शिष्याचे अनुभव


नमस्कार ... 🙏🏻

Msg करण्यास विलंब केल्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.

साधारण 4-5 महिन्यापूर्वी मी आपल्याशी संपर्क केला होता. तुमच्याशी संपर्क करण्याआधी मी फेसबुक वर तुमच्या बऱ्याच पोस्ट पाहत होतो.

तुमच्या पोस्ट माझ्या मनाला बऱ्याच भावात होत्या परंतु मानवी स्वभावानुसार त्या कळत होत पण वळत न्हवत्या त्यामुळे पोस्ट वाचून तेवढ्यापुरता बर वाटतं आणि परत ये रे माझ्या मागल्या असाच आयुष्यात चालू होतं

मध्यंतरी घरातील, कामावरील  माझ्या मनांतील नकारात्मक भावना उचंबळून आल्या होत्या, आयुष्यात आता काहीच राम उरलं नाही असाच वाटतं होत 

एक दिवस मनाशी ठरवून तुमच्याशी संपर्क केला परिस्थिती अनुकूल नसतानासुद्धा मी तुमचे काही paid session केले काही session टाळले पण जे काही तुमचे session attend केले त्याने माझ्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी हळू हळू घडत गेल्या 

ज्या गोष्टीमुळे मन जास्तीत जास्त नकारात्मक व्हायचं त्या गोष्टी दुर्लक्ष किंवा टाळण्यास सुरुवात केली जसं की आधी मी newspaper मी राशिभविष्य वाचत असे आणि त्यामध्ये लिहिलं असेल आज तुम्हाला हा त्रास होईल हे वाचून दिवसभर तोच नकारात्मक परिणाम होयच त्यामुळे मी राशिभविष्य वाचन सोडून दिलं

चतुर्थ श्रेणीतील असल्यामुळे वरिष्ठांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला अपमानास्पद वाटायची  परंतु तुम्ही मला ध्यानाची सवय लावल्यामुळे मी माझा राग control करण्यास शिकलो व्ययक्तिक संपर्क वाढविला, नकारात्मक स्वभावाच्या व्यक्तिपासून दूर राहू लागलो त्यामुळे आज माझं 4000 लोकांमधून 1200 लोकांमध्ये प्रमोशन साठी निवड होऊन जगभरातील 650 लोकांमध्ये माझे प्रमोशन झाले आता फक्त चांगल्या ठिकाणी पोस्टिंग ची वाट पाहतोय आणि तुम्ही शिकविल्याप्रमाने माझी पोस्टिंग चांगल्याच ठिकाणी होईल यावर माझा विश्वास आहे

सांगण्याच तात्पर्य ऐवढेच नाही की तुमच्याशी संपर्क झाल्यावर लगेच सर्व त्रास कमी झाला अस नाही तर माझ्या विचारांमध्ये अमूल्य अस सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा मिळू लागली आणि अनेक मार्ग सुचू लागले याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे

परिस्थतीमुळे आर्थिक, वेळ, एकांत नसणे यामुळे बऱ्याचदा मी तुमचे session attend नाही केले पण नवीन वर्षात मी सर्वच session attend करून माझ्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार नक्कीच घडवून आणेल हा माझा ठाम विश्वास आहे

आयुष्यात कोणी गॉडफादर नसतानासुद्धा तुम्ही सांगितलेल्या ध्यानाची, सकारात्मक विचारांमुळे माझ्या आयुष्यात  सकारात्मक चमत्कार घडण्यास सुरुवात झाली आहे यामुळे तुमचे आभार प्रदर्शन करण्यास माझ्याकडे शब्द खूपच कमी पडत आहे पण तरीही तुम्ही मला समजून घ्याल हा दृढ विश्वास आहे मला


 

Comments