तुम्ही कुठच्या गटात मोडता?

गट अ

काही लोकांना यश अतिशय सोप्या पद्धतीने मिळते.
काही लोकांना यश थोडी मेहतन करून मिळते.
काही लोकांना यश जास्त मेहनत करून मिळते.
काही लोकांना यश अतिशय कठीण परिश्रम करून मिळते.
काही लोकांना यश काही केल्या मिळतच नाही.


गट ब

काही लोकांना यश ह्याच क्षणी मिळते.
काही लोकांना यश काही दिवसांनी मिळते.
काही लोकांना यश काही महिन्यांनी मिळते.
काही लोकांना यश एक वर्षांनी मिळते.
काही लोकांना ५ , १० वर्षात यश मिळते.
काही लोकांना १०, २०, ३० वर्षात यश मिळते.
काही लोकांना ६० पार झाल्यवर यश मिळते.
तर काही लोकांना यशच मिळत नाही.


गट क

काही लोकांना एकदा यश मिळाले कि आयुष्यभरासाठी टिकून राहते.
काही लोकांना यश मिळाले कि काही वर्षांसाठी टिकून राहते.
काही लोकांना यश मिळाले कि काही महिन्यांसाठी टिकून राहते.
काही लोकांना यश मिळाले कि काही दिवसांसाठी टिकून राहते.
काही लोकांना यश मिळाले कि काही तासांसाठी टिकून राहते.
काही लोकांना यश मिळाले कि काही मिनिटांसाठी टिकून राहते.
काही लोकांना यश मिळाले कि काही सेकंदासाठी टिकून राहते.
काही लोकांना यश मिळाले कि क्षणासाठी टिकून राहते.
काही लोकांना यश हुलकावणी देवून जाते.
काही लोकांना यशच मिळत नाही.


तुम्ही कुठच्या गटात मोडता जर तुम्हाला हे समजले कि तुम्ही तुमचे आयुष्य आरामात बदलू शकता. सुरुवात मान्य करण्यापासून होते आणि त्यानंतरच गुरु दिसून येतात. आपली जेव्हा मर्यादा संपते तेव्हा तज्ञ, गुरु तुम्हाला पुढे घेवून जातात. वरील जे काही ३ गट दिले आहेत त्यामध्ये देखील अति सूक्ष्मता आहे आणि एकदा का गुथ्था सोडवला तर चमत्कारिक रित्या तुमचे आयुष्य बदलून जाते. काहीही हार मानु नका, तुमचे आयुष्य कधीही बदलू शकते. हार मानले तर संपलात आणि प्रयत्न केले तर तुम्ही आकाशाला गवसणी घालाल. माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमचा आहे का स्वतःवर?

धन्यवाद
अश्विनीकुमार


 

Comments