तुमच्या अंतर्मनात तुम्हाला जे पाहिजे त्या बद्दल सुस्पष्ट चलचित्र दिसत असेल, तुमच्या पंच इंद्रियांना जाणवत असेल तर तुम्हाला ते मिळूनच जाईल. इथे तर्क काम करत नाही तर अंतर्मनाची शक्ती काम करते. एखाद्याला शेअर बाजारातील ज्ञान नाही पण त्याने शेअर बाजारातून नफा कमवून जात आहे असे सुस्पष्ट चलचित्र त्याच्या अंतर्मनात बघत असेल, स्वप्नात जगत असेल तर त्याला ते मिळूनच जाईल, आणि जर ज्याचे शेअर बाजाराचे ज्ञान, अनुभव आणि संशोधन आहे पण ती व्यक्ती तिच्या अंतर्मनात सुस्पष्ट त्याला जे पाहिजे त्याचे चलचित्र दिसत नसेल किंवा ती व्यक्ती स्वप्नात जगत नसेल तर तिला ते मिळणार नाही. तुमचे अंतर्मन प्रचंड शक्तिशाली आहे, अंतर्मनाची अद्भुत शक्ती तुमच्या अंतर्मनात दडलेली आहे.
संमोहन तज्ञ
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment