ज्याच्याकडे घर नाही आज तो ४ घरांचा मालक आहे.
ज्याच्याकडे जमीन नव्हती आज त्याच्याकडे जमीन आहे.
जो कर्जबाजारी होता तो आज कर्जमुक्त आयुष्य जगत आहे.
ज्याचा उद्योग व्यवसाय तोट्यात जात होता त्याचा उद्योग व्यवसाय हा नफ्यात आहे.
ज्याचा शेअर बाजारात तोटा होत होता आज त्याच्या शेअर्स चे भाव प्रचंड वाढले आहेत.
ज्याच्याकडे नोकरी नव्हती आज त्याच्याकडे नोकरी आहे.
ज्याच्याकडे आरोग्य नव्हते आज त्याच्याकडे आरोग्य आहे.
ज्याच्या आजार बरा होत नव्हता आज त्याने आजार पूर्ण बरा केलेला आहे.
ज्याला जोडीदार मिळत नव्हता आज तो सुखी संसार करत आहे.
ज्याला प्रेम मिळत नव्हते आज त्याला प्रेम मिळाले आहे.
ज्यांना संतती होत नव्हती आज त्यांना संतती झाली आहे.
ज्याला आयुष्यात काहीच भेटत नव्हते तो आज स्वप्नांचे आयुष्य सत्यात जगत आहे, त्याला जे पाहिजे ते मिळत आहे.
हे असे चमत्कार मी दररोज ऐकत असतो, रोज सकाळी मेसेज येत असतात, आज तुमच्या आयुष्यात चमत्कार घडला नसेल तर उद्या नक्की घडेल. ब्रम्हांड अमर्याद आहे, तो अमर्याद देतच जातो. पृथ्वीच्या प्रत्येक टोकावर सतत चमत्कार घडत असतो.
चला जगाचे जावू द्या, मी ज्या मुंबई शहरात राहतो आपण त्याचेच उदाहरण घेवू. मुंबई ची लोकसंख्या २०२३ नुसार २,१२,९७,००० अक्षरात दोन करोड बारा लाख सत्याण्णव हजार आहे. आता समजा दिवसाला १० माझ्या शिष्यांच्या आयुष्यात चमत्कार घडत आहे. म्हणजे ०.००००५ % लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडत असतात. हे मी फक्त मुंबई चे बोलत आहे व माझे शिष्य संपूर्ण जगात आहेत. तुम्हाला समजण्यास सोपे जावे म्हणून सांगत आहे. वर्षाला नाही बोलले तरी ३६५० शिष्यांचे चमत्कारिक अनुभव मी ऐकत असतो म्हणजे ०.०१७ % फक्त, काहींच्या आयुष्यात एक चमत्कार घडतो तर काहींच्या आयुष्यात अनेक.
आणि हे चमत्कार संपूर्ण जगात घडत असतात, माझ्या सारखे अनेक गुरु आहेत त्यांच्या शिष्यांच्या आयुष्यात देखील घडत असतात. विविध मार्गांनी चमत्कार घडत असतात, काही विज्ञानाचा वापर करतात, काही अध्यात्माचा तर काही अलौकिक, रहस्यमय काळ्या विद्येचा.
ज्यांच्या आयुष्यात चमत्कार झाले ह्या सर्वांचे ध्येय एकच होते का? नाही. एखाद दुसऱ्याचे ध्येय पैसा असेल तर काहींचे आरोग्य, प्रेम, कुटुंब किंवा शिक्षण म्हणजे त्यामध्ये देखील वेगवेगळे ध्येय. जगभरात २ % लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडत असतात, आणि हि टक्केवारी तुम्ही गुरूंच्या मदतीने वाढवू देखील शकता. २ % म्हणजे १६,०९,०६,२२९ अक्षरात सोळा कोटी नऊ लाख सहा हजार दोनशे एकोणतीस. आता जगभरातील १६ करोड लोकांच्या स्पर्धेत तुम्ही भाग घेवू शकता ना? सोपे आहे कि नाही?
फक्त तो चमत्काराचा एक क्षण पुरेसा आहे, त्यानंतर तुम्हाला फक्त मेंटेन ठेवायचे आहे बस बाकी काही नाही. सकारात्मक रहा, नेहमी आनंदी रहा, स्वतःला महत्व द्या आणि तुम्हाला जसे पाहिजे तसेच आयुष्य जगा तेव्हाच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील. ध्यान करा, आनंदी भावना निर्माण करा, सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा, जर सकारात्मक लोक नसतील तर गुरूंच्या सहवासात रहा, आयुष्यात एक तरी गुरु पाहिजे जो तुम्हाला सर्वांगीण समृद्ध आयुष्य देईल व तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर करेल. बस इतके तुम्हाला करायचे आहे.
सोपे आहे, आता ह्या क्षणापासून ठरवा कि तुम्हाला चमत्कार घडवायचा आहे व तुम्हाला जे पाहिजे ते म्हणजे जे पाहिजे तेच मिळवायचे आहे. एकच आयुष्य भेटले आहे ते पूर्णपणे जगा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

Comments
Post a Comment