मला अपयशाची भीती नाही वाटत.
हो आज मी अपयशी आहे.
अपयशाच्या खोल दरीत अडकलो आहे.
बाहेर निघायचा प्रयत्न केला पण परत अपयशाचा तळ गाठला.
ना मला अपयशाची भीती वाटत आणि नाही अपयशाचा तळ गाठण्याची.
कारण मला माहिती आहे कि मी आज जे अपयशाच्या दरीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत आहे त्यामुळे मी प्रचंड शक्तिशाली होत आहे.
भले अपयशाच्या तळात अंधार आहे पण तिथेच मी माझ्या अंतर्मनाच्या डोळ्यांनी बघायला शिकलो.
माझ्यातल्या अद्भुत क्षमता देखील मला दिसल्या व त्या मी जागृत केल्या.
मला माहिती आहे कि मी जेव्हा अपयशाच्या दरीतून बाहेर पडेल तेव्हा मी जमिनीवर पाय ठेवणार नाही तर अवकाशात भरारी घेणार.
हो माझे भविष्य उज्वल आहे.
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन,
मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment