तुमच्याकडे एक अद्भुत रहस्यमय शक्ती आहे.


तुमच्याकडे असलेली ती अद्भुत शक्ती पाहिजे ते करू शकते.


रंकाचा राजा करू शकते, राजाचा रंक करू शकते


तुम्हाला एका क्षणात श्रीमंत करू शकते


तुम्हाला एका क्षणात निरोगी करू शकते


एका क्षणात तुम्हाला जे पाहिजे ते मिळवू देवू शकते.


तुम्हाला माहिती का ती अद्भुत रहस्यमय शक्ती कुठे दडलेली आहे?


उत्तर नाही सापडत?


बाहेर शोधत आहात?


बाहेर ती अद्भुत शक्ती नाही भेटली?


शोधून दमला आहात?


आता मी सांगतो कि तुमची अद्भुत शक्ती कुठे दडली आहे ती.


तुमची अद्भुत शक्ती दडली आहे ती तुमच्या अंतर्मनात.


जसा मौल्यवान हिरा जमिनीच्या १५० ते २५० किलोमीटर आत सापडतो


अगदी तसेच तुमची अद्भुत शक्ती हि तुमच्या अनंत अंतर्मनात खोलवर दडलेली असते.


तुम्हाला एक नाही तर अनेक शक्ती तिथे मिळून शकतात.


आणि एकदा का तुमच्या अंतर्मनाची शक्ती जागृत केली कि तुमच्यासाठी सर्वकाही शक्य आहे.


तुमच्यासाठी सर्वकाही अगदी अमर्याद उपलब्ध आहे.


तुम्हाला जे पाहिजे ते मिळत जाईल.


तुम्हाला ती अद्भुत शक्ती जागृत करायची आहे?


सोपे आहे.


तुम्हाला सकारात्मक विचार करायची सवय लावून घ्यायची आहे.


सकारात्मक मानसिकता ठेवायची आहे.


सकारात्मक दृष्टीकोन ठेवायचा आहे.


८ तासाची झोप घ्यायची आहे.


जास्तीत जास्त घरचा आहार घ्यायचा आहे.


व्यायाम करायचा आहे.


ध्यान करायचे आहे.


सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहायचे आहे.


आत्मविकास करत रहायचा आहे.


तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहायचे आहे.


समुपदेशन करत रहायचे आहे.


आत्मविकास संलग्न कोर्सेस व उपचार करत रहायचे आहेत.


तुमच्यातील रहस्यमयी अद्भुत शक्ती तुम्हाला तेव्हाच सापडेल, तेव्हाच जागृत होईल जेव्हा तुम्ही सकारात्मक वातावरणात रहाल, सकारात्मक लोकांच्या समुहात रहाल.


सोपे आहे.


नवीन वर्षाच्या १ तारखेपासून तुम्ही मी जे सांगितले आहे त्याचे पालन करा व बघा वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रचंड सकारात्मक बदल झालेला दिसेल.


तुमचे हे संपूर्ण वर्ष सुख, समाधान, आनंद, समृद्धी, भाग्य आणि चमत्काराने भरले गेलेले असेल.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन,

मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments