सर नमस्कार,
सर तुम्हाला आज चमत्कार सांगत आहे. सर २०१९ मध्ये मी तुमच्याकडे ऑनलाईन कोर्स शिकत होतो. सर त्या वेळी मी मी तुमच्याकडे ३ वेळ संमोहन शास्त्र आणि ५ वेळा आकर्षणाचा सिद्धांत हा कोर्स केला होता. नंतर तुम्ही बोलला कि अजून किती कोर्स करणार आता प्रात्यक्षिक मध्ये उतर असे बोलून तुम्ही मला परत कोर्स करू दिला नाही. पण सर तुम्हाला एक सांगायचे राहून गेले कि काहीतरी कारण होते म्हणून मी कोर्स रिपीट करत होतो.
सर मी जास्त काही केले नाही कोर्स आणि तुमचा संपर्क बस इतकेच. हि माझी कल्पना होती कारण मला माहिती आहे कि जी व्यक्ती तुमच्या संपर्कात राहते तिच्या आयुष्यात चमत्कार हा घडतोच. म्हणून मी जास्तीत जास्त वेळ तुमच्या संपर्कात, तुमच्या मार्गदशनाखाली घालवला, तुमचा सल्ला सतत भेटत होता आणि इथे माझ्या आयुष्यात चमत्काराला सुरुवात झाली.
सर्वात अगोदर तर माझी करोडोची जमीन ज्याची कोर्ट केस सुरु होती ती सुटली. पैसे आले, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कर्ज नाही फेडले तर त्या पैश्यानी व्यवसाय सरू केला व त्याच्या नफ्यातील एक भाग हा कर्ज फेडण्यासाठी वापरले. तिथे देखील चमत्कार झाला, कोणीतरी जिथून कर्ज घेतले होते त्यावर केस टाकली व जिंकले व योगायोग त्या निकषावर मी देखील होतो म्हणून आपोआप माझे कर्ज नील झाले. सर तुम्हाला सांगू, वेडे होण्याची पाळी आली. आणी खरच झालो असतो पण तुमचे वाक्य आठवले कि "कितीही मोठा चमत्कार झाला तरी भावनांवर ताबा ठेवा व जे भेटले आहे त्याचा आनंद घ्या, कसे भेटले काय भेटले त्याचा विचार करू नका, तर्क लावू नका, उत्तर सापडणार नाही म्हणून ह्याला चमत्कार म्हणतात. जर तर्क लावला तर अविश्वास दाखवत आहात, मग परत कधीही चमत्कार होणार नाही." बस मग मी भावनांवर ताबा ठेवला.
सर चमत्कार इथेच संपला नाही, तुम्हाला फोन करून विचारले कि १० लाख रुपयांचे मी टाटा इलएक्ससी चे शेअर्स विकत घेवू का तेव्हा तुम्ही हा बोलले व त्यावेळेस मी ५९८.६० च्या भावाने शेअर्स विकत घेतले व १०,२३८.०५ भाव असतांना अर्धे शेअर्स विकून ८५ लाख एकोण पन्नास हजाराचा नफा बुक केला, व उरलेले शेअर्स अजून देखील आहे.
सर सतत तुमच्याकडे कोर्स करत राहण्याचा उद्देश हाच होता माझ्या पेशी स्तरावर बदल होणे, माझ्या अंतर्मनात बदल होणे आणि तो झालाच. आज मी दुबई ला राहत आहे, जगभरातील लोकांचा इथे संपर्क येतो, त्यांचे गुरु देखील बघितले पण जी क्षमता तुमच्यात आहे ती मला कुठेही जाणवली नाही. सर मी इथे सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे ते देखील आपल्या कृपेने.
सर असेच आशीर्वाद आमच्यावर ठेवा. आपली आम्ही दुबई ला यायची वाट बघत आहोत. अनेकांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, अनेकांना समृद्ध मानसिकता निर्माण करायची आहे. सर्वकाही तयार आहे फक्त तुम्हाला इथे यायचे आहे. सर परत एकदा आभार मानून मी थांबतो, लवकरच मी आपल्या भेटीला येईल.
Comments
Post a Comment