शिष्याचे सर्वांगीण आयुष्य बदल व शेअर मार्केट मधील चमत्काराचे अनुभव

मला अजून तो दिवस आठवत आहे ज्यावेळेस एक शिष्य त्याच्या आयुष्यातील आर्थिक समस्या घेवून माझ्याकडे आला होता. चांगली करोडो रुपयांची संपत्ती होती ती काही आर्थिक गुरु योग्य न भेटल्यामुळे रसातळास गेली. २५ लाख फक्त उपयांवर खर्च केले. पैसे जावू द्या पण पाहिजे तसा रिझल्ट नाही आला. सर्व सुख चैन गेले व आयुष्य हे नैराश्याने भरून गेले. 


शिष्याचे सर्व ऐकून घेतले व त्याला विचारले कि मी जे मेसेज पोस्ट करत असतो त्यामध्ये जीवन बदलणाऱ्या अनेक सूचना असतात त्यांचे पालन का नाही केले? शिष्य स्पष्ट बोलला कि सर मला नाही जमले म्हणून विचार केला कि परत एकदा तुमच्या गुरु चरणी लीन व्हावे. मी आता रसातळास गेल्यावर तुमचे सर्व पोस्ट मेसेज समजू लागलो, मी किती व कश्या चुका केल्या त्या दिसू लागल्या, त्याचा पश्चाताप आहे व मी तुमच्या आशीर्वादाने पुन्हा भरारी घेईल. तो जे काही बोलला ते मनापासून बोलला हे शिष्याच्या शब्दाने जाणवून दिले. भावना कधीही खोटे बोलत नाही.


ह्या सर्व अनुभवामुळे मेंदूत बदल झाला असेल ह्यामुळे मी सुरुवात हि संमोहन शास्त्रापासून केली. सुरुवातीपासून शिष्याने जी इच्छाशक्ती दाखवली ती दिसू लागली, दुसऱ्या दिवशी तपासले तर पूर्ण बदल झालेला दिसून आला. सरावाचा प्रत्येक टप्पा यशस्वी पार पडला गेला आणि त्यामध्येच चमत्काराची बी रोवली गेली. दोन दिवसांनी अपडेट साठी फोन आला, सर मी इंडिअन हॉटेल्स कंपनी लिमिटेड चे शेअर्स विकत घेत आहे, शेवटचे ५ लाख त्याने त्या शेअर मध्ये टाकले व आपल्या कामाला लागला. त्याला बोललो कि जर चांगल्या पगाराची नोकरी भेटत असेल तर ती कर आणि त्याला उत्तम पगाराची नोकरी भेटली.


म्हणजे योग्य शेअर आणि योग्य नोकरी हेच तर भाग्य जागृत होण्यासाठी लागते. १ जुलै २०२२ ला इंडिअन हॉटेल्स कंपनी लिमिटेड चे राउंड फिगर ५ लाखांचे शेअर प्रती शेअर २२५.७५ ह्या दरावर विकत घेतले आणि ३० जून २०२३ ला शेअर चा दर हा ३९२.८० इतका होता व ५ लाखांचे राउंड फिगर ८ लाख एकोणसत्तर हजार इतके झाले. असे जर त्यावेळेस माझ्या सर्व शिष्यांचे एकत्र केले तर नफा हा करोडोंच्या घरात जातो. नोकरी पण चांगली भेटली व गुंतवणूक पण चांगली झाली आणि बघता बघता एका वर्षातच सर्वांगीण समृद्धी हि कुटुंबात आली.


काहींना वाटत असेल कि हे सर्व पैश्यासंदर्भात आहे पण हे खोटे आहे, जी मानसिक शांती स्थैर्यता मिळते त्याची किंमत कुठेही मोजता येत नाही. जो आत्मविकास होतो, जे तुम्ही धाडसी बनता, तुम्ही जसे संकटांचा सामना करत तुमच्या आयुशाय्त समृद्धी निर्माण करता हे सर्व फक्त एका आर्थिक दृष्टीकोनातून बघता येणार नाही.जे समृद्ध श्रीमंत लोक आहेत जे सकारात्मक धाडसी लोक आहेत त्यांच्या सहवासात जेव्हा देखील असतो तेव्हा ज्ञान आणि अनुभव ऐक्याला मिळतात, तत्वज्ञान प्रोस्ताहन ऐकायला मिळते. पैसा ह्या सर्वांचा बाय प्रोडक्ट आहे. म्हणून श्रीमंत आणि समृद्ध लोक कधीही पैश्यांकडे बघत नाही तर सर्वांगीण समृद्धीकडे बघतात.


हे जे शेअर चे नाव आहे ते शिष्याच्या अंतर्मनातून आले होते, अनेकदा तुम्ही गट फिलिंग हा शब्द ऐकला असेल ते तसेच. इतक्या वर्षांच्या अनुभवातून तपातून सहावे इंद्रिय, गट फिलिंग जागे होते, जर सुरुवातीपासून तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ध्यानाच्या विविध साधना करत आसल तर तुम्ही सहावे इंद्रिय गरजेनुसार जागृत करून आपल्या समस्या चमत्कारिकरित्या गायब करू शकता, ध्येय साध्य करून घेवू शकता आणि स्वप्न पूर्ण शकता.


हा एक प्रवास आहे लक्षात ठेवा, कमीत कमी ३ महिने तरी देत चला तेव्हा समजेल कि आरामात प्रवास कसा होतो ते. अंतर्मनाचा प्रवास जितका तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कराल तेवढे उत्तम कारण जे जवळील व्यक्तीजवळ देखील व्यक्त होता येत नाही ते सर्व गुरूंकडे व्यक्त होता येते, कसल्याही मर्यादा राहत नाही आणि जज केले जात नाही.


पुराणात देखील सांगितले आहे, अध्यात्मात देखील सांगितले आहे आणि मानसशास्त्राने देखील सिद्ध केले आहे कि तुम्ही ज्या व्यक्तींच्या संपर्कात राहता तुम्ही तसे बनून जाता. जी लोक तुमच्या भल्याचा विचार करतील, तुम्हाला प्रोस्ताहित करतील आणि तुमच्या भावनांना वाट देतील अश्याच लोकांच्या संपर्कात रहा. अश्या सकारात्मक वातावरणामुळे तुम्ही तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत करून आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेत जगाल.


आयुष्य जगणे सोपे आहे, कठीण करू नका.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Comments