कंपने बदलून सकरात्मक कंपने निर्माण करू शकतो. जेवढे तुम्ही स्वतःच्या कंपनासोबत एकरूप, ट्यून व्हाल तेवढे तुम्हाला दिसून, जाणवून, अनुभवून येईल कि तुमची कंपने कशी बाहेरील परिस्थिती बदलतात ते. यशस्वी लोक माझ्याकडे सतत सरावासाठी येत असतात व त्यांची कंपने हि समृद्ध, भाग्यशाली आणि अमर्याद आयुष्याशी जुळवून ठेवत असतात म्हणून ते चमत्कारिक आयुष्य जगत असतात.
तुम्ही तुमच्या कंपनांचे निरीक्षण करा, तुमच्यातून कुठल्या प्रकारची कंपने निघत आहेत? तुम्ही कुठल्या परिस्थितीत राहत आहात? दररोज तुम्हाला कुठले अनुभव येतात? थोड्यात सांगायचे झाल्यास तुम्ही सकारात्मक जगत आहत कि नकारात्मक? हा महत्वाचा प्रश्न आहे.
तुमची कंपने सक्षम करण्यासाठी तुम्हाला ध्यान, व्यायाम आणि आहार ह्या तीन वर काम करायचे आहे आहे. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवून येईल. ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरूंच्या सानिध्यात जावे.
धन्यवाद
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment