१) तुम्हाला अशी अनेक उदाहरणे दिसतील एक व्यक्ती जी नोकरीच्या लायक नाही ती उच्च पदावर बसली आहे, एक व्यक्ती जिला उद्योग व्यवसायाचे ज्ञान नाही ती पण यशस्वी उद्योग व्यवसाय करत आयुष्य जगत आहे, एक व्यक्ती शेअर बाजारात कसेही पैसे लावते व ती पैसे कमावून जाते.
२) ह्या उलट असे अनेक लोकं आहेत जे नोकरीच्या लायक आहेत त्यांना नोकरी भेटत नाही, किंवा नोकरी भेटली तरी ज्यांची लायकी नाही ते त्यांचे बॉस आहेत. उद्योग व्यवसायाचे उत्तम ज्ञान आहे, पैसा आहे पण ग्राहक येत नाहीत, शेअर बाजाराचे उत्तम ज्ञान आहे पण नफा पाहिजे तसा होत नाही.
३) दुसरीकडे जे योग्य आहे त्यांना सर्वकाही भेटले सुद्धा आहे, असे नाही कि वरील जशी विरोधी उदाहरणे दिली आहे फक्त तसेच आयुष्य लोक जगत आहे. इथे तुम्ही तुमचे नियम लावू शकत नाही आणि नाही कुठलेही नियम काम करतात. ज्याला जसे जगायचे आहे तो तसे जगतोच.
हे असे का होते?
मला असे दिसून आले कि पहिल्या व तिसऱ्या गटाची लोकं ध्येयाशी एकनिष्ठ असतात व त्यामध्ये काहीही बदल करत नाही. त्यांना ते पाहिजे म्हणजे पाहिजेच. पहिल्या व तीसऱ्या गटाची लोक आमच्या सारख्या तज्ञ, गुरु लोकांच्या सतत संपर्कात असतात व त्यांना जसे पाहिजे तसे आयुष्य ते जगतात.
दुसऱ्या गटाच्या लोकांमध्ये एक अपराधीपणाची भावना, पिडीत असल्याची भावना दिसून येते व त्यांची उर्जाच संपलेली दिसून येते. ह्यामधील अनेकांचे ध्येय निश्चित नसते, परिस्थिती नुसार बदलत जाते, तज्ञ आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नसतात, एक वेगळ्याच मानसिक द्वंदात ते फसलेले असतात, कधी काही मिळणारे छोटे यश त्यांना पुढे ढकलत असतात.
साधे जोडीदाराचे उदाहरण घ्या, पहिल्या गटात असणाऱ्यांचे ध्येय जर जोडीदार मिळण्याचे असेल तर त्यांना ते मिळतेच, त्यांच्याकडे अनेकदा एक किंवा त्यापेक्षा जास्त जोडीदार असतात ते देखील प्रचंड विश्वास असलेले. दुसऱ्या गटातील लोकांच्या आयुष्यात जोडीदारच येत नाही आणि आला तर टिकत नाही, आणि तेच जोडीदार हे पहिल्या गटातील लोकांसोबत अगदी एकनिष्ठ वागत असतात.
तिसऱ्या गटातील लोक हे जास्तीत जास्त आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात. त्यांच्यामध्ये ८० % प्रमाण पकडा जे आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात ते. २ % तर दोष असणारच व १८ % परिस्थिती वर अवलंबून आहे, आणि परिस्थिती तात्पुरती असते ना कि कायमस्वरूपी. पण गट क्रमांक एक मध्ये कुठलेही नियम लागू होत नाहीत.
जे चांगले आहे मग ते नोकरी असो, उद्योग व्यवसाय असो, शेअर बाजार असो, जोडीदार असो किंवा कुटुंब हे पहिल्या गटातील लोकांना १०० %
मिळते, तिसऱ्या गटातील लोकांना देखील ८० ते ९८ % प्रमाणात मिळते, सर्व समस्या निर्माण होते ती दुसऱ्या गटातील लोकांमध्ये.
हे मी फक्त थोडक्यात माहिती देत आहे, कारण लांब लेख वाचणे सर्वांना शक्य होणार नाही, गोंधळ वाढेल, व समजले जाणार नाही. आयुष्याचे अनेक पैलू आहेत हे या ३ क्रमांकात फिट बसतात. आयुष्याच्या प्रत्येक भागानुसार आपण आपला क्रमांक बदलू शकतो. जसे कि काहींकडे पैसा असतो तर जोडीदार असू शकतो, नसू शकतो, एकनिष्ठ असू शकतो किंवा नसू शकतो, किंवा परिस्थिती नुसार बदलू शकतो. हा पूर्ण अभ्यास संशोधनाचा भाग झाला.
मुख्य मुद्दा समजून घ्या.
आपल्याला एकच आयुष्य भेटले आहे, तुमच्याकडे एकच आयुष्य आहे, मर्यादित वेळ आहे, त्यामुळे तुम्हाला जसे पाहिजे तसे आयुष्य जगा. ह्या जगात सामान्य सर्वांगीण आयुष्य जगणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे आपण सुखाने आयुष्य जगत आहोत, आणि नाही कोणीही इतरांच्या आयुष्य ढवळाढवळ करतो.
बाहेरील तार्किक परिस्थिती काहीही कामाची नाही, जो पर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीचे अंतर्मन, कंपने आणि उर्जा नाही समजत. ज्याच्या अंतर्मनात जे ध्येय कायमस्वरूपी रुजले असेल ती व्यक्ती तसेच आयुष्य जगेल, ज्याची कंपने आणि उर्जा त्याला जसे आयुष्य पाहिजे त्याच्याशी जुळून येत असेल तर त्याला तसेच आयुष्य भेटेल. कुणालाही त्या व्यक्तीच्या अंतर्मनात काय आहे हे सजून येत नाही, ते दिसते फक्त संमोहन तज्ञांना, मानसोपचार तज्ञांना आणि आत्मविकास तज्ञांना.
स्वतःवर लक्ष केंद्रित करा व जीवनाचा आनंद घ्या, दुसरा कसे आयुष्य जगत आहे ह्यावर लक्ष केंद्रित करू नका. इथे देखील स्पर्धा आहे, तुम्हाला इतके सक्षम रहायचे आहे कि इतर कुणाचीही उर्जा तुमच्या आयुष्यातून काही घेवून जाता कामा नये.
ह्या लेखामध्ये दिलेले अनुभव जर तुम्हाला आले असतील तर ते फेसबुक इनबॉक्समध्ये, व्हास्टएप मेसेज द्वारे शेअर करा. तुम्ही जितके अनुभव शेअर कराल भले मग ते चांगले असो किंवा वाईट, त्यावर मला पुढील लेख लिहून शंकाचे निर्सारण करता येईल. माहिती गुप्त असेल त्यामुळे वास्तव अनुभव नावासकट शेअर कराल ना कि काल्पनिक.
धन्यवाद
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment