कधीही कोर्स फी ची माहिती घेतांना सुरुवातीलाच विचारायचे नाही कि "मला फी परवडत असेल तर कोर्स करेन" किंवा फी विचारल्यानंतर "फी खूप जास्त आहे." हे वाक्य वापरायचे नाहीत. ह्यामुळे तुम्ही स्वतःला कमी समजत आहात किंवा तुमची आर्थिक परिस्थिती तशी आहे असे दर्शवले जाते, आणि हीच कंपने ब्रम्हांडात सोडली जातात व तुम्ही तसेच आयुष्य जगता किंवा त्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती ओढवून घेता.
माझ्याकडे असे कितीतरी लोकं आलीत जी लाखो रुपये द्यायला तयार आहेत पण मी त्यांना विद्यार्थी बनवून घेत नाही. इथे फक्त पैसे नाही तर पैश्यांसोबत मानसिकता देखील महत्वाची आहे.
विचारणे उत्तम आहे पण त्यानंतर मनात विचार करणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्ती हि त्याच्या नुसार आयुष्य जगत असते. मी झोपडपट्टीत राहणारा श्रीमंत देखील बघितला व बंगल्यात राहणारा गरीब देखील बघितला आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या श्रीमंताकडे पैश्यांची कमी नव्हती तर बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंताकडे कर्जाचे डोंगर होते.
दोघांकडे फरक हाच कि एकाला पैश्यांची उर्जा आणि कंपने सांभाळता आली नाही तर दुसऱ्याला उत्तम सांभाळता आली. आमच्या जगतात बाह्य स्वरूपाला महत्व नाही तर उर्जा आणि कंपनाना महत्व आहे.
एक अशी व्यक्ती माझ्याकडे समस्या घेवून आली होती कि तिच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत उत्तम काम करत आहे, जे पाहिजे ते सर्व भेटत आहे, अमर्याद भेटत आहे आणि ते सांभाळता येत नाही. ह्या व्यक्तीने कधीही कुठलाही कोर्स केला नाही, जे होते ते निर्माण झाले होते व चमत्कारिक आयुष्य जगत होता. असे आकर्षणाच्या सिद्धांचे विश्व आहे. सर्व खेळ कंपने आणि उर्जेचा आहे, ह्या व्यक्तीवर केलेल्या उपायावर आपण नंतर कधीतरी बोलू.
ह्या जगात फुकटात शिकवणारे देखील आहे व जास्तीत जास्त माझ्या परिचयातील २० लाख रुपये फी घेणारे देखील आहेत. माझ्याकडे जो संमोहन तज्ञ १००० रुपये देवून उपचारासाठी येत असतो त्याची स्वतःची उपचार फी २०,००० रुपये आहे तर कोर्स फी २ लाख रुपये. छोट्याश्या खोलीत देखील कोर्सेस घेतले जातात तर पंचतारांकित हॉटेल्स किंवा रिसोर्ट मध्ये देखील कोर्सेस चालतात. स्थानिक विद्यार्थी देखील येतात तर दुसरीकडे विदेशातून देखील विद्यार्थी येतात.
तुम्हाला ज्ञान घ्यायचे आहे तर त्या साठी पैश्यांची गरज नाही, हे सर्व आत्मज्ञान आहे, तुम्ही कधीही कुठूनही सुरुवात करू शकता. तुम्ही एखाद्या ज्ञानाचा मार्ग पकडून पुढे जावू शकता किंवा स्वतःचा मार्ग निर्माण करू शकता, एकदा का सर्व सामान्य झाले कि तुम्हाला गुरुची गरज भासणारच तोपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारलेली असेल त्यामुळे स्वतःला थांबवू नका, कुठूनही सुरुवात करा, तुम्ही तुमचे ध्येय बरोबर गाठाल. गौतम बुद्धांचा अत्त दीप भव लक्ष्यात ठेवा व आत्मज्ञानी व्हा.
पैश्यांचा आदर करा भले तुमच्याकडे एक रुपया असो किंवा एक करोड, हीच आदराची भावना तुम्हाला सर्वांगीण समृद्ध आयुष्य जागवून देते ना कि तुमच्याकडे असलेली कमतरता. विनाकारण कमतरता दाखवू नका व ऑनलाईन तर नाहीच. टपरीवर चहा ५ रुपयाला आहे व ताज हॉटेल मध्ये ५०० रुपयाला, प्रत्येक जन आपआपल्या हिशोबाने चहा प्यायला जातो, त्यामध्ये वाईट काही नाही. आपल्या आयुष्याचा आनंद घ्या व आनंदाने आयुष्य जगा.
आणि एक लक्ष्यात ठेवा कि प्रचंड शक्तिशाली लोक हि अति सामान्य जीवन व्यतीत करत असतात, अतिशय साधी राहणीमान असते त्यांची.
आनंदाने आयुष्य जगा व सर्वकाही ब्रम्हांडावर सोडून द्या.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment